Follow these life rules

आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल, मनातील ध्येय गाठायच असेल तर या गोष्टी आचरणात आणा

या जगात प्रत्येकाला अस वाटत की आपण आयुष्यात सगळ काही मिळवावं पैसा, प्रतिष्ठा, दीर्घायुष, निरोगी शरीर आणि अजून जे जे चांगले आहे असे वाटते ते ते मला पाहिजे अशी प्रत्येकाची स्वप्ने असतात. पण मग स्वप्नं जर का पूर्ण करायची असतील तर त्यासाठी तेवढं कष्ट पण घ्यावं लागेल नाहीतर या जगात फुकट ख भेटतं?

तर माणसाच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या गोष्टी आचरणात आणल्या की सर्व काही मनासारखं होत. तर मी इथे काही आयुष्याचे काही सुवर्ण नियम देतोय जे आचरणात आणले तर तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल

  • कोणाच्याही हातात हात देताना उठून उभे रहा आणि हसायला विसरू नका.
  • काही वाटून घेताना समोरच्याला पहिली ऑफर कधीच देऊ नका
  • जर कोणी तुम्हाला काही गुपित सांगितलं तर त्या व्यक्तीचा विश्वास कधीच तोडू नका ते गुपित गुपितच ठेवा.
  • जर एखाद्याने तुम्हाला काही वस्तू वापरायला दिली तर ती आहे अशी परत द्यायला विसरू नका.
  • कोणते ही काम असो कितीही लहान अथवा कितीही मोठे ते जोमाने सुरू करा.
  • संभाषण करताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोला.
  • एकट्याने प्रवास करा यामुळे खूप अनुभव भेटेल
  • शाळेत किंवा ऑफिस मधे नवीन व्यक्तीला सोबत घ्या त्याच्याशी गप्पा मारा.
  • रागात असताना कोणताही निर्णय घेऊ नका.
  • जेवताना राजकारण , धर्म किंवा कामाच्या गप्पा मारू नका.
  • आयुष्यातील उद्दिष्टे स्पष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि त्यावर रोज काम करा.
  • जवळच्या व्यक्तींना सांभाळायला शिका त्यांच्यासोबत संपर्क चांगला ठेवा.
  • आयुष्यात कसले जरी संकट आले तरी हार मानू नका त्यावर ताकतीने मात करा.
  • तुमच्या व्यक्तिमत्त्वात निष्ठा आणि सन्मान असला पाहिजे
  • उधार पैसे देताना १०० वेळा विचार करून द्या नाहीतर तुमचेच पैसे भिकऱ्यासारखे मागावे लागतील.
  • कधी सगळ हरल्यासारख वाटलं तर कोणत्यातरी एका गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवा.
  • तुम्ही काय करू शकता याचा शोध घ्या आणि त्याचा वापर करा.
  • तुम्ही जे काम करताय त्यावर प्रेम करा.
  • कधी कशाची गरज पडल्यास मागायला लाजू नका.
  • ज्यानी तुम्हाला अडचणीच्या काळात मदत केलीय त्यांना कधीच विसरू नका.
  • आजूबाजूश्यांशी प्रेमाने वागा सकारात्मक वातावरण निर्माण करा.
  • समोरच्याचा दिवस आनंदी करा म्हणजे आपोआप तुमचा दिवस आनंदात जाईल
  • स्वतःची स्पर्धा दुसऱ्या कोणाशीच करू नका. फक्त स्वतःशी करा.
  • विचार लवकर करा पण बोलताना लगेच बोलू नका.
  • तोंड भरून कधीच बोलू नका.
  • रोजचा पोशाख आणि शरीर स्वच्छ ठेवा.
  • चालताना ताठ खांदे मागे घेऊन चाला.
  • ज्या गोष्टीबद्दल माहिती नाही त्यावर मत मांडू नका.
  • कधीही कोणासोबतही वाईट वागू नका.
  • आयुष्यातला प्रत्येक दिवस असा जागा जणू तो तुमचा शेवटचा दिवस आहे.
  • प्रत्येक प्रसंगात शांत राहायला शिका.
  • एखाद्याच्या प्रयत्नांचे कौतुक करा त्याला नावं ठेवत बसू नका.
  • विनम्र राहायला शिका जरी प्रत्येक वेळी शक्य नसले तरीही.
  • तुमचा मूळ पाया कधी विसरू नका.
  • शक्य असेल तेंव्हा तेंव्हा प्रवासाला निघा नवीन नवीन ठिकाणे पाहा.
  • चांगल्या निरोगी शरीरासाठी पौष्टिक आहार रोजच्या जेवणात घ्या.
  • ताजी फळे खा, बाहेरचे पदार्थ खाण्यास नाही म्हणायला शिका.
  • आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं काम झालं की घरी येऊन बसा घरच्यांसोबत वेळ घालवा.
  • पुस्तके,कथा,कादंबऱ्यांचे वाचन करा. किमान महिन्यातून 3 पुस्तकं वाचा. मोठमोठ्या थोर युगपुरुषांची आत्मचरित्र वाचा.
  • आपल्या आयुष्यावर प्रेम करा आपल्या कामावर प्रेम करायला शिका. एखाद काम करताना असं करा कि जे काम तुमच्याशिवाय कोणीही तुमच्यापेक्षा छान असा करू शकणार नाही.

या काही आयुष्यात ध्येयप्राप्तीसाठी उपयोगाला येणाऱ्या गोष्टी आहेत. यातील प्रत्येक गोष्ट तुम्ही आचरणात आणली तर तुम्हाला यश नक्की मिळेल. आपण आयुष्यात जगताना या वरील नियमांचा अवलंबून आपल्या रोजच्या जगतानाच्या आयुष्यात करा. आणि काही ठराविक कालावधीननंतर निकाल बघा स्वतामध्ये किती बदल घडले असतील. समाजाची तुमच्यासोबतची वागणूक देखील सकारात्मक झालेली असेल.

घरात वागताना असा वागा कि आपल्या पुढील पिढीला आपण काहीतरी आपल्यापेक्षा छान असा शिकवतोय. तुम्ही कितीही चांगले राहिलात आणि जर का तुमची मुलं बाळ वाईट वळणावर गेली तर मग तिथे पूर्णपणे तुमचा दोश असेल. त्यासाठी आपल्या मुलांवर चांगले सौंस्कार करा, त्यांना समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक समजावून सांगा. त्यांचं कुठे चुकत असेल तर किंवा त्यांच्याकडून काही चूक झाली असल्यास त्यावर त्यांना माफ करा आणि नंतर पुढे चालून ती चूक होऊ नये अशी खबरदारी त्यांच्याकडून घ्या.

येथून शेअर करा

Leave a Comment