Gangapur DattatrayTemple |श्री क्षेत्र गाणगापूर दत्त मंदिर एक पवित्र तीर्थस्थान या विषयी संपूर्ण माहिती मराठीत

नमस्कार , आज आपण या लेखांमध्ये Gangapur DattatrayTemple विषयी संपूर्ण माहिती मराठीत पाहणार आहोत. gangapur Information in Marathi संपूर्ण भारतात गाणगापूर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. gangapur temple गंगापूर ला कोणत्या नदीचा संगम होतो? gangapur river sangam अक्कलकोट ते गाणगापूर अंतर किती आहे? akkalkot to gangapur distance गाणगापूर आपण कसे जाऊ शकतात? त्या ठिकाणचा कोणता डोंगर खूप प्रसिद्ध आहे. आपण सर्व माहिती पाहणार आहोत.

Gangapur DattatrayTemple |श्री क्षेत्र गाणगापूर: एक पवित्र तीर्थस्थान

श्री क्षेत्र गाणगापूर Gangapur DattatrayTemple हे एक पवित्र तीर्थस्थान आहे, जे श्री दत्त महाराजांशी संबंधित आहे. येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 22-23 वर्षे वास्तव्य केले. या ठिकाणी भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम आहे, ज्याला संगम स्थान म्हणतात. या ठिकाणी भक्तांना अनेक पवित्र स्थळांचे दर्शन होते, ज्यामध्ये निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी परंपरा, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष आणि निर्गुण पादुका महात्म्य यांचा समावेश आहे.


Gangapur
Gangapur DattatrayTemple

Gangapur DattatrayTemple गाणगापूरची महिमा

Gangapur DattatrayTemple ला जाताना भक्त आधी संगमावर स्नान करतात. संगमाचे पवित्र स्नान केल्याने शरीर शुद्ध होते आणि पापांचा नाश होतो, असे मानले जाते.  पौर्णिमा आणि अमावस्या दिवशी येथे स्नानाचे  महत्त्व आहे. संगमावर स्नान करून भक्त निर्गुण पादुका मठाचे दर्शन घेतात. हे मठ श्री नृसिंह सरस्वती महाराजांमुळे पवित्र झाले आहे. असे म्हणतात की येथे आलेल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

अष्टतीर्थे व त्यांचे महत्त्व

Gangapur DattatrayTemple येथे आठ महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत.

  1. षट्कुल तीर्थ: स्नान केल्याने दीर्घायुष्य व आरोग्य मिळते.
  2. नृसिंह तीर्थ: अपमृत्यू टळतो.
  3. भागीरथी तीर्थ: दारिद्र्य नाश होतो.
  4. पापविनाशी तीर्थ: पापांचा नाश होतो.
  5. कोटी तीर्थ: मोक्षप्राप्तीचा मार्ग उघडतो.
  6. रुद्रपाद तीर्थ: गया तीर्थासमान फल प्राप्त होते.
  7. चक्र तीर्थ: ज्ञानप्राप्ती होते.
  8. मन्मथ तीर्थ: वंशवृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होते

Gangapur DattatrayTemple ची आध्यात्मिक ऊर्जा

हे क्षेत्र मानवाला मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारे आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शांतता, समाधान आणि दैवी अनुभव मिळतो. त्यामुळे गाणगापूरला एकदा तरी भेट देणे दत्त भक्तांसाठी अत्यावश्यक मानले जाते. गाणगापूर येथील निर्गुण पादुका मठ हे दत्त भक्तांसाठी प्रमुख स्थळ आहे. येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका स्थापल्या आहेत. या मठात नियमित पूजाअर्चा व भजन-कीर्तन होत असते.


Gangapur to Akkalkot distance
Gangapur DattatrayTemple

भीमा-अमरजा संगम स्थानाचा महिमा

भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम गाणगापूर येथे आहे. हे स्थान शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. संगम मठापासून फक्त 2-3 किमी अंतरावर आहे.

