राज्यात पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री!

या दिवशी घेणार फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्मंत्री पदाची शपथ.

२३ नोव्हेंबर २०२४ ला लागलेल्या विधानसभेच्या निकालानंतर हे स्पष्टच समोर आला की भाजप आणि मित्र पक्षांना बहुमत मिळत त्यांचंच सरकार येणार हे स्पष्ट झालं. निकालानुसार भाजपला १३२ त्यांचे मित्र पक्ष शिंदेंची शिवसेना ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ४१ जागा मिळवण्यात यश मिळाले. या आकडेवारीनुसार २८८ पैकी २३६ जागा मिळवत महायुतीने पूर्ण एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून म्हणजेच महायुतीने मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये एक हाती सत्ता मिळवल्यामुळे ते आता महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पात्र ठरलेले आहेत. माहिती सरकारने महाराष्ट्र सत्ता मिळवली असली तरी आता त्यांच्यासमोर मुख्यमंत्री पद तसेच कॅबिनेट मंत्री पदासाठी देखील खूप मोठी सुरू असल्याचे समोर येत आहे.

आता तीन पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या माहितीमध्ये अनेक दिग्गज नेते अनेक आजी-माजी आमदार आणि मंत्री असलेले नेते समाविष्ट आहेत. त्यामुळे महायुतींच्या त्यामुळे महायुतीच्या पक्षप्रमुखांकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करणे म्हणजे एक खूप मोठे आव्हान मानावे लागेल. तर आता सर्व महाराष्ट्र राज्याचे तसेच संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिलेले आहे की कोण कोणत्या आमदार झालेल्या नेत्यांना मंत्रिपदाची माळ गळ्यात पडणार आहे. तसेच प्रत्येक आमदाराकडून मंत्रिपदासाठीची रस्सीखेच देखील सुरू होऊन झालेले आहे. मलाच मंत्रिपद मिळाले पाहिजे अशी भावना देखील महायुतीच्या बऱ्याच नेत्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे.

पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर महायुतीपुढे सरकार स्थापन करण्याचे फार मोठे संकट उभे झाले होते. त्यात एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. थोडक्यात महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु होती. मग दिल्ली दरबारी पर्यंत हा विषय वाढत गेला होता. तरीपण हा तिढा काय सुटेना असा प्रकार समोर येत होता. यातूनच पुन्हा एकदा सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आणि त्यांची एक मताने मुख्यमंत्री पदासाठी निवड केली.

यानंतर ५ डिसेंबर २०२४ आझाद मैदान मुंबई येथे शपथ विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर संभाव्य मंत्री पदासाठी कोणा कोणाची वर्णी लागू शकते,

शिवसेना शिंदे गट

  • एकनाथ शिंदे.
  • दादा भुसे
  • शंभूराज देसाई
  • गुलाबराव पाटील
  • अर्जून खोतकर
  • उदय सामंत

भारतीय जनता पार्टी

  • रवींद्र चव्हाण
  • गणेश नाईक
  • नितेश राणे
  • मंगलप्रभात लोढा
  • आशिष शेलार
  • राहुल नार्वेकर
  • अतुल भातखळकर
  • शिवेंद्रसिंहराजे भोसले
  • गोपीचंद पडळकर
  • माधुरी मिसाळ
  • राधा कृष्ण विखे पाटील
  • चंद्रशेखर बावनकुळे
  • संजय कुटे
  • गिरीश महाजन
  • पांकजा मुंढे
  • जयकुमार रावल

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस

  • अजित पवार
  • आदिती तटकरे
  • छगन भुजबळ
  • दत्ता भरणे
  • धनंजय मुंढे
  • अनील पाटील
  • नरहरी झिरवळ
  • संजय बनसोडे
  • संग्राम जगताप
  • सुनील शेलके

इत्यादी आमदार मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत. तर अशाप्रकारे वरील दिलेल्या काही महायुतीच्या प्रमुख नेत्यांना जे की आता विधानसभेमध्ये आमदार म्हणून जनतेतून निवडून आलेले आहेत त्यांना मंत्रिपदाची ऑफर मिळू शकते. परंतु महायुती सरकारचे जे पक्षश्रेष्ठ आहेत ते कोणत्या गुणवत्तेच्या आधारे किंवा आत्तापर्यंतच्या त्या आमदारांनी केलेल्या त्यांच्या मतदारसंघातील कामांच्या आधारे किंवा जनसंपर्काच्या आधारे अशा प्रकारच्या कोणत्या गुणवत्तेच्या आधारे आमदारांना मंत्रिपद बहाल करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे. निकाल लागल्यानंतर संपूर्ण राज्याभरामध्ये सर्वांच्या लक्षात आले की महायुतीचे सरकार राज्यामध्ये पुन्हा एकदा येणार असून परंतु मागच्या पंचवार्षिक मध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले होते. मग आता झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार यासाठी एकनाथ शिंदेंकडून देखील इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे.

बरेच दिवसांच्या चाललेल्या राजकीय नाट्यमय वातावरणातून शेवटी मुख्यमंत्री पदासाठी महायुतीच्या सर्व आमदारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामर्थक करण्यात आलेला आहे. आणि मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद आणि काही प्रमुख पदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री पद आणि महसूल विभागाचे तसेच काही महत्त्वाचे खाते देण्याचा निर्णय महायुतीच्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. 5 डिसेंबर 2024 या दिवशी आझाद मैदान मुंबई येथे महायुतीचा सरकारचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी देशातील तसेच राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले आहे. आता वरील दिलेल्या यादी पैकी कोणाकोणाला मंत्रिपदाची शपथ घेताना पहाता येईल हे पाच डिसेंबर या रोजी समजून जाईल.

येथून शेअर करा

Leave a Comment