Amrut Yojana Maharashtra |अमृत योजना 2025 टायपिंग आणि शॉर्टहँड(GCC-TBC) प्रमाणपत्र धारकांसाठी आर्थिक मदत योजना

Amrut Yojana Maharashtra – टायपिंग आणि शॉर्टहँड प्रमाणपत्र धारकांसाठी आर्थिक मदत योजना

नमस्कार , आज आपण महाराष्ट्र शासनाकडून राबवली जात असणारी अमृत योजना Amrut Yojana Maharashtra,याबद्दल माहिती पाहणार आहोत. नेमकी काय आहे ही Amrut Yojana? याचे लाभ कोण कोण घेऊ शकेल ? पात्रता काय आहे ? कागदपत्र कोणकोणती लागतील ? अर्ज कसा करावा ? अशी A to Z सविस्तर amrut yojana in marathi माहिती या लेखात पाहणार आहोत.

अमृत योजना म्हणजे “अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग” Amrut yojana full form (Academy Of Maharashtra Research, Upliftment And Tarining) म्हणजेच याचा शॉर्ट फॉर्म अमृत (AMRUT) असा होतो. राज्यातील खुल्या प्रवर्गातील म्हणजे ओपन कॅटेगरी मधील युवक युवतींना जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी व इतर उमेदवार आहेत, इत्यादींचा विकास घडवण्यासाठी त्यांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये, वैयक्तिक विकास, व्यवसाय उद्योग इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यांचा विकास व्हावा म्हणून अमृत या संस्थेची स्थापना महाराष्ट्र सरकारने दिनांक 22 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाद्वारे घेतलेली आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. या संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यातीलच एक योजना म्हणजे शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा (GCC-TBC)उत्तीर्ण उमेदवार यांच्याकरिता राबविण्यात येत आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती खाली पाहूया.

Amrut Yojana Maharashtra योजनेचा उद्देश

  • Amrut Yojana Maharashtra या योजनेच्या माध्यमातून ‘शासकीय संगणक टंकलेखन’ बेसिक कोर्स केलेल्या उमेदवारांना व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून, महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील,आर्थिक दुर्बल घटकातील ,उमेदवारांना स्वयंरोजगार मिळवून देणे, उद्योगाकरिता उभे करणे ,रोजगार क्षम बनवणे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून टायपिंग व लघुलेखन प्रमाणपत्र धारकांसाठी एक आर्थिक मदत म्हणून ही योजना राबवली जात आहे. या योजनेत पात्र उमेदवारांना एक आर्थिक रक्कम सहाय्य म्हणून दिली जाते.

Amrut Yojana typing
Amrut Yojana Maharashtra

ही योजना कोणासाठी आहे ?

आपल्याला माहिती आहे खुल्या प्रवर्गातील जातींना कोणत्याही शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या पात्रता अटींमध्ये मोडल्या जाणाऱ्या गटातील जातींचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, युवक युवती,ज्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवारांकरिता ही योजना आहे.

लाभाचे स्वरूप

  1. ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) उत्तीर्ण केली आहे व टायपिंग स्पीड मराठी/हिंदी किंवा इंग्लिश करिता 30,40,50 व 60 शब्द प्रति मिनिट करू शकणाऱ्या उमेदवारांना 6500 प्रोत्साहन म्हणून अर्थसहाय्य दिले जाईल.
  2. ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन यामध्ये मराठी/ हिंदी भाषेमध्ये उत्तीर्ण केली आहे व टायपिंग स्पीड 60,80,100 व 120 शब्द प्रति मिनिट असावा. व इंग्रजी लघुलेखन करिता टायपिंग स्पीड 60,80,100,120,130,140,
    150 व 160 शब्द प्रति मिनिट अशी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना 5300 प्रोत्साहन म्हणून अर्थसहाय्य दिले जात आहे.
  3. या व्यतिरिक्त दुसरे कोणते शुल्क लाभार्थ्यांना मान्य राहणार नाही.

लाभार्थ्यांसाठी पात्रता अटी काय आहेत ?