श्री नृसिंह सरस्वती रोज या संगमात स्नान करत असत. या संगमाच्या परिसरातच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. संगमात स्नान केल्याने प्रयागस्नानाचे पुण्य मिळते.

नृसिंह सरस्वती महाराज संगमावर जात असताना एका ठिकाणी विश्रांती घेत होते. एका कट्ट्यावर बसत असत त्या कट्ट्याला विश्रांतीचा कट्टा असे म्हणत. भगवान नावाच्या शेतकऱ्याची शेती त्या विश्रांतीच्या कट्ट्याच्या जवळच होती.

नृसिंह सरस्वती महाराज हे त्रिमूर्तीचा अवतार होते. पण ते गाणगापूरलाच का जाऊन राहिले? हा प्रश्न सर्वांना पडतो यामागे कारण आहे. एकदा अश्विन शुद्ध चतुर्थी दिवशी दिवाळीचा सण होता. त्यावेळी गुरु शिष्यांना म्हणाले गया प्रयाग वाराणसी या त्रिस्थळी जाऊन स्नान केले असता पुण्याला लाभते. गुरु शिष्याला म्हणाले तेव्हा शिष्य म्हणाला मी घरी जातो घरच्यांना घेऊन येतो आपण त्या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करू. त्यावर गुरु म्हणाले कुठे जातोस आपली अमरजा भीमा नदीचा संगम आहे.  भीमा नदी ही उत्तर दिशेकडे वाहते. भीमा नदीला गंगा नदीचे स्थान प्राप्त झालेले आहे. म्हणून या संगमावर जाऊन स्नान केले असता सर्व पापांचा नाश होतो.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास,कथा,ज्योतिर्लिंगाविषयी संपूर्ण मराठीत माहिती

नृसिंहअष्टतीर्थे

  • षट्कुल तीर्थ
  • नृसिंह तीर्थ
  • भागीरथी तीर्थ
  • पापविनाशी तीर्थ
  • कोटी तीर्थ
  • रुद्रपाद तीर्थ
  • चक्र तीर्थ
  • मन्मथ तीर्थ

भागीरथी तीर्थाला काशीकुंड असेही म्हणतात. पापविनाशी तीर्थ हे सर्व पाप नष्ट करणारे तीर्थ मानले जाते. कोटी तीर्थात स्नान केल्याने आत्मशुद्धी होते. रुद्रपाद तीर्थाचा संबंध गया क्षेत्राशी आहे. कोणाला त्वचेचे विकार असल्यास  या ठिकाणी जाऊन स्नान करावे.  या ठिकाणी स्नान केले असता सर्व आजार बरे होतात व वाईट शक्ती असेल तीही नाहीशी होते.


Gangapur DattatrayTemple
Gangapur DattatrayTemple

औदुंबर वृक्षाचा महिमा

Gangapur DattatrayTemple संगमाच्या जवळ असलेला पवित्र औदुंबर वृक्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या झाडाखाली साक्षात दत्त महाराजांचा वास असल्याचे मानले जाते. भक्त या वृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि आपली मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना करतात. औदुंबर हा कल्पवृक्ष असल्यामुळे भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात. औदुंबर  वृक्षाला 11 21 108 प्रदक्षिणा घालू शकतो.108 दिवस 108 रोज प्रदक्षणा औदुंबर वृक्षाला घातले असता आपले पूर्वजन्मीचे पाप नष्ट होतात. आज देखील कितीतरी दत्तभक्त संगमाच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करतात.

भस्माचा डोंगर

Gangapur DattatrayTemple गाणगापूरच्या भस्माचा डोंगर हा भक्तांसाठी एक महत्त्वाचा ठिकाण आहे. या भस्माला संकटनाशक मानले जाते. असे मानले जाते की भस्माचा डोंगर ऋषी-मुनींच्या तपश्चर्येमुळे तयार झाला आहे. प्रत्येक दत्त भक्त गाणगापूर गेल्यावर भस्माच्या डोंगरावर जातो. व तेथील माती भस्म म्हणून घेऊन येतो.भस्म नेतात तरी देखील हा डोंगर आहेत असाच आहे तो कमी झालेला नाही.श्रीगुरुंनी सांगितलेले हे  ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला. ते म्हणाले, स्वामी, ‘अमरजा’ नदी विषयी आम्हाला माहिती सांगा. या नदीला ‘अमरजा’ असे नाव का देण्यात आले.  याचे कारण काय आहे. गुरू म्हणाले, पुराणात या नदीच्या कथा आहे. पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्य राहत होता. त्या दैत्याने देवांशी युद्ध केले.  त्याने इंद्राशी युद्ध केले व स्वर्गलोकही जिंकला.

त्या जालंधराच्या सैन्येतील जे दैत्य जखमी होत असत त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत होते.  त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले. त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांना शरण गेला. त्यांना त्याने सर्व परिस्थिती सांगितली  दैत्यांपासून देवांना वाचवा. अशी सांगितले.  इंद्राने असे सांगताच ही बातमी इंद्राने शंकरांना सांगितले तेव्हा शंकरा अत्यंत क्रोधित होऊन रुद्र रूप धारण केले व दैत्याचा वध करण्यास गेले अमृतमंत्र्यांनी मंत्रीत केलेले जल इंद्राला दिले. व शंकराने जालंधराचा पराभव केला. व त्या अभिमंत्रित केलेले जल  इंद्राने   मंत्रीत केलेले जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर टाकले. ते जल  ज्या ठिकाणी पडले तेथे नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली.

Gangapur DattatrayTemple चे गुरुचरित्रातील महत्त्व

गुरुचरित्राच्या 49व्या अध्यायात गाणगापूरचे महत्त्व वर्णन केले आहे. श्री नृसिंह सरस्वती यांनी आपल्या भक्तांसाठी अष्टतीर्थ प्रकट केले. कार्तिक आणि माघ महिन्यांत या तीर्थांवर स्नान केल्याने भक्तांना इहलोक आणि परलोक या दोन्हीचा लाभ होतो. गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे पाचवा वेद आहे गुरुचरित्राचे पारायण गाणगापूरमध्ये जाऊन केले असता आपल्या घरातील सर्व वाईट बादांचा नाश होतो.

गाणगापूरमध्ये  परंपरा खूप महत्त्वाची आहे. असे मानले जाते की आजही दुपारी 12 वाजता श्री नृसिंह सरस्वती महाराज भिक्षा मागण्यासाठी गाणगापूरच्या गावात येतात. म्हणून कोणीही बारा ते साडेबाराच्या टायमिंगला कुठलीही दत्त सेवा करू नये कारण तो टायमिंग हा दत्तप्रभूंचा भिक्षेचा टायमिंग आहे.

गंगापूर दत्ता मंदिराबद्दल विकिपीडिया माहिती इथे वाचा – (OPEN)


Gangapur Dam
Gangapur DattatrayTemple

श्री क्षेत्र गाणगापूरला कसे पोहोचावे?

Gangapur DattatrayTemple हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात आहे. मुंबई-हैदराबाद किंवा मुंबई-बेंगळुरू रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन लागते. तिथून बस किंवा ऑटोने 20 किमी अंतरावर गाणगापूरला जाता येते.

गाणगापूरला राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत. तसेच अन्नछत्र मंडळात भोजनाची सोय आहे.

काही महत्वाची अंतरे

गाणगापूर ते अक्कलकोट अंतर – ७४ कि.मी.

सोलापूर ते गाणगापूर अंतर – १११ कि.मी.

तुळजापूर ते गाणगापूर अंतर – १३८ कि.मी.

Gangapur DattatrayTemple हे श्री दत्त महाराजांचे जागृत स्थान आहे. येथे दर्शन घेतल्याने भक्तांचे पाप नष्ट होतात आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. येथे नियमित भेट देऊन संगम स्नान, अष्टतीर्थ दर्शन, औदुंबर वृक्षाची पूजा आणि गुरुचरित्र पारायण केल्याने भक्तांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते.

तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा.

धन्यवाद !


येथून शेअर करा

Leave a Comment