Bhimashankar Jyotirlnga Pune | भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व,कसे जायचे? टायमिंग,इतर प्रेक्षणीय स्थळे व संपूर्ण माहिती मराठीत

नमस्कार आज आपण या लेखांमध्ये Bhimashankar Jyotirlnga Pune विषयी संपूर्ण माहिती मराठीत पाहणार आहोत. bhimashankar Information in Marathi भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी  एक ठिकाण आहे. bhimashankar jyotirlinga भीमाशंकर हे मंदिर संपूर्ण भारतात खूप प्रसिद्ध आहे. bhimashankar temple भीमाशंकर जी शिवपिंड आहे, ती स्वयंभू आहे. original bhimashankar shivling भीमाशंकर bhimashankar ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व यासाठी ओळखले जाते. पुणे जिल्ह्यात असलेल्या या यात्रेला दरवर्षी लाखो भाविक येतात. पुणे ते भीमाशंकर अंतर 100 किलोमीटर आहे. pune to bhimashankar distance  श्रावण महिन्यात भीमाशंकर ला खूप गर्दी असते.

Bhimashankar Jyotirlnga Pune ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व

Bhimashankar Jyotirlnga Pune हे भगवान शिव आणि माता पार्वतीचे पवित्र स्थान मानले जाते. हे तेच ठिकाण आहे जिथे भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. त्रिपुरासुराच्या नाशानंतर भगवान शिवाला घाम फुटला, ज्यामुळे भीमा नदीचा प्रवाह झाला, असे म्हटले जाते. या नदीचे नाव भीमाशंकरशी संबंधित आहे.भीमाशंकर मंदिराची वास्तू प्राचीन नगर शैलीत बांधलेली आहे. मंदिराचे मुख्य शिवलिंग स्वयंभू आहे, जे अद्भुत आणि दैवी उर्जेने परिपूर्ण आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे, तो अतिशय भव्य आहे. येथील सोन्या-चांदीने केलेली सजावट भाविकांना मंत्रमुग्ध करते.

अठराव्या शतकात नाना फडणवीस यांनी Bhimashankar Jyotirlnga Pune या मंदिराच्या कामात बदल केले. हे ज्योतिर्लिंग आकाराने मोठे आहे. त्यामुळे या त्याला मोठेश्वर महादेव असे म्हणतात. या मंदिराच्या सभा मंडपामध्ये एक मोठी घंटा बांधलेले आहे. ही घंटाची चिमाजी आप्पा यांनी भेट दिलेली आहे असे सांगितले जाते. या घंटीवर सण 1729 असे इंग्रजीमध्ये नाव टाकण्यात आलेले आहे. हे मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहाव्या ज्योतिर्लिंग आहे. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजे येऊन गेलेले आहेत असे सांगितले जाते शिवाजी महाराज राजाराम महाराज तसेच पेशवे बाळाजी इत्यादी राजे येऊन गेलेले आहेत.


Bhimashankar Jyotirlnga
Bhimashankar Jyotirlnga Pune

Bhimashankar Jyotirlnga Pune ला कसे जायचे?

बस आणि ट्रेनने

पुण्याहून भीमाशंकरला जाण्यासाठी १०० किमीचा प्रवास करावा लागतो.

छत्रपती शिवाजी नगर बसस्थानकातून भीमाशंकरला जाण्यासाठी  बसेस आहेत.

तुम्ही पुण्याहूनही कॅब बुक करू शकता.

जवळचे रेल्वे स्टेशन

पुणे रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तेथून भीमाशंकरला जाण्यासाठी टॅक्सी किंवा बस सहज उपलब्ध आहे.

भक्तांसाठी खास वेळ

श्रावण महिना  शिवभक्तांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे.

महाशिवरात्री या दिवशी लाखो भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी येतात.

कार्तिक पोर्णिमा हा काळ धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा मानला जातो.

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य

भीमाशंकर मंदिराभोवतीचा परिसर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखला जातो. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गासारखे आहे.

वनस्पती आणि प्राणी: वनस्पती आणि प्राणी यांच्या दुर्मिळ प्रजाती येथे पाहायला मिळतात.

मलबार जायंट स्क्विरल: स्थानिक भाषेत शेकरू असे म्हणतात.

हागफनी पॉइंट : ट्रेकिंग प्रेमींसाठी हा पॉइंट उत्तम ठिकाण आहे. म्हणून श्रावण महिन्यात  कपल्स आवर्जून जातात.

भीमाशंकर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध आहे. येथील ट्रेक मार्ग घनदाट जंगले, धबधबे आणि दऱ्यांतून जातो.


