महाकुंभ 2025 : महाकुंभ स्नानाचे महत्व,विशेषता,पौराणिक इतिहास कथा, आखाडे म्हणजे काय संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात Mahakumbh Mahiti Marathi महाकुंभ मेळावा विषयी मराठीत माहिती पाहणार आहोत. Mahakumbh  Mahiti Marathi महाकुंभ हा किती वर्षातून एकदा येतो? हा कुंभाचे प्रकार किती आहेत? Mahakumbh तो कोण कोणत्या ठिकाणी भरला जातो? आखाडे किती आहेत? Prayag mela स्नानाचे महत्त्व काय आहे? Mahakumbh 2025 लोक कुंभमेळाव्याला गर्दी का करतात? याच्या मागचे कारण काय आहे. संपूर्ण माहिती पाहूत. महाकुंभ मेळावा किती तारखेपासून सुरू होणार आहे?  Mahakumbh Date 2025 व किती तारखेला संपणार आहे?

महाकुंभ 2025 सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या महाकुंभची सुरुवात झाली. हा महाकुंभ 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. काही लोक महा कुंभाला कुंभ देखील म्हणतात. पहिल्या दिवशीच दीड कोटींहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना, आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः ही माहिती दिली. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना, आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम झालेला आहे. म्हणून या संगमाच्या काठावर महाकुंभ मेळावा आयोजित केला जातो.

महाकुंभामध्ये जगभरातील अनेक मोठ्या व्यक्तीने भाग घेतला आहे. महाकुंभाचा आखाडा म्हणजे संताची ध्यानाची जागा या जागेला आखाडा असे म्हणतात. तसेच आखाड्यात लंगरही बांधले जातात. प्रयागराज मध्ये भाविक व संत आदी शंकराचार्यांनी केलेल्या देशभरातील विविध आखाड्याचे ऋषीमुनी हे या कुंभमेळाव्यात येतात . देशातील सर्व आखाड्याचे नियम वेगळे आहेत. आदि शंकराचार्य यांनी तेरा आखाडे तयार केले आहेत. आध्यात्मिक ज्ञानासोबत शास्त्रांचेही ज्ञान दिले आहे. प्रत्येक आकड्याची शस्त्रे हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. शैव वैष्णव आणि उदासीन सांप्रदायाच्या एकूण 13 प्रकारचे आखाडे तयार झाले आहे.


Mahakumbh Mahiti Marathi
महाकुंभ 2025 – Mahakumbh Mahiti Marathi

महाकुंभाचं महत्व Mahakumbh Mahiti Marathi

महाकुंभ हा फक्त भारतातच नाही, तर जगभरातील सर्वात मोठ्या धार्मिक आयोजनांमध्ये अग्रस्थानी आहे. 144 वर्षांनंतर असा योग आला आहे, ज्यामुळे याला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.  सत्ययुगात समुद्र मंथनाच्या प्रक्रियेत अमृतकलशाच्या स्थापनामुळे कुंभ मेळाव्याची परंपरा सुरू झाली. असेही म्हणतात की कुंभ स्नानासाठी फक्त देवताच नाहीत, तर भूत-प्रेत आणि पिशाच सुद्धा येतात. सनातन धर्मामध्ये महा कुंभ हा सर्वात पवित्र मानला जातो. या कार्यक्रमात भाग घेतलेल्या लोकांना प्रत्येक पापातून मुक्ती मिळते, आणि मोक्ष प्राप्त होतो. म्हणून लोक ज्या ठिकाणी महाकुंभमेळा असतो. त्या ठिकाणी लाखोच्या करोडोच्या संख्येने जातात व त्या नदीत स्नान करतात. कुंभमेळा हा महाकुंभापेक्षा थोडे कमी असल्यामुळे लोक महाकुंभाच्या ठिकाणी जास्त गर्दी करतात. व कुंभमेळ्याच्या ठिकाणी थोडी कमी गर्दी असते. कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी साजरा केला जातो.

