नमस्मकार , महाराष्ट्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. सामाजिक बांधिलकी जपणारा एक नवीन जीआर महाराष्ट्र सरकारने नुकताच घोषित केला आहे ते म्हणजे दिव्यांग व्यक्तींना विवाह करिता अनुदान देणे. दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी अशा प्रकारे मदत करून त्यांच्या नवीन आयुष्याला पाठिंबा पाठबळ व नवीन दिशा देणारा ( दिव्यांग विवाह योजना ) हा एक कौतुकाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. आर्थिक अडचणींचा सामना सर्वांनाच करावा लागतो अशातच दिव्यांग व्यक्तींकरता विवाहाचा खर्च म्हणजे एक वैयक्तिक मोठी जबाबदारीचा खर्च असतो व त्यांचेही अडचण ओळखून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन म्हणून आर्थिक सहाय्य देण्यासाठी Divyang Vivah Yojana ही योजना राबविण्यात येत आहे.
2025 मधील नवीन नियमानुसार आता या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्ती स्वतः किंवा त्यांचा जोडीदार या दोघांनाही शासनाकडून अनुदान मिळत आहे. यामध्ये जोडीदार एकता दिव्यांग असेल तर 1.5 लाख रुपये आर्थिक मदत मिळेल व विवाहित जोडपे दोघेही दिव्यांग असतील तर दोघांना मिळून 2.5 लाख रुपये आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा करून एक मोठी मदत दिव्यांग व्यक्तींना दिली जाणार आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींना समाजात वावरताना आपुलकी स्थैर्य व जीवन जगण्यासाठी एक चांगला दृष्टिकोन मिळेल.
महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी विविध योजना राबवण्यात येतात. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. विवाह ही सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बाब लक्षात घेऊन दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने ही योजना राबवली जाते. अलीकडेच या योजनेमध्ये महत्त्वाचे बदल करून अनुदानाच्या रकमेतील वाढीस मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय आणि तारीख
राज्य शासनाने दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी Divyang Vivah Yojana दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेसंदर्भात सुधारित शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार सामाजिक सुरक्षा अंतर्गत ही योजना नवीन सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण राज्यात राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे.
Divyang Vivah Yojana योजना काय आहे
Divyang Vivah Yojana ही दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जाणारी आर्थिक सहाय्य योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र विवाह झाल्यानंतर शासनाकडून ठरावीक रकमेचे अनुदान दिले जाते. पूर्वी ही योजना केवळ सव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी मर्यादित होती. आता या योजनेत सुधारणा करून दिव्यांग ते दिव्यांग विवाहालाही अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत ही योजना राबवली जाते.
पात्र योजना कोणासाठी आहेत
Divyang Vivah Yojana या योजनेचा लाभ दोन प्रकारच्या विवाहासाठी दिला जातो. पहिला प्रकार सव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीचा विवाह आणि दुसरा प्रकार दिव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीचा विवाह. या दोन्ही प्रकारांतील वधू किंवा वर यांच्याकडे किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. हे दिव्यांगत्व आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजेच युडिआयडीद्वारे प्रमाणित असणे बंधनकारक आहे. वधू किंवा वर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाह हा दोघांचाही पहिला विवाह असावा. घटस्फोटित असल्यास यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. विवाह कायदेशीर पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
अनुदानाची रक्कम आणि वितरण पद्धत
सव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी एक लाख पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. दिव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी दोन लाख पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ही संपूर्ण रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने जमा केली जाते. मिळालेल्या अनुदानापैकी पन्नास टक्के रक्कम पाच वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये ठेवणे बंधनकारक आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना वापरता येते.
अर्ज करण्याच्या अटी आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आधार संलग्न वैश्विक ओळखपत्र युडिआयडी विवाह नोंदणी प्रमाणपत्र वधू आणि वराचे आधार कार्ड पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्याचा तपशील आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया आणि छाननी
लाभार्थ्यांनी शासन निर्णयामध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयाकडे सादर करावा लागतो. जिल्हा कार्यालयामार्फत अर्जाची प्राथमिक छाननी केली जाते. पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीकडे पाठवले जातात. या निवड समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. समितीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सहायक आयुक्त समाज कल्याण हे सदस्य असतात. दिव्यांग कल्याण विभागाचा जिल्हास्तरीय अधिकारी सदस्य सचिव म्हणून कार्य करतो.
अर्ज निकाली काढण्याची कालमर्यादा
अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची योग्य ती छाननी करून तीस दिवसांच्या आत अर्ज निकाली काढण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना मंजूर अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
अर्ज नमुने आणि घोषणापत्र
या योजनेसाठी दोन स्वतंत्र अर्ज नमुने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सव्यांग आणि Divyang Vivah Yojana साठी एक अर्ज नमुना असून त्यामध्ये वधू वरांची माहिती दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक बँक खाते तपशील आणि आवश्यक कागदपत्रांची जोड आवश्यक आहे. दिव्यांग आणि दिव्यांग विवाहासाठी स्वतंत्र अर्ज नमुना देण्यात आला आहे ज्यामध्ये दोघांचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक माहिती जोडावी लागते. अर्जासोबत घोषणापत्र आणि हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे. माहिती खोटी आढळल्यास कायदेशीर कारवाई आणि लाभाची रक्कम परत घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.