Bhimashankar temple
Bhimashankar Jyotirlnga Pune

प्रसिद्ध ट्रेक मार्ग:

शिवाजी ट्रेल: हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित कथा जिवंत करतो.

गणेश घाट पायवाट: ही पायवाट शांत आणि नयनरम्य आहे. फुले आणि प्रसाद मंदिराच्या बाहेर असलेल्या छोट्या स्टॉलवर अर्पण करण्यासाठी उपलब्ध असतात.

हस्तकला: तुम्ही स्थानिक बाजारपेठेत लाकडी मूर्ती आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करू शकता.

Bhimashankar Jyotirlnga Pune येथील निवास सुविधा

धार्मिक धर्मशाळा:

मंदिर परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळा उपलब्ध आहेत.

हॉटेल्स :

जर तुम्हाला आरामदायी मुक्काम हवा असेल तर तुम्ही पुणे किंवा जवळपासच्या शहरांमध्ये हॉटेल्स बुक करू शकता. भीमाशंकर पासून जवळ असलेल्या हॉटेल्स मध्ये देखील आपण राहू शकतात. तेथून जवळ असेल असलेल्या पर्यटकाचा आनंद घेऊ शकतात.

स्थानिक महाराष्ट्रीयन थाळी : 

इथली खासियत. मंदिराजवळ स्वादिष्ट वडा पाव आणि पोहे मिळतात. हे स्थानिक लोक आणि पर्यटकांमध्ये देखील लोकप्रिय आहेत. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सकाळी लवकर जा, जेणेकरून तुम्हाला जास्त गर्दीत दर्शन घ्यावे लागणार नाही.

श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे मोठी गर्दी असते . येथील हवामान वर्षभर थंड  असते. परंतु पावसाळ्यात हे ठिकाण सर्वात सुंदर दिसते.


Bhimashankar Jyotirlnga Pune
Bhimashankar Jyotirlnga Pune

निसर्गासह शिव दर्शन

Bhimashankar Jyotirlnga Puneचे नैसर्गिक सौंदर्य आणि अध्यात्मिक वातावरण त्याला खास बनवते. येथील घनदाट जंगले, उंच पर्वत, वाहणारी भीमा नदी यामुळे भाविकांना एका वेगळ्याच विश्वाची अनुभूती मिळते.

Bhimashankar Jyotirlnga Pune हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. भीमाशंकर येथून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्या पैकी एक नदी आहे. हिचा उगम भीमाशंकर येथून होतो. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत आहे. अतिशय घनदाट अरण्य आहे.1984 ला या आरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे.

या ठिकाणचे हेमांडपती मंदिर  1200 ते1400 पूर्वीची आहे. मंदिरावर केलेले सुंदर नक्षीकाम या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळते. श्रावण महिन्यात भीमाशंकर खूप गर्दी असते. सर्वत्र हिरवेगार व घनदाट जंगल पाण्याचे धबधबे खूप सुंदर दृश्य श्रावण महिन्या पाहायला मिळते. छत्रपती राजाराम महाराज भीमाशंकरला दर्शनासाठी येत असत. व पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील भीमाशंकरला दर्शनासाठी येत असल्याची नोंद आहे. भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपा बाहेर  लोखंडी घंटा आहे. ही घंटा चिमाजी आप्पांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते.

Bhimashankar Jyotirlnga Pune मंदिराची रचना

भीमाशंकर मंदिर हे नगारा शेलीच्या वास्तुकले पासून बनवण्यात आलेला आहे. या मंदिराची रचना ही प्राचीन आणि आधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेली आहे.  रामायण काळापासून हे मंदिर असल्याचे देखील सांगितले जाते. परंतु नाना फडणवीस यांनी अठराव्या  शतकामध्ये या मंदिरात बदल केलेले आहेत. 


Bhimashankar
Bhimashankar Jyotirlnga Pune

इतर प्रेक्षणीय स्थळे

1) गुप्त भीमाशंकर

भीमा नदीचा मूळ उगम ज्योतिलिंगात आहे. ती तेथून गुप्त होते. आणि मंदिरापासून जंगलात 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

2) कोकण कडा

भीमाशंकर मंदिराजवळील पश्चिमेला हा कडा आहे. या कड्याची उंची  1100 मीटर इतकी आहे. या कड्यावर उभे राहिले असता सुंदर व निसर्ग रम्य दृश्य पहायला मिळते. पर्यटक  श्रावण महिन्यात पाहण्यासाठी खूप गर्दी करतात. पाण्याचे वेगवेगळे धबधबे  श्रावण महिन्या या ठिकाणचे वातावरण अतिशय सुंदर व पाहण्यासारखे असते.