महाकुंभ 2025 – प्रमुख स्नानाचे दिवस

14 जानेवारी: मकर संक्रांती

29 जानेवारी: मौन अमावस्या

3 फेब्रुवारी: वसंत पंचमी

12 फेब्रुवारी: माघी पौर्णिमा

26 फेब्रुवारी: महाशिवरात्री 

महाकुंभ 2025 – संगम घाट

महाकुंभासाठी प्रयागराजमध्ये 4000 हेक्टरमध्ये संगम नगरी उभारण्यात आली आहे. या संगम नगरीला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला आहे.  यामध्ये 1,75,000 पेक्षा जास्त टेंट लावण्यात आले आहेत. महाकुंभाला देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येतात. यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने  सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

महाकुंभाचे प्रकार किती आहेत

1 पूर्ण कुंभमेळा

पूर्ण कुंभ मेळावा हा 12 वर्षातून एकदा येतो. हा कुंभमेळा प्रयागराज  हरिद्वार उज्जैन नाशिक या ठिकाणी भरला जातो.

2 अर्ध कुंभमेळा

हा कुंभमेळा6 वर्षातून एकदा भरला जातो. हा कुंभमेळा हरिद्वार व प्रयागराज मध्ये होतो.

3 महाकुंभ मेळा

हा कुंभमेळा 144 वर्षातून एकदा येतो हा प्रयागराज मध्ये असतो.

4  माघ मेळा

प्रत्येक वर्षी हा मेळावा येतो.  पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत हा मेळावा साजरा करतात. याला छोटा कुंभ म्हणतात.

कुंभाचे तीन प्रकार पडतात. Mahakumbh Mahiti Marathi

1 अर्धकुंभ: अर्धकुंभ हा 6 वर्षातून एकदा येतो.

2 पूर्णकुंभ: पूर्णकुंभ हा 12 वर्षातून एकदा येतो.

3 महाकुंभ:  महाकुंभ हा 144 वर्षातून एकदा येतो. ज्यावेळेस बारा पूर्ण कुंभ पूर्ण होतात. तेव्हा महा कुंभ एकदा येतो.

 13,000 विशेष रेल्वेगाड्या सोडले आहेत.   24/7 सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. अनेक तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. शहरभर फ्री बस सेवा आणि ई-रिक्शा उपलब्ध आहेत.


Mahakumbh 2025
महाकुंभ 2025 – Mahakumbh Mahiti Marathi

महाकुंभ 2025 इतिहास आणि परंपरा

कुंभ मेळाव्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. पौराणिक कथा सांगते की समुद्र मंथनातून निघालेल्या अमृतकलशामुळे ही परंपरा सुरू झाली. या मेळाव्याला फक्त धार्मिक नव्हे, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्वही आहे. महाकुंभ 2025 मध्ये फक्त भारतातीलच नाही, तर अनेक परदेशी भाविकही सहभागी झाले आहेत. महाकुंभसाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून 15,000 कोटींचं बजेट मंजूर केलं आहे. या निधीतून पायाभूत सुविधा, स्वच्छता, आणि भाविकांसाठी आवश्यक सर्व सेवा पुरवण्यात येत आहेत.त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने पाप क्षालन होतं, अशी श्रद्धा आहे. गंगा, यमुना, आणि सरस्वतीच्या संगमावर स्नान केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. असा विश्वास आहे.144 वर्षांनंतर असा योग आला आहे. की ज्यामुळे महाकुंभाचं महत्व अधिक वाढलं आहे. भाविकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व व्यवस्थापन केलं जात आहे.

महाकुंभाची सांगता 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे. या दिवशी लाखो भाविक संगमावर पवित्र स्नान करतील आणि महाकुंभाची परंपरा पुढे नेतील. महाकुंभ 2025 हा फक्त एक धार्मिक सोहळा नसून, तो श्रद्धा, परंपरा, आणि अध्यात्माचं प्रतीक आहे. प्रयागराजमध्ये होणाऱ्या या ऐतिहासिक आयोजनाला भेट देणं, हे एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

संगमनगरी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभाची केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात चर्चा होत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्रिवेणी संगमात स्नानासाठी येत आहेत आणि महाकुंभाचा भाग होत आहेत. अमृत स्नानाच्या पहिल्या दिवशीच 3.5 कोटींहून अधिक भाविकांनी श्रद्धेने स्नान केल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू धर्माचा हा भव्य उत्सव आता इस्लामिक राष्ट्रांनाही आकर्षित करत आहे. पाकिस्तान, कतार, युएई, बहरीन यांसारख्या इस्लामिक देशांमधून महाकुंभाबाबत प्रचंड रस दाखवला जात आहे. प्रयागराज महाकुंभ सर्च करणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तान अग्रेसर आहे. त्याखालोखाल कतार, युएई आणि बहरीन या देशांचा समावेश आहे. याशिवाय, नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, ब्रिटन, थायलंड, अमेरिका यांसारख्या देशांतील लोकसुद्धा महाकुंभाबाबत वाचन आणि सर्च करत आहेत.