  1. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे वय 18 ते 45 वर्ष च्या दरम्यान असावे.
  2. अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून आर्थिक मदत घेतलेली नसावी. तसे स्वयंघोषणापत्र व संस्थाचालकाचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागेल.
  3. तुम्ही टायपिंग लघुलेखन कोर्स कोर्स पूर्ण केला आहे हे दाखवणारे प्रमाणपत्र लागेल.
  4. या परीक्षेसाठी जमा केलेली फी ची पावती स्वस्वाक्षरी मध्ये लागेल.
  5. बँक खात्याची संपूर्ण माहिती.असे बँक खाते जिथे आपले आधार कार्ड जोडलेले लिंक केलेले आहे.
  6. या अगोदर या परीक्षेकरिता कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा.

Amrut Yojana
Amrut Yojana Maharashtra

आवश्यक कागदपत्रे

  1. टायपिंग किंवा लघुलेखन प्रमाणपत्र
  2. फी भरलेली पावती.
  3. बँक पासबुक आधार कार्ड लिंक केलेले.

अर्ज कसा करावा ?

  1. या योजनेसाठी अर्ज तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून देखील करू शकता अर्ज करण्यासाठी इथे दिलेल्या अमृत संस्थेच्या सरकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लिंक इथे दिली आहे त्यावरून देखील तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता.
  2. या योजने करता अर्ज करताना सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल. त्यासाठी सुरुवातीला साइन इन (sign in) करून रजिस्ट्रेशन करावे लागेल. 3.साइन इन केल्यावर तुम्हाला आधार क्रमांक व मोबाईल नंबर विचारला जाईल तो टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल.
  3. ओटीपी आल्यानंतर पुढे आपल्या स्वतःचा आधार कार्ड लिंक असल्यामुळे स्वतःचे नाव पत्ता सर्व माहिती येईल. I agri वर क्लिक करून पुढे जा.
  4. पुढे विचारलेली संपूर्ण माहिती भरा.

अर्ज करताना सर्व कागदपत्र व्यवस्थित अपलोड करावी. अर्ज पूर्ण झाल्यानंतर त्याची एक कॉपी प्रिंट घेऊन आवश्यक कागदपत्रांसह स्पीड पोस्ट द्वारे अमृत चा पुणे येथील कार्यालयाला पाठवावे लागतील फक्त ऑनलाईन अर्ज सादर करून होणार नाही. अर्ज करून झाल्यानंतर ती प्रिंट अमृतचा पुणे ऑफिसला पाठवणे गरजेचे आहे. करिता अमृत संस्थेचा पूर्ण पत्ता खाली दिला आहे.


Amrut Yojana Maharashtra
Amrut Yojana Maharashtra

AMRUT OFFICE ADRESS

Email: info@mahaamrut.org.in
Mobile: 9730151450
Website: www.mahaamrut.org.in
Location: Academy Of Maharashtra Research, Upliftment & Training ( Amrut ),
Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhavan, Fifth Floor, Aundh, Pune 411067.
Mahaamrut

अर्ज करण्याची लिंक


उमेदवाराचे स्वयांघोषणा पत्र डाऊनलोड करण्यासाठी
संस्थाचालकांचे स्वयांघोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी

सर्व लिंक खाली टेबल मधे दिल्या आहेत.

AMRUT शासकीय वेबसाईट इथे क्लिक करा
योजने बद्दल माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
उमेदवाराचे स्वयंघोषणापत्र pdf डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
संस्थाचालकांचे स्वयंघोषणापत्र pdf डाऊनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा
इतर सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – घरकुल योजना 2025 अर्ज प्रक्रिया,अनुदान,निवड,ऑनलाइन अर्ज कसा करावा?आणि संपूर्ण माहिती

अमृत योजना 2025 ही महाराष्ट्र सरकारने तयार केलेली एक अशी महत्त्वाची योजना आहे ज्यामुळे खुल्या प्रवर्गातील अशा गरजू उमेदवारांना या योजनेचा फायदा होईल. काही माहितीनुसार ही योजना 2024 मध्ये व त्यानंतर टायपिंग व लघुलेखन प्रमाणपत्र धारकांनाच लागू आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील टायपिंग आणि लघुलेखन प्रमाणपत्र धारकांना स्वतःचे स्किल तयार करता येईल व यासाठी शासकीय आर्थिक मदत देखील मिळेल. आवश्यक कागदपत्रांसह व्यवस्थित अर्ज करत असाल तर योजनेचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल. या योजनेकडे रोजगाराची एक संधी म्हणून देखील पाहता येईल.
तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व या योजनेबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. 

धन्यवाद !


येथून शेअर करा

Leave a Comment