सध्याची अर्ज स्थिती
ही योजना राज्यभर लागू करण्यात आली असून मागील एक वर्षात झालेल्या विवाहांसाठी देखील अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. सध्या पात्र लाभार्थी दोन्ही प्रकारच्या विवाहासाठी अर्ज करू शकतात.
निधीचा उपयोग
या Divyang Vivah Yojana अंतर्गत मंजूर करण्यात येणारा निधी थेट पात्र दाम्पत्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. या निधीचा उद्देश दिव्यांग दाम्पत्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाला आधार देणे हा आहे.
निष्कर्ष
दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना(Divyang Vivah Yojana) ही राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची योजना आहे. अनुदानाच्या रकमेतील वाढ आणि दिव्यांग ते दिव्यांग विवाहालाही लाभ देण्याचा निर्णय हा सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. योग्य अटी पूर्ण करून वेळेत अर्ज केल्यास पात्र दाम्पत्यांना या योजनेचा निश्चित लाभ मिळू शकतो.

दिव्यांग विवाह योजना (Divyang Vivah Yojana)थोडक्यात माहिती
| माहिती | तपशील |
|---|---|
| योजना | दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना |
| उद्देश | दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य |
| पात्र विवाह | 1. सव्यांग + दिव्यांग 2. दिव्यांग + दिव्यांग |
| अनुदान | सव्यांग+दिव्यांग: ₹1,50,000 दिव्यांग+दिव्यांग: ₹2,50,000 |
| अर्ज कालमर्यादा | विवाहानंतर 1 वर्ष |
| मुख्य अटी | – किमान 40% दिव्यांगत्व – महाराष्ट्र रहिवासी – प्रथम विवाह – विवाह नोंदणीकृत |
| कागदपत्रे | UDID प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, बँक खाते, रहिवासी दाखला |
| अधिकृत वेबसाईट | sjsa.maharashtra.gov.in |
तुम्हाला हेही वाचायला आवडेल – Jamin Kharedi Yojana 2025 | जमीन खरेदी अनुदान योजना 2025 दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना – संपूर्ण माहिती
दिव्यांग विवाह योजना साठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न
1. दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना म्हणजे काय?
ही योजना दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन राबवत आहे.
2. या योजनेअंतर्गत कोण पात्र आहे?
- सव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीचा विवाह
- दिव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीचा विवाह
- वधू किंवा वर किमान 40% दिव्यांगत्व असणे आवश्यक
3. वधू-वरांनी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
- आधार संलग्न युडिआयडी
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र
- बँक खाते तपशील
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला
4. अनुदानाची रक्कम किती आहे?
- सव्यांग आणि दिव्यांग विवाहासाठी: ₹1,50,000
- दिव्यांग आणि दिव्यांग विवाहासाठी: ₹2,50,000
5. अनुदान कसे मिळते?
ही रक्कम थेट पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात जमा केली जाते.
6. अनुदानाचा किती भाग मुदत ठेवेत ठेवावा लागतो?
अनुदानाचा 50% रक्कम पाच वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये ठेवणे बंधनकारक आहे.
7. अर्ज कधी करावा लागतो?
विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा.
8. अर्ज कुठे सादर करावा?
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाकडे.
9. अर्ज प्रक्रियेत कोण सहभागी असतो?
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (अध्यक्ष)
- जिल्हा आरोग्य अधिकारी
- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
- सहायक आयुक्त समाज कल्याण
- जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण अधिकारी (सदस्य सचिव)
10. अर्ज छाननी किती वेळेत होते?
अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत छाननी करून निकाल काढला जातो.
11. अर्ज नमुना कुठून मिळवता येईल?
योजनेसाठी दोन अर्ज नमुने आहेत:
- सव्यांग-दिव्यांग विवाह
- दिव्यांग-दिव्यांग विवाह
12. घोषणापत्राची आवश्यकता आहे का?
हो, अर्जासोबत घोषणापत्र आणि हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
13. पूर्वी लाभ घेतलेला असल्यास अर्ज करता येईल का?
जर पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर अर्ज करता येणार नाही.
14. विवाह नोंदणी अनिवार्य आहे का?
हो, विवाह कायदेशीर पद्धतीने नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
15. अनुदानाचा उद्देश काय आहे?
दिव्यांग दाम्पत्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे आणि वैवाहिक जीवनाला आधार देणे.
16. राज्यातील कोणत्या भागासाठी योजना लागू आहे?
ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर लागू आहे.
17. मागील विवाहासाठी अर्ज करता येईल का?
हो, मागील एक वर्षात झालेल्या विवाहांसाठी अर्ज करता येईल.
18. दिव्यांगत्व प्रमाणपत्र कसे प्रमाणित करावे?
यूआयडी/आधार संलग्न वैध प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करावे.
19. अनुदान रक्कम वापरात कोणती मर्यादा आहे?
अनुदानाचा अर्धा भाग (50%) मुदत ठेवेत ठेवावा, उर्वरित रक्कम वापरता येईल.
20. योजनेचा फायदा कोण मिळवू शकतो?
योग्य अटी पूर्ण करणारे पात्र दिव्यांग दाम्पत्य.
या व्यतिरिक्त आपणास अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मधे नक्की विचारा
धन्यवाद !
1 thought on “Divyang Vivah Yojana|दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना अनुदानात वाढ वाचा सविस्तर माहिती इथे”