13 जानेवारीला सुरू झालेल्या महाकुंभाचा पहिला दिवस मकर संक्रांतीचा होता. या दिवशी 3.5 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. अमृत स्नानादरम्यान संगमात स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते, असा भाविकांचा विश्वास आहे.

महाकुंभाच्या यशस्वी आयोजनामुळे सनातन संस्कृतीचा प्रभाव जगभर पसरत असल्याचे दिसत आहे. परदेशातील भाविकही या दिव्य सोहळ्याचा भाग बनत आहेत. अमेरिकन कंपनी Apple चे संस्थापक स्टीव जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या महाकुंभात सहभागी झाल्या आहेत. महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांच्या आश्रमात त्या राहिल्या आहेत. महाकुंभाने ग्लॅमर इंडस्ट्रीलाही प्रभावित केले आहे. उत्तराखंडच्या हर्षा रिचरिया यांनी महाकुंभात सनातन धर्माची दीक्षा घेतली. त्या म्हणतात की खरे सुख आणि शांती ही फक्त सनातन धर्माच्या आश्रयानेच मिळते.

विविध देशांतील लोक महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला पोहोचले आहेत. महाकुंभाने जगाला भारतीय संस्कृती, अध्यात्म, आणि सनातन धर्माची ताकद दाखवून दिली आहे. हा फक्त धार्मिक सोहळा नसून, एक जागतिक मंच बनला आहे जिथे विविध देशांचे लोक एकत्र येतात. या आयोजनाने जगभरातील लोकांना भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे काम केले आहे.


Kumbh mela
महाकुंभ 2025 – Mahakumbh Mahiti Marathi

महाकुंभ 2025 – महाकुंभाची सांगता

महाकुंभाची सांगता 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे. या दिवशी लाखो भाविक संगमात पवित्र स्नान करतील आणि महाकुंभाच्या ऐतिहासिक परंपरेचा साक्षीदार बनतील.

प्रयागराजच्या संगम घाटाचा महाकुंभमेळा सध्या जोरात सुरू आहे ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. रात्रंदिवस सुरक्षित भक्त गंगेत श्रद्धेने स्नान करीत आहेत. भाविकांना सुरक्षा पुरविण्यात येत आहे. प्रत्येक कोपऱ्यात पोलीस आणि चौकीदार तैनात आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून घटनांवर नजर ठेवण्यात येत आहे.अत्याधुनिक स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. वैयक्तिक व्यवस्थाही करण्यात आली आहे. जौनपूर, गोंडा, मुजफ्फरपूर, राजस्थानमधील लोकांच्या कानावर गोष्टी आणि प्रार्थना ऐकू येणार आहेत.

 
महाकुंभ 2025 – Mahakumbh Mahiti Marathi प्रयाग कुंभ मेळा Wikipedia – (Open)


Prayag mela mahakumbh
महाकुंभ 2025 – Mahakumbh Mahiti Marathi

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – Tirupati Balaji Information in Marathi |तिरुपती बालाजी  मंदिर इतिहास,रहस्य आणि संपूर्ण माहिती मराठीत

सारांश

महाकुंभ मेळावा हा 144 वर्षातून एकदा येत. असल्यामुळे या मिळावेला लाखोच्या संख्येने लोक येतात. प्रयागराज मधे लाखोच्या संख्येने गंगा यमुना व सरस्वती या नदीच्या संगमावर स्नान करतात. स्नानाचे महत्त्व खूप पवित्र आहे. मोक्ष प्राप्त होतो. पापा पासून मुक्ती होते. म्हणून महाकुंभाच्या ठिकाणी खूप गर्दी करतात.


