नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये गिरनार मंदिरा विषयी याविषयी मराठीत माहिती पाहणार आहोत. Girnar Information in Marathi गिरनार मंदिर कोठे आहे? गिरनार मंदिरात आपण कसे पोहोचू शकतो? girnar temple गिरनार मध्ये कोणकोणत्या देवाची मंदिरे आहेत? girnar गिरनार पर्वत प्रसिद्ध आहे. girnar parvat गिरनार ला जाण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या सुविधा आहेत ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. गिरनार पर्वताची 3672 फूट आहे. girnar height गिरनार हे दत्तप्रभूंचे स्थान आहे. गिरनारला गेल्यावर खूप लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. गिरनार ला जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवास सुविधा उपलब्ध आहे. गिरनार ला जाण्यासाठी मुंबईहून ट्रेन आहे. आपण बसली देखील गिरनारला जाऊ शकता. किंवा आपली स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकता. गिरनार पर्वत चढण्यासाठी सात ते आठ तास लागतात.
Girnar Information in Marathi – गिरनार पर्वत हा भारताच्या गुजरात राज्यातील जुनागड शहराजवळील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. प्राचीन इतिहास, धार्मिक महत्त्व, निसर्गसंपत्तीने समृद्ध अशा गिरनार पर्वताला भेट देणे हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे.१०,००० पायऱ्या चढुन जाणं अवघड आहे पण त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपण या पायऱ्या कसे चढला ते आपल्याला समजत नाही. प्रत्येक दत्तभक्तांनी एकदा तरी गिरनार ला जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान आहे. इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे.
भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत.
श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे माहिती पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा सांगितले जाते. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे ४ योजनं म्हणजेच १६ गावांपर्यत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी. ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.
Girnar Information in Marathi – गिरनार पर्वत
गिरनार पर्वत म्हणजेच बारा हजार वर्षांपूर्वी भगवान दत्तात्रयांनी तपसाधना करून पुनीत केलेले एक अद्वितीय स्थान आहे. या पर्वतावर १०,००० पायऱ्या चढून जाताना खूप लोकांना त्रास होतो. पर्वत चढण्यासाठी खूप वेळ लागतो पण येथे पोहोचल्यानंतर भक्तांना अनोखी ऊर्जा आणि समाधान मिळते. जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. भक्तांच्या हाकेला धावून येणारे दत्त महाराज आपल्याला या ठिकाणी गेल्यानंतर कुठल्या नाही कुठल्या रूपात येऊन दर्शन देतात.
इतिहास आणि प्राचीन महत्त्व Girnar Information in Marathi
शिवपुराणात गिरनारचा उल्लेख उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे.
स्कंद पुराणातील माहिती: गिरनारला रैवत, कुमुद, उज्जयंत अशी नावे दिली आहेत, जी त्रिमूर्तीशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित आहेत.या आश्रमात अनेक वर्षापासून अन्नदान चालू आहे. या ठिकाणी गुरु शिष्य हे नाते जपले जाते. दत्तगुरु चे जागृत स्थान गिरणार आहे .हे गिरणार पवित्र स्थान भारतात प्रसिद्ध आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे असे सांगितले जाते की या घंटावर तीन वेळा आपल्या पूर्वजांचे नाव घेऊन ही घंटा वाजवले असता आपल्याला पितरांपासून मुक्ती मिळते.
या ठिकाणी 5000 वर्षापासून असलेली दैव दुर्लभ देणगी अशी अखंड धुनी आहे . या ठिकाणी ही धुनी प्रकट होते. या अग्नि रूपाने साक्षात दत्तगुरुच प्रकटतात. महाराज गिरनार ला जाणारा प्रत्येक भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपात भेट देतात. आश्रमाच्या मागील बाजूने महाकाली गुफेच्या डोंगराकडे वाढ जाते. ही वाट घनदाट जंगलातून आहे. या ठिकाणी पायऱ्या चढून जावे लागते. ही वाट पायऱ्यांची नसून खडकाळ दगडावरून जावे लागते. या गुहेत मातेचा उग्र मुखोटा असलेली मूर्ती आहे. त्याच बाजूला असणाऱ्या दोन डोंगरावर रेणुका माता अनुसया माता ची मूर्ती आहे. गिरनार च्या बाजूस भव्य दातार पर्वत आहे. या पर्वतावरचा चढणे खूप अवघड आहे.
रामायण आणि महाभारत काळ
श्रीराम व पांडवांनी येथे वास्तव्य केल्याचा उल्लेख आढळतो.
गिरनार पर्वतावरील धार्मिक स्थळे – Girnar Information in Marathi
भवनाथ मंदिर
गिरनार पर्वताच्या तळाशी असलेले हे भगवान महादेवांचे मंदिर भक्तांना आकर्षित करते. महाशिवरात्रीला येथे भव्य जत्रा भरते.
मृगी कुंड
शिवरात्रीच्या मेळ्यात या कुंडात नागा साधू स्नान करतात. असे सांगितले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी स्वत: भगवान शिव या कुंडात स्नानासाठी येतात.
श्री अंबाजी शक्तिपीठ
Girnar Information in Marathi – गिरनार पर्वतावरील ४,८०० पायऱ्यांवर असणारे मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. देवी अंबाजीचे मंदिर वर्षभर बंद असते, फक्त होळी पौर्णिमा किंवा नवरात्रीला उघडले जाते. देवी पार्वतीने अंबा मातेच्या रुपात वास केला. म्हणून या ठिकाणी आंबा मातेचे मंदिर आहे. या मंदिराचा दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा व नवरात्रीला त्या मंदिराचा दरवाजा उघडला जातो. या मंदिरातील देवीची मूर्ती अत्यंत सुंदर आहे. त्यामुळे या मंदिरात गेलेल्या प्रत्येक भक्ताचे आकर्षण मंदिराला भेट देण्याचे असते. या ठिकाणची सुंदर मूर्ती प्रत्येक भक्ताचे लक्ष वेधून घेते. यानंतर जे मंदिर येते ते गोरक्षनाथाचे मंदिर आहे.
समुद्रसपाटीपासून ३,६६६ फूट उंचीवर असलेल्या या मंदिरात भगवान दत्तात्रयांचे प्रमुख निवासस्थान आहे. हे गिरनार पर्वतावरील सर्वांत उंच शिखर आहे.
गिरनार पर्वत चढताना येणारी महत्वाची ठिकाणे
नाव २००श्री भैरवनाथ मंदिरप्राचीन देवस्थान, शांतता लाभते.२,०००वेलनाथ बाबा समाधीसिद्ध स्थान, तपस्वींचे वासस्थान.२,२५०राजा भर्तृहरी आणि गोपीचंद गुंफानवनाथ भक्तिसार ग्रंथाचा उल्लेख असलेले स्थान.२,६००राणक देवी
शिळधार्मिक महत्त्वाची प्राचीन
शिळ ३,५००प्रसूतीबाई देवी मंदिर संतान प्राप्तीसाठी भक्तांचे आवडीचे ठिकाण आहे. या मंदिरात गेल्यानंतर ज्यांना संतान प्राप्तीची गरज आहे. त्यांना संतान प्राप्ती होते. ४,८००अंबाजी शक्तिपीठ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे.
गिरनार पर्वताची भौगोलिक माहिती – Girnar Information in Marathi
गिरनार पर्वत हा गुजरातमधील जुनागडपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. हा पर्वत सुमारे २८ चौ.किमी. क्षेत्रावर पसरलेला असून निसर्गरम्य पर्वतशिखरांचा समूह आहे. गिरनारची उंची सुमारे ३,६६६ फूट असून हा हिमालयापेक्षाही प्राचीन मानला जातो.
Girnar Information in Marathi गिरनार पर्वतावरील निसर्गसौंदर्य
गिरनार हा पर्वत वन्यजीव, विविध औषधी वनस्पती आणि नैसर्गिक संपत्तीने युक्त आहे. येथे जंगलात अनेक दुर्मीळ प्राणी आणि पक्षी आढळतात.
धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व – Girnar Information in Marathi
गिरनार पर्वत हा संत, महात्म्यांच्या साधनेचा केंद्रबिंदू राहिला आहे. येथे अनेक संतांना भगवान दत्तात्रयांचे प्रत्यक्ष दर्शन झाले आहे.
प्रसिद्ध संत – Girnar Information in Marathi
बाबा किनाराम अघोरी
श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी महाराज)
श्री काश्मिरी बापू
गिरनार पर्वतावर जाण्यासाठी उपाय – Girnar Information in Marathi
गिरनार पर्वतावर जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या आहेत. ज्यांना दहा हजार पायऱ्या चढणे शक्य नाही . ते वेगवेगळ्या मार्गाचा उपयोग करतात. कारण कोणाला कोणता ना कोणता आजार असतो. म्हणून एवढ्या पायऱ्या चढू शकत नाहीत. त्यासाठी वेगवेगळे पर्याय निर्माण केले आहेत.
डोली सेवा – अशक्त व्यक्तींसाठी डोलीची सोय असून, खर्च ५,००० ते ११,००० रुपये आहे. ज्या लोकांना पायऱ्या चढणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही डोली सेवा उपलब्ध आहे. याडोलीचे तिकीट आपण ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो . किंवा ऑफलाईट पद्धतीने काढू शकतो. सुट्टीच्या दिवसात गिरनार ला गेले असता खूप गर्दी असते. गिरनारला जाताना विशेषता कपड्यांचे काळजी घ्यावी. जे कपडे आरामदायी आहेत. सुटसुटीत आहेत तसेच कपडे घालावी. पायात सॉक्स घालावे. थंडीच्या दिवसात गिरणार ला गेले असता थंडीची कपडे घालावी.
सारांश – Girnar Information in Marathi
गिरनार पर्वत हा धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. गिरनार माहिती मराठीत जाणून घेतल्यावर हे स्थान प्रत्येक भक्तांना असे वाटते की, एकदा तरी भेट द्यावे, असा अनुभव आहे. गिरनार पर्वतावरची प्रत्येक पायरी भक्तांसाठी एक अध्यात्मिक प्रवासच आहे. प्रत्येक दत्त भक्तांनी एकदा तरी गिरनारला अवश्य जावे.
इतर धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे वाचा
गणपतीपुळे विकिपीडिया माहिती – (इथे वाचा )
अष्टविनायक गणपती बद्दल माहिती साठी (येथे क्लिक करा )
मकर संक्रांति भोगी माहिती – भोगी भाजी रेसिपी वाचण्यासाठी (इथे क्लिक करा )
मकर संक्रांति वेळ , मुहूर्त ,विधी जाणून घेण्यासाठी इथे वाचा (इथे क्लिक करा )
सफला एकादशी व्रत कथा | Safala Ekadashi Vrat Katha (इथे वाचा )
जया एकादशी २०२५ |Jaya Ekadashi ईन्फ़ोर्मतिओन – (इथे वाचा )
संत ज्ञानेश्वर महाराज माहिती – Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti – ( इथे क्लिक करा )
धन्यवाद !
1 thought on “Girnar Information in Marathi|गिरनार माहिती मराठीत”