नमस्कार, आज आपण या लेखामध्ये जगन्नाथ पुरी मंदिर Jagannath Puri Temple याविषयी संपूर्ण माहिती मराठीत पाहणार आहोत. jagannath puri temple Mahiti Marathi.जगन्नाथ पुरी हे मंदिर काही रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे. चार पवित्र धार्मिक तीर्थस्थळांपैकी हे एक चारधाम मंदिर आहे. जगन्नाथ देवांना विष्णूचा अवतार मानला जातो. या मंदिरात जगन्नाथ भगवान, श्री बलभद्र, देवी सुभद्रा व सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. असे म्हणतात की या मंदिराची स्थापना उभारणी अनंगभिनदेव नावाच्या एका राजाने केली आहे. येथे दरवर्षी Rathyatra रथयात्रा होते . जगनाथ पुरी यात्रेत खूप गर्दी असते. jagannath puri rath yatra 2025.जगन्नाथ यात्रेला देश विदेशातून लाखोच्या संख्येने भाविक येतात व यात्रेत सहभागी होतात जगन्नाथ यात्रा ही जगन्नाथ पुरीला jagannath puri सुरू होऊन जनकपुर येथे समाप्त होते.
जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर लावलेला ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो.ओडिसा राज्यात पुरी येथे भगवान जगन्नाथ यांचे मंदिर आहे. जगन्नाथ पुरी मंदिराच्या जवळ गोल्डन बीच आहे (jagannath puri beach).(Jannath puri temple height) मंदिराची उंची 214 फूट आहे. पुरी मधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावर असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते अगदी आपल्या समोरच आहे असे दिसते. या मंदिराचे मुख्य घुमट आहे. घुमठाची सावली कोणत्याही वेळेला पाहिली असता ती अदृश्य असते. आपल्याला ती सावली दिसत नाही.
Jagannath Puri Temple जगन्नाथपुर माहिती
भारतातील चार धामांपैकी एक असलेले जगन्नाथ पुरी हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व जगभरात प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर आणि गोल्डन बीचला जातात.जगन्नाथ या मंदिराची उभारणी 10 व्या शतका होती. असे म्हणतात की या मंदिराला चारधाममध्ये हे स्थान देण्यात आले आहे. जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर लावलेला ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो.दिवसा वारा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो. संध्याकाळी जमिनीकडून समुद्राकडे वाहतो. या मंदिरावर लावलेला ध्वज रोज बदलला जातो. प्रत्येक दिवशी पुजारी घुमोटावर असलेला ध्वज बदलतात. हा ध्वज बदलण्यासाठी एक दिवस जरी खंड पडला तर हे मंदिर 18 वर्षासाठी बंद होऊ शकते असे सांगितले जाते.

जगन्नाथ पुरीच्या रथ अतिशय सुंदर आहे. या रथाचे बांधकाम लाकडी आहे. हा रथ बनवत असताना कुठल्याही प्रकारचा धातू वापरलेला नाही. या रथात बलराम यांचा रथ सर्वात पुढे असतो कारण ते जगन्नाथ यांचे थोरले बंधू आहेत म्हणून यांचा रथ यात्रेत सर्वात पुढे असतो. मध्यभागी सुभेद्राचा रथ असतो सुभद्रा ही जगन्नाथ यांची बहीण आहे. याला दरपदलं किंवा पद्यरत असे देखील म्हणतात . सर्वात शेवटी श्रीकृष्णाचा रथ असतो. याला नंदीघोष किंवा गरुड ध्वज असे म्हणतात. दोन्ही भावांची लाडकी बहीण सुभद्रा ही दोन्ही भावांच्या मध्ये संरक्षणात यात्रा करते. जगन्नाथ यांचा रथ सोहळा चाकी आहे. या रथाची उंची 45 फूट आहे. 35 फूट व लांबी 35 फूट रुंदी आहे. बलराम यांचा रथ 45 फूट उंच असतो. तर सुभेद्राच्या रथाची उंची 43 फूट असते.

जगन्नाथ पुरी कसे जायचे
Jagannath Puri Temple हे ओडिशा राज्यात आहे आणि त्याचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पुरी स्टेशन आहे. रेल्वेने येथे पोहोचणे सर्वात स्वस्त आणि सोयीचे असल्याने हे स्थानक नेहमीच भाविकांनी भरलेले असते. तुम्हाला फ्लाइटने यायचे असल्यास, भुवनेश्वर विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे, जे येथून सुमारे 60 किलोमीटरवर आहे. भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवरून तुम्ही पुरीला बसने जाऊ शकता, ज्याचे भाडे फक्त ₹ 100 आहे.
Jagannath Puri Temple मध्ये स्थानिक वाहतूक
पुरी स्टेशनपासून जगन्नाथ मंदिराचे अंतर फक्त 2-3 किलोमीटर आहे. येथून तुम्ही ई-रिक्षा किंवा ऑटो घेऊ शकता, ज्याचे भाडे ₹150 पर्यंत आहे. अधिक आराम हवा असेल तर तुम्ही टॅक्सी बुक करू शकता.
जगन्नाथपुर माहिती
जगन्नाथ पुरी मंदिरातील 10 रहस्य
जगन्नाथ पुरी मंदिरातील ही 10 रहस्य जी आजही वैज्ञानिकांना समजली नाहीत.
1. भगवान जगन्नाथांचा ध्वज
तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज नेहमी हवेच्या उलट्या दिशेने फडकत असतो हो तुम्ही बरोबर वाचला आहे आश्चर्यकारक आहे पण हे खरं आहे कारण साधारण वाराच्या दिशेनेच फडकतात पण जगन्नाथ मंदिर येथील ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो याचं कारण आज तागायत कोणत्याही वैज्ञानिकांना समजले नाही तसेच हा ध्वज दररोज बदलण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की जर एखाद्या जरी दिवशी हा ध्वज बदलला गेला नाही तर हे मंदिर पुढील 18 वर्षांसाठी बंद होईल अशी मान्यता आहे.
2. मंदिराचा आकार आणि सावली
Jagannath Puri Temple चे एकूण क्षेत्रफळ चार लाख चौरस फूट इतके आहे आणि या मंदिराची साधारण उंची 214 फूट आहे. मंदिराच्या शिखरावर असलेल्या गुंबदाची सावली कधीच जमिनीवर पडत नाही किंवा पडलेली नाही याचा देखील रहस्य आज तागायत कोणताही वैज्ञानिक शोधू शकले नाही.
3. सुदर्शन चक्र
मंदिराच्या शिखरावर भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र आहे हे इतके अद्भुत व याची रचना अशा पद्धतीने केली आहे की पूर्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही असाल आणि त्या चक्राकडे पाहत असाल तरी ते चक्र तुम्हाला दिसते याची बनावट चमत्कारिक असून याचं वैशिष्ट्य आजही वैज्ञानिकांसाठी एक गूढ रहस्यच आहे.
4. समुद्राची हवा
साधारणता समुद्रकिनाऱ्यावर हवा समुद्रापासून किनाऱ्याकडे येत असते आणि संध्याकाळी ती उलट्या दिशेने जाते पण पुरीमध्ये हवेचा प्रवाह हा उलट असतो इथे हवा किनाऱ्यापासून समुद्राकडे जाते हे देखील एक गूढ रहस्य आहे.
4. कधीही पक्षी बसत नाहीत असा मंदिराच शिखर कळस
मंदिरात आजपर्यंत कधीही मंदिराच्या शिखरावर कळसावर कोणताही पक्षी बसलेले आजपर्यंत आढळलेले नाही. या मंदिराहून कधीही विमान देखील जात नाही.
6. उलट चढून ध्वज बदलवणे
जगन्नाथ पुरी मंदिरातील अजून एक रहस्य वैशिष्ट्य असे की मंदिराचा ध्वज दररोज बदलताना तेथील पुजाऱ्यांना उलट चढून मंदिरावर जावे लागते व ध्वज बदलावा लागतो हे देखील या मंदिराच्या अद्भुतपणाचे एक रहस्यच आहे.
7. मंदिरातील महाप्रसादाचे रहस्य
Jagannath Puri Temple मधे जगातील सर्वात मोठे रसोई घर स्वयंपाक घर आहे येथे 500 पेक्षा अधिक स्वयंपाकी 300 पेक्षा अधिक मदतनीस काम करतात विशेष म्हणजे इथे कधीही प्रसादाची कमी पडत नाही आणि संध्याकाळी मंदिर बंद होण्याअगोदर आपोआप प्रसाद संपतो. येथील अजून एक मोठे वैशिष्ट्य किंवा रहस्य असे की मंदिरात भगवंताचा भोग प्रसाद बनवताना एकावर एक सात असे मातीचे भांडे ठेवून त्यामध्ये प्रसाद शिजवला जातो साधारणता सगळ्यात खाली भांड्यातील प्रसाद अगोदर शिजायला हवा पण इथे मात्र असे न होता सर्वात वरच्या भांड्यातील प्रसाद अगोदर शिजतो त्यानंतर त्याच्या खालील भांड्यातील शिजतो असं क्रमाने सात भांड्यातील प्रसाद शिजत राहतो. हे देखील एक न उलगडलेले रहस्यच आहे.
8.सिंहद्वाराचे रहस्य
जगन्नाथ पुरी हे शहर समुद्राच्या जवळ आहे समुद्राच्या किनाऱ्यावर सिंहद्वार आहे. या सिंहद्वारात असताना आपल्याला समुद्राच्या लाटा ऐकू येतील आवाज ऐकू येईल पण जसे तुम्ही सिंहद्वाराच्या आत प्रवेश करता समुद्राच्या लाटांचा आवाज येणे बंद होते. एक अद्भुत ध्वनी परिवर्तन जे म्हणतात ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि हाही एक अद्भुत चमत्कार आणि रहस्यच आहे.
9. मुर्त्यांचे बदलणे
या मंदिरातील मुर्त्या दर बारा वर्षांनी जगन्नाथासह तीन मुर्त्या बदलल्या जातात व त्या ठिकाणी नवीन मुर्त्या बसवल्या जातात. हे बदल अत्यंत पवित्र आणि गुप्त पद्धतीने केले जातात. काही विशिष्ट पुजारांनाच या मुर्त्या बदलण्याचा अधिकार आहे. मूर्ती बदलताना केवळ पुजारीच आत मध्ये प्रवेश करू शकतात. मूर्ती बदलत असताना जुन्या मूर्ती मधून एक ब्रह्म पदार्थ बाहेर काढून तो नवीन मूर्तीमध्ये टाकला जातो. देवाच्या मूर्ती मंदिरात बसवताना संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित केला जातो.
मंदिराच्या बाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करतात. मूर्ती बदलताना जो ब्रह्म पदार्थ दुसऱ्या मूर्तीमध्ये बसवला जातो तेव्हा तो पदार्थ हातात काहीतरी उड्या मारल्यासारखे जिवंत सजीव जाणवतो असे मानले जाते की श्रीकृष्णांचे शरीरुपे जीवन संपल्यानंतर त्यांचे हृदय या ठिकाणी आजही आहे. आजही सजीव ब्रह्म पदार्थ नेमका काय आहे याचं रहस्य कोणालाही माहित नाही.
10. भगवान श्रीकृष्णांच्या हृदय
अशी मान्यता आहे की जो ब्रह्म पदार्थ पुजारांना मूर्ती बदलताना हातात जाणवतो तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर पंचतत्वात विलीन झाले परंतु त्यांचे हृदय एक जिवंत व्यक्तीप्रमाणे अजूनही धडकते हे हृदय आजही सुरक्षित आहे असे मानले जाते.

ब्रम्ह पदार्थ म्हणजे काय?
ब्रम्ह पदार्थ म्हणजे काय याविषयी कोणालाही सांगता येणार नाही तो पदार्थ असा आहे की बारा वर्षांनी ज्यावेळी मुर्त्या बदलल्या जातात. तेव्हा जुन्या मूर्तीतून तो पदार्थ नवीन मूर्तीमध्ये टाकला जातो. त्यावेळी संपूर्ण शहराची वीज खंडित केली जाते. ब्रह पदार्थ पाहिल्यास त्या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे होतात असे म्हटले जाते. हा ब्रह्मपदार्थ नेहमी श्रीकृष्णाच्या सहवासात दिसतो.मुर्त्या बदलणाऱ्या पुजाऱ्यांनी जुन्या मूर्तीतून हा पदार्थ बाहेर काढून नवीन मूर्तीमध्ये हा पदार्थ ठेवला जातो जेव्हा तो पदार्थ काढत असताना हातात काहीतरी उड्या मारल्यासारखे वाटते तेरी पदार्थ आहे जीवन आहे हात मोजे असल्यामुळे पदार्थ बद्दल फारसे काही कळत नाही परंतु ब्रम्ह द्रव्य हा सजीव असल्याची पण त्याचे वास्तव काय आहे हे कोणालाच माहीत नाही.

1. जगन्नाथ मंदिर दर्शन
जगन्नाथ मंदिरात जाण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ कारण त्या वेळी गर्दी कमी असते. मंदिरात भगवान जगन्नाथ, त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती स्थापित आहेत. दर्शनासाठी जाताना मोबाईल व कॅमेरा यांना बंदी आहे. आपला मोबाईल मंदिराच्या काउंटरवर जमा करू शकतात. व दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणाहून मोबाईल घेऊ शकता. मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले असते. सायंकाळी दर्शनासाठी गर्दी कमी असते.रथयात्रेत गर्दी जास्त असते.
2. कोणार्क सूर्य मंदिर
कोणार्क सूर्य मंदिर जगन्नाथ पुरीपासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी बस, ऑटो किंवा टॅक्सी सुविधा आहे. बसचे भाडे 50 रुपये आहे.
कोणार्क मंदिराची ठळक वैशिष