3) सिताराम बाबा आश्रम

कोकण कड्यापासून एक रस्ता सिताराम बाबा आश्रमाकडे जातो. हे आश्रम घनदाट जंगलात आहे. या ठिकाणी गाडीने देखील जाता येते.

4) नागफणी

या आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे . हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 1230 मीटर इतकी आहे. कोकणातून पाहिले असता हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून याला नागफणी  असे नाव देण्यात आले आहे.

Distance काही महत्वाची अंतरे

Pune to Bhimashankar Distance – पुणे ते भीमाशंकर अंतर – १२४ कि.मी. Shrirdi to Pune Distance – शिर्डी ते पुणे अंतर – १८५ कि.मी. Trimbakeshwar to Bhimashankar Distance – त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर अंतर – २३७ कि.मी. Nashik to Bhimashankar Distance – नाशिक ते भीमाशंकर अंतर – २०७ कि.मी. Ghrishneshwar to Bhimashanka – घृष्णेश्वर ते भीमाशंकर अंतर -३०३ कि.मी.

भीमाशंकर मंदिरातील पूजा पाठ

सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत जाता येते. भीमाशंकर मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी परवानगी.

पहाटे- 4:30 काकड आरती

पहाटे- 5:00 निजरूपदर्शन

पहाटे- 5:30 पहाटेची आरती

पहाटे- 5:30 ते दुपारी 12:00 पर्यंत अभिषेक करू शकतात. ज्यांना महादेवाला  अभिषेक करायचा आहे. त्यांना हा वेळ दिलेला आहे.

दुपारी- 12:00 नैवेद्य पूजा

दुपारी- 12:30 आरती

दुपारी- 3:30 मध्यान आरती

संध्याकाळी- 7:30 आरती

भीमाशंकर मंदिरात होणारे उत्सव

भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी भारतातील एक तीर्थक्षेत्र आहे. प्रत्येक दिवशी या ठिकाणी शंकराची पूजा अर्चा केली जाते. तसेच भीमाशंकर मंदिरामध्ये महाशिवरात्री ,श्रावण सोमवार, कार्तिक पौर्णिमा, गणेश चतुर्थी, व दीपावली या सणाच्या निमित्ताने वेगवेगळे असतात.


pune to bhimashankar distance
Bhimashankar Jyotirlnga Pune

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – माहूर गडाची संपूर्ण माहिती,रेणुका माता इतिहास, रेणुका माताआरती pdf व संपूर्ण माहिती मराठीत

श्रावण सोमवार

    ऑगस्ट महिन्यामध्ये मराठी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शंकराला आवडणारे बेलपत्र आणि  पांढरा फुलाचे आरास केली जाते. तुपाचे किंवा तेलाचे दिवे संपूर्ण मंदिरात लावले जातात.

महाशिवरात्री

महाशिवरात्रीला पाच दिवसाची भरली जाते. त्यादिवशी भगवान शंकर व देवी पार्वती यांचा विवाह  सोहळा साजरा केला जातो.  पूजा भजन व अभिषेक करतात. पूर्ण भारतातून हजारो भाविक या ठिकाणी हा सोहळा बघण्यासाठी येतात.

कार्तिक पौर्णिमा

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कार्तिक पौर्णिमा असते. या दिवशी शंकराने त्रिपुराचा वध केला असे सांगितले जाते.  त्या दिवशी भगवान शंकराच्या कार्तिकीय नावाच्या पुत्राचा जन्म झाला होता असेही मानले जाते. म्हणून कार्तिक पौर्णिमा हा उत्सव मोठ्या थाटामाटा साजरा केला जातो.

भीमाशंकर विषयी विकिपीडिया वारी माहिती इथे वाचा (OPEN)

भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण आहे. या ठिकाणी लोक श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला लाखोच्या संख्येने जातात. येथील वातावरण खूप निसर्गरम्य असून पर्यटकांना पाहण्यासारख्या खूप गोष्टी या ठिकाणी आहेत. ठिकाणी मंदिरात आपण लघु रुद्र व अभिषेक करू शकतो.

येथून शेअर करा

1 thought on “Bhimashankar Jyotirlnga Pune | भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व,कसे जायचे? टायमिंग,इतर प्रेक्षणीय स्थळे व संपूर्ण माहिती मराठीत”

Leave a Comment