Gharkul Yojana Maharashtra|घरकुल योजना 2025 अर्ज प्रक्रिया,अनुदान,निवड,ऑनलाइन अर्ज कसा करावा?आणि संपूर्ण माहिती

Gharkul Yojana Maharashtra|घरकुल योजना 2025अर्ज प्रक्रिया,अनुदान,निवड आणि संपूर्ण महत्वाची माहिती वाचा इथे

नमस्कार, प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत “घरकुल योजना 2025” “Gharkul Yojana Maharashtra”चा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे की प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत महाराष्ट्रात 2025 साठी मोठ्या प्रमाणात घरांची मंजुरी देण्यात आली असून याकरिता अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

pm gharkul yojana maharashtra योजनेचा उद्देश म्हणजे गरीब,बेघर,कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या सर्वांना एक पक्के घर मिळवून देणे.त्यांचे स्वतःचे पक्के घर असावे यासाठी हा प्रयत्न आहे. ही योजना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना असणार आहे. Pradhan mantri gharkul yojana अंतर्गत यावर्षी केंद्र सरकारने 20 लाख घरांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. लाखो बेघर आणि गरजू कुटुंबांना Gharkul Yojana 2025 या योजनेअंतर्गत घर प्राप्त होईल व त्यांचे चांगल्या घराचे स्वप्न पूर्ण होईल.

घरकुल योजना 2025 ची माहिती अनुदान आणि लाभ

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग यांनी महाराष्ट्रातील गरजू लोकांसाठी pm awas yojana maharashtra अंतर्गत वीस लाख घरे मंजूर करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामध्ये तेरा लाख नवीन घर व सहा लाख जुन्या घरांचा(gharkul yojana 2024) यामध्ये समावेश आहे असे एकूण 20 लाख घरांसाठी ही मंजुरी घोषित केली आहे. राज्य सरकारने या योजनेकरिता दोन लाख दहा हजार रुपये अनुदान मंजूर केले आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारास मिळेल.हे अनुदान प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत याकरिता दिलेले अनुदान फिक्स आहे आणि त्याच्या आधारे कुटुंबांना घराचे बांधकाम करणे शक्य होईल. व यामुळे मोठ्या प्रमाणात कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी मोठी मदत होईल.


pm Gharkul Yojana Maharashtra
Gharkul Yojana Maharashtra

घरकुल योजनेसाठी मिळणारे अनुदानात वाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने Gharkul Yojana Maharashtra या योजनेसाठी मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ केली आहे. यामध्ये सध्या ग्रामीण भागातील घरकुलांसाठी एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार होते परंतु यामध्ये राज्य सरकारने 50,000 रुपयांची वाढ करून हे अनुदान 1,70,000 रुपये इतके केले आहे. अशाप्रकारे अनुदानात राज्य सरकारने सहभाग घेऊन अनुदानाची रक्कम वाढवली आहे जेणेकरून गरीब कुटुंबांना घरकुल योजनेअंतर्गत घर मिळवणे सोपे होईल व त्यांना चांगले घर बांधता येईल.

Gharkul Yojana Maharashtra अंतर्गत महाराष्ट्र राज्यात या योजनेच्या माध्यमातून जवळपास 51 लाख घरांचे बांधकाम होणार आहे. यासाठी सुमारे 85,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेत सोलार ऊर्जा देखील समाविष्ट केली गेली आहे ज्यामुळे घरांची ऊर्जा क्षमता वाढेल व पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम देखील कमी होईल.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – बांधकाम कामगारांसाठी 2025 मधील मोठी घोषणा 1 रुपया मधे मिळतील इतके फायदे जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे

प्रती लाभार्थी दिले जाणारे अनुदान

ग्रामीण भागात – रू.1,20,000/-
डोंगरी भागात – रू.1,30,000/-

या अनुदानात राज्य सरकारने वाढ केली आहे.


pm awas Yojana maharashtra
Gharkul Yojana Maharashtra

पात्रता

  • Gharkul Yojana Maharashtra घरकुलासाठी अर्ज करणारे लाभार्थी यांचे स्वतःचे तसेच कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे पक्के घर नसावे.
  • घरकुल योजना 2025 करिता अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याने गेल्या वीस वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदार भारताचा नागरिक असावा व त्यांचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे.
  • त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख ते सहा लाख रुपयांच्या दरम्यान असावे.
  • अर्जदाराचे नाव रेशन कार्ड किंवा बीपीएल यादीत असावे.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड (आपला मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक केलेला असावा)
  2. उत्पन्नाचे चालू वर्षाचे प्रमाणपत्र(तहसीलदाराकडून मिळेल.)
  3. जातीचे प्रमाणपत्र
  4. बँकेचे पासबुक झेरॉक्स
  5. जमिनीचे पुरावे जसे सातबारा, मालमत्ता जमीन संबंधित प्रमाणपत्र.
  6. अर्जदाराच्या आई-वडिलांचे आधार कार्ड (ते हयात नसतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र)
  7. अर्जदाराच्या कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्ड.
  8. रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र.
  9. लाईट बिल
  10. मनरेगा जॉब कार्ड
  11. पी एम स्वनिधी, बांधकाम कामगार, पीएम विश्वकर्मा इत्यादी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या अर्जदारांना नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.

Gharkul Yojana 2024
Gharkul Yojana Maharashtra

घरकुल योजने करीता निवड प्रक्रिया

Gharkul Yojana Maharashtra २०२५ अंतर्गत या योजनेकरिता पात्र अर्जदारांची निवड गावातील ग्रामसभा करते. ही ही यादी ग्रामसभा खालील निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करते.