महाकुंभ विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

  1. महाकुंभ मेळावा किती वर्षांनी होतो?
    महाकुंभ मेळावा 144 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो.
  2. महाकुंभ कोणत्या ठिकाणी होतो?
    महाकुंभ फक्त प्रयागराज येथे होतो.
  3. कुंभमेळ्याचे किती प्रकार आहेत?
    कुंभमेळ्याचे मुख्यतः तीन प्रकार आहेत:
  • अर्धकुंभ: 6 वर्षांनी
  • पूर्णकुंभ: 12 वर्षांनी
  • महाकुंभ: 144 वर्षांनी
  1. महाकुंभाचा इतिहास काय आहे?
    महाकुंभाची परंपरा समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकलशाशी जोडली आहे. अमृतकलश राक्षस-देवांमध्ये स्थिरावण्यासाठी आलेल्या लढाईतून या उत्सवाची सुरुवात झाली, असे मानले जाते.
  2. त्रिवेणी संगमाचे महत्त्व काय आहे?
    त्रिवेणी संगम हा गंगा, यमुना, आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे. येथे स्नान केल्याने पाप क्षालन होऊन मोक्ष प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.
  3. महाकुंभ 2025 च्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत?
  • 14 जानेवारी: मकर संक्रांती
  • 29 जानेवारी: मौन अमावस्या
  • 3 फेब्रुवारी: वसंत पंचमी
  • 12 फेब्रुवारी: माघी पौर्णिमा
  • 26 फेब्रुवारी: महाशिवरात्री (महाकुंभाची सांगता)
  1. महाकुंभ 2025 कधीपासून सुरू झाला?
    महाकुंभ 13 जानेवारी 2025 रोजी सुरू झाला आणि 26 फेब्रुवारी 2025 रोजी संपेल.
  2. महाकुंभ मेळाव्यातील आखाडे किती आहेत?
    महाकुंभात 13 प्रकारचे आखाडे आहेत. हे शैव, वैष्णव, आणि उदासीन संप्रदायांचे असतात.
  3. महाकुंभ मेळाव्याला गर्दी का होते?
    महाकुंभात स्नान केल्याने मोक्ष मिळतो आणि पापांपासून मुक्ती होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे भाविक लाखोंच्या संख्येने येथे येतात.
  4. महाकुंभसाठी संगम नगरीत कोणत्या सुविधा आहेत?
    संगम नगरीत लाखो भाविकांसाठी तात्पुरती सोय करण्यात आली आहे, ज्यामध्ये टेंट, फ्री बस सेवा, ई-रिक्शा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे, आणि 24/7 सुरक्षा व्यवस्था आहे.
  5. महाकुंभाचा बजेट किती आहे?
    महाकुंभ 2025 साठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून 15,000 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे.
  6. महाकुंभात भाग घेणारे प्रमुख देश कोणते आहेत?
    भारतासह अमेरिका, नेपाळ, सिंगापूर, कॅनडा, ब्रिटन, थायलंड, आणि पाकिस्तानसारख्या अनेक देशांतील भाविक महाकुंभात सहभागी होतात.
  7. महाकुंभ 2025 च्या पहिल्या दिवशी किती भाविकांनी स्नान केले?
    पहिल्या दिवशीच 3.5 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले.
  8. महाकुंभाचे धार्मिक महत्त्व काय आहे?
    महाकुंभाला सनातन धर्मात सर्वात पवित्र मानले जाते. येथे स्नान केल्याने मोक्ष मिळतो, असे श्रद्धाळू भाविकांचे मत आहे.
  9. महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो?
    महाकुंभात सीसीटीव्ही, ड्रोन, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर व्यवस्थापनासाठी करण्यात आला आहे.
  10. महाकुंभाच्या सांगतेची तारीख कोणती आहे?
    महाकुंभ 2025 ची सांगता 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होईल.
  11. संगमावर स्नान का केले जाते?
    गंगा, यमुना, आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने पापमुक्ती होते आणि मोक्षाची प्राप्ती होते, असा भाविकांचा विश्वास आहे.
  12. महाकुंभ मेळाव्याचे मुख्य आकर्षण काय आहे?
    महाकुंभात लाखो भाविक, संत, महंत, आणि विविध आखाड्यांतील साधू-संतांचे दर्शन व प्रवचन हे मुख्य आकर्षण असते.
  13. महाकुंभाला परदेशी भाविक का आकर्षित होतात?
    महाकुंभ भारतीय संस्कृती, अध्यात्म, आणि परंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळे विविध देशांतील लोक या उत्सवात सहभागी होण्यास प्राधान्य देतात.
  14. महाकुंभ 2025 हा मेळावा का खास मानला जातो?
    144 वर्षांनंतर आलेला महाकुंभ संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक सोहळा आहे, ज्यामध्ये कोट्यवधी लोक एकत्र येऊन श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव साजरा करतात.

धन्यवाद!


येथून शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top