Ankita Walawalkar Biography | अंकिता वालवलकर जीवन चरित्र
Ankita Walawalkar Biography मराठी रीयालीटी शो बिग बॉस मराठी सीझन 5 ने अनेक टॅलेंटेड कलाकार आणि त्यांच्या खास स्टोरीज समोर आणल्या आहेत. या सीझनमध्ये एक नाव सतत चर्चेत आहे – अंकिता वालावलकर. ankita walawalkar सिंधुदुर्गमधील देवबागच्या या मुलीने आपल्या साधेपणाने आणि बिनधास्त स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अवघ्या 29 वर्षाच्या अंकिताने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून सोडले आहे. ankita walawalkar age,
अंकिताचा प्रवास एका साध्या गावातील मुलगी ते एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर,अभिनेत्री, आणि सामाजिक कार्यकर्ता बनण्यापर्यंतचा आहे. चला,जाणून घेऊया तिच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती.
Ankita Walawalkar Biography
अंकिताचा जन्म 16 फेब्रुवारी 1995 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे झाला. Ankita walawalkar birth date देवबागचे निसर्ग सौंदर्य आणि तिथला कोकणी संस्कार तिच्या स्वभावात अगदी ठळकपणे दिसतो. तिचे वडील प्रभू वालावलकर यांनी तिला नेहमीच स्वातंत्र्य दिले आणि शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अंकिताचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्रातच झाले. अंकिताला लहानपणापासूनच अभिनय आणि कला क्षेत्राची खूप आवड होती. अंकिताला दोन बहिणी आहेत – प्राजक्ता आणि ऋतुजा. तीन बहिणींचे आपसातील नाते अतिशय घट्ट आहे, जे अंकिता अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून दाखवते. अंकिताने सिव्हिल इंजिनिअरिंग केले आहे. शिक्षण क्षेत्रात ती नेहमीच हुशार होती. ती सांगते की, तिच्या गावातील निसर्ग आणि पारंपरिक कोकणी घरं तिला नेहमीच प्रेरणा देतात.
अंकिताला तिच्या फॉलोअर्सने कोकण हार्टेड गर्ल असे टायटल दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती सतत आपल्या गावातील निसर्ग, परंपरा, आणि तिथल्या बोलीभाषेचा प्रचार करते. अंकिताचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.ती आपल्या गावातील लाईफस्टाइल, स्वयंपाक, आणि निसर्गाची झलक दाखवते.तिच्या पोस्ट्स फक्त फोटोज नाहीत, तर त्या कोकणाच्या सुंदर गोष्टी लोकांसमोर आणतात.
अंकिताचा एक युट्यूब चॅनल आहे जिथे ती गावातील विशेष गोष्टी, ट्रॅडिशनल फूड रेसिपीज, आणि ट्रॅव्हल व्लॉग्स शेयर करते.तिच्या चॅनलवर हजारो सब्सक्राइबर्स आहेत.
अंकिता वालावलकर ते कोकण हार्टेड गर्ल प्रवास – Ankita Walawalkar Biography
अंकिता शिक्षणात हुशार होतीच.पण म्हणतात ना कधी कधी 16 व्या वर्षात पाय घसरतो तसच काहीस तिच्या बाबतीत झालं.अंकिता 16 वर्षाची असताना एका मुलाच्या प्रेमात पडली त्यासाठी तिने घर देखील सोडलं पण काही दिवसांनी तिला त्या नात्याचा त्रास जाणवू लागला आणि तिने हे नाते तोडून पुन्हा आई वडिलांकडे येण्याचा निर्णय घेतला.आई वडिलांना ही तिची चूक पोटात घालून तिला स्वीकार केलं आणि तिथून खरी अंकिता वालावल हिने स्वतःला सावरून नव्या जोमाने नवीन पद्धतीने तिने आपल्या आयुष्याची सुरुवात केली.सोशल मीडिया वर बोलताना ती सांगते छोट्या छोट्या नारळ विकण्याच्या बिझनेस पासून तिने सुरुवात केली.सोशल मीडिया वर व्हिडिओ बनवणे सुरू केले.आणि आपल्या सोबत घडलेल्या घटनेमुळे खचून न जाता जोमाने ती पुन्हा उभी राहिली पुन्हा नवीन आयुष्य सुरु केलं.
हे सर्व चालू असताना अंकिताला त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता.पण तरीही तिने खूप कष्ट करून कोकणी हर्ट गर्ल ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अंकिताने सुरुवातीला tiktok वर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. पण थोड्या दिवसानंतर टिक टॉक बंद झाल्यामुळे तिने नंतर इंस्टाग्राम वरती व्हिडिओ टाकण्यास
सुरुवात केली. इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ बनवला होता तिने तिच्या वडिलाला एक ब्रँडेड शर्ट गिफ्ट दिला होता. तो व्हिडिओ प्रेक्षकांना एवढा आवडला की खूप लोकांनी तिला लाईक केले. व तो व्हिडिओ व्हायरल झाला . अशाच प्रकारे वेगवेगळ्या व्हिडिओ अंकिताचे व्हायरल होयला लागले. व अंकिता फेमस झाले.
हे सर्व चालू असताना अंकिताला खूप अडथळे आले खूप प्रॉब्लेम आले पण ती कुठल्याही अडथळ्याला न डगमगता तिने स्वतःचे काम चालू ठेवले . व अस्तित्व निर्माण केले. अंकिता आपल्या प्रेक्षकांना एवढं सांगू शकते की प्रेम कहानीतून अनुभव घेण्याची गरज आहे मुलींनी भावनेच्या भरात घेतलेला निर्णय पुढे जाऊन चुकीचा ठरू शकतो .याची जाणीव अंकिताने करून दिली. अंकिता असं म्हणते की आपण जेव्हा प्रेम करतो त्यावेळी आपल्या चुकीमुळे आपल्या आई-वडिलांना खूप गोष्टींचे प्रॉब्लेम येतात . आपण निर्णय घेताना विचारपूर्वक घेतला पाहिजे.
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी अगदी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वास्तवात ही तशाच घडतात असा एक गैरसमज झालेला आहे या सर्व चुकीच्या गोष्टी चित्रपटातून दाखवतात या चित्रपटातील चुकीच्या गोष्टींमुळे मुलांवर खूप मोठे वाईट परिणाम होतो. व मुले त्याचप्रमाणे वागायला लागतात खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून कुठलाही निर्णय घेताना आपल्या आई-वडिलांशिवाय निर्णय घेऊ नये असे अंकिता सर्वांना सांगते. कारण आपण लहान असतो आपल्याला त्या गोष्टीची समज नसते म्हणून आपला निर्णय हा चुकू शकतो .नंतर सगळ्यांनाच त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. अंकिता सांगते की मी माझा निर्णय चुकीचा घेतल्यामुळे मला त्याचा खूप त्रास झाला.
अभिनय क्षेत्रात पदार्पण – Ankita Walawalkar Biography
अंकिता फक्त सोशल मीडिया स्टार नाही, तर ती एक टॅलेंटेड अभिनेत्रीही आहे. तिने मराठी सीरियल्स आणि शॉर्ट फिल्म्समध्येही काम केले आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली आहे.अंकिताला खरी प्रसिद्धी मध्ये बिग बॉस मराठी सीझन 5 मधून मिळाली.तिच्या साधेपणाने आणि स्वाभिमानी स्वभावाने ती घरातील इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरली.’कसे विसरू तूच मोरया’ या सिरीयल मध्ये देखील अंकिताने काम केले.
सामाजिक कार्य आणि व्यावसायिक जीवन – Ankita Walawalkar Biography
अंकिता केवळ एक सोशल मीडिया स्टार नाही, तर ती सामाजिक कार्यकर्ता आणि व्यावसायिक महिला आहे.ती आपल्या गावातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करते. पर्यावरण वाचवण्यासाठी ती सातत्याने काम करते. अंकिताचा कोकणातील महिला उद्योजकता वाढवण्यावरही जोर आहे.अंकिता ही सामाजिक कार्यकर्ते व्यवसायिक महिला उद्योजिका, यूट्यूब,वर इंस्टाग्राम अशा प्रकारचे छोटे-मोठे बिझनेस करते . अंकिताचा कोकण हर्ट गर्ल असा यूट्यूब चैनल आहे . या चैनल वर अंकिता कोकणातील सौंदर्य व तेथील नैसर्गिक वातावरणाचे व ऐतिहासिक गोष्टींचे व्हिडिओ च्या माध्यमातून माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवते. अंकिता ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये कमवते फक्त इंस्टाग्राम किंवा युट्युब नाही तर तिचे इतर अनेक व्यवसाय देखील आहेत.सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी अंकिताचे एक सुंदर रेस्टॉरंट आहे . वालवलस्करची बीच रिसॉर्ट या नावाने हे रेस्टॉरंट आहे. अंकिताचे आई-वडील ते रेस्टॉरंट सांभाळतात.
Ankita Walawalkar Biography
अंकिता वालावलकर फक्त एक नाव नाही, तर ती कोकणाची ओळख आहे. तिच्या साधेपणात आणि निसर्गप्रेमात एक वेगळाच आकर्षण आहे. सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. व सर्व चाहत्यांना त्यांच्या लग्नाबद्दल खूप आतुरता आहे.अंकिता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे, हे तिने सोशल मीडियावर सांगितले आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल तिने खुलासा केलेला आहे कुणाल भगत सोबत ती लग्नगाठ बांधणार आहे .कुणाल हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक असून ते गायन लेखन देखील करतात .कुणाल यांनी अनेक चित्रपट आणि मैलीकांसाठी देखील संगीत दिग्दर्शन केले आहे . झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका पारू चे Title song कुणाल ने बनवले आहे असेच अनेक प्रसिद्ध music कुणाल ने दिले आहेत.
सारांश – Ankita Walawalkar Biography
अंकिताचे यश फक्त नशिबावर नाही, तर तिच्या मेहनतीवर आधारित आहे. तिच्या गावातील साधेपणा तिने कधीच विसरला नाही. सोशल मीडियाचा योग्य वापर करून तिने आपले एक स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार केले आहे. अंकिताची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. ती म्हणते की जिथे स्वप्न आहेत, तिथे यश नक्कीच असते.तिचा साधेपणा आणि स्वाभिमान तिला इतरांपेक्षा खास बनवतो. प्रेक्षकांना तिची व्यक्तिमत्व आणि तिची मेहनत खूप आवडते. अंकिताला तिच्या अभिनयासाठी आणि मॉडलिंग साठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारामुळे अंकिताचे मराठी इंडस्ट्रीज मधले स्थान मजबूत झाले आहे. हे पुरस्कार मिळवण्यासाठी अंकिताने खूप मेहनत घेतली.
काही लोक तिला troll करतात comment करतात पण ती लक्ष न देता तीच काम करत राहते . खर तर सर्वांनी हे शिकायला हव कि सोशल media वर कोणाला काही बोलण्यापेक्षा आपण देखील सोशल media चा चांगला वापर करावा .स्वतःचा वेळ चांगले कार्य करण्यात सत्कारणी लावावा .
Ankita Walawalkar सोशल मिडिया
Ankita Walawalka Instagram (इथे पहा )
Ankita Walawalka Youtube (इथे पहा)
Ankita Walawalka facebook – (इथे पहा )
इतर मनोरंजन विश्वातील बातम्यासाठी खाली वाचा
बिग बॉस मराठी सीझन 5 – Big Boss Marathi season 5 – (इथे वाचा )
Vikrant Massey Retirement च खर कारण आल समोर ( इथे वाचा )
नागा चैतन्या Naga Chaitanya माहिती (इथे वाचा )
Sai Tamhankar Biography | सई ताम्हणकर जीवन चरित्र – (इथे वाचा )
प्राजक्ता माळी बियोग्राफी –(इथे वाचा )
धन्यवाद !