  1. शेतकरी कुटुंब – जे शेतकरी कुटुंब भूमिहीन आहेत ज्यांना स्वतःचे पक्के घर नाही अशा शेतकऱ्यांची निवड केली जाते.
  2. महिला कुटुंबप्रमुख – ज्या कुटुंबामध्ये महिला कुटुंब प्रमुख आहेत अशा अर्जदारांना प्राधान्य दिले जाते.
  3. बेघर कुटुंब – ज्या कुटुंबांना स्वतःचे घर नाही हे देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
  4. अपंग व्यक्ती असलेले कुटुंब – शारीरिक दृष्ट्या अपंगत्व असणारा व्यक्तीच्या कुटुंबाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  5. 25 वर्षा पेक्षा मोठी अशिक्षित व्यक्ती असलेले कुटुंब – ज्या कुटुंबामध्ये अशिक्षित वयस्कर व्यक्ती असतील अशा कुटुंबाचे देखील निवड केली जाते.
    अशा मी कशाचा विचार करून ग्रामसभा पात्र लाभार्थ्यांची यादी तयार व त्यानुसार घरकुल योजना अंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी त्यांचा अर्ज स्वीकारला जातो.

Gharkul Yojana Maharashtra योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

Gharkul Yojana Maharashtra या योजने करता अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येतो ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये करावा लागतो ते लोक आपला ऑनलाईन फॉर्म भरतात जर त्या ठिकाणी आपला ऑनलाइन फॉर्म भरला नाही गेला तर तुम्ही स्वतः देखील ऑनलाईन अर्ज भरू शकता त्याबद्दलची माहिती खाली दिली आहे. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी आपली सर्व कागदपत्रे घेऊन ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जमा करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करावा ?


pradhan mantri gharkul yojana
Gharkul Yojana Maharashtra


Gharkul Yojana Maharashtra या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भारत असाल तर खाली दिलेले मुद्दे नीट वाचा व तशी प्रोसेस करा.तसेच वरच्या photo मधे याचे screenshot दाखवले आहेत तशी प्रक्रिया करा .

  1. Gharkul Yojana Maharashtra योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजर मध्ये ही (ओपन) < ही निळ्या रंगात open दिलेली वेबसाईट उघडावी लागेल.
  2. वेबसाईट उघडल्यानंतर “Click to proceed” बटणावर क्लिक करा.
  3. त्यानंतर वेबसाईटवर फॉर्म भरताना आपले राज्य निवडण्याचा पर्याय मिळेल त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निवडून प्रोसेस करा.
  4. यानंतर उत्पन्नाची माहिती वार्षिक उत्पन्न भरायचे आहे तहसीलदाराकडून घेतलेले उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करा.
  5. घरकुलासाठी तुम्ही पात्र आहात का यासाठी या ठिकाणी एक प्रश्न विचारला आहे जसे की तुमच्याकडे भारतात पक्के घर आहे का कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे पक्के घर आहे का आणि गेल्या वीस वर्षात घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे का? तर या प्रश्नावर “Eligibility check” बटनावर क्लिक करून माहिती भरा.
  6. यानंतर तुमचा आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल नंबर टाका व “Generate OTP” तुझ्या बटनावर क्लिक करून तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी या ठिकाणी टाकावा लागेल.
  7. नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे पीडीएफ बनवून अपलोड करावी लागेल. पीडीएफ अपलोड करताना प्रत्येक फाईल ची साईज ही 100kb पेक्षा जास्त नसावी.
  8. यानंतर अर्जाची माहिती भरावी लागेल यामध्ये
    8.1 – वैयक्तिक माहिती ज्यामध्ये जन्मतारीख मोबाईल नंबर लिंग आणि आपला पत्ता इत्यादी माहिती भरावी लागेल.
    8.2 – कुटुंबाची माहिती जसे आई-वडील पती-पत्नी मुले यांची माहिती भरावी लागेल
    8.3 – नंतर बँकेची माहिती जसे की बँकेच्या खाते क्रमांक IFSC code इत्यादी माहिती भरा.
  9. सर्व माहिती कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून पहा व “Submit” बटणावर क्लिक करा.

अर्ज भरून झाल्यानंतर काय होईल ?

अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक येईल.या नोंदणी क्रमांकाचा वापर करून तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला ऑनलाईन चेक करता येईल.अर्ज मान्य झाल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून पुढील प्रक्रिया होते व घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी पुढील सूचना मिळतील.

    • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक येईल
    • या नोंदणी क्रमांकाचा वापर करून तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला ऑनलाईन चेक करता येईल
    • अर्ज मान्य झाल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून पुढील प्रक्रिया होते व घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी पुढील सूचना मिळतील.

    Gharkul Yojana Maharashtra – या बद्दल विकिपीडिया वरील मराठी माहिती इथे वाचा – (open)

    Gharkul Yojana Maharashtra 2025 ही महाराष्ट्रातील गरीब गरजू नागरिकांना त्यांच्या स्वप्नाचे पक्के घर मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. योजना काय आहे कशी आहे त्याची संपूर्ण माहिती अर्ज कसा करावा, लागणारे कागदपत्र, पात्रता, ऑनलाइन अर्ज कसा करावा तरी संपूर्ण माहिती सोप्या भाषेत लिहिण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे भरताना मात्र तपासून योग्य माहिती देऊन मगच फॉर्म भरा.

    अर्ज करताना कोणतेही अडचण आल्यास स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करावा किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती तपासावी. तुम्हालाही माहिती आवडली असल्यास आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारा. 

    धन्यवाद !


    येथून शेअर करा

    1 thought on “Gharkul Yojana Maharashtra|घरकुल योजना 2025 अर्ज प्रक्रिया,अनुदान,निवड,ऑनलाइन अर्ज कसा करावा?आणि संपूर्ण माहिती”

    Leave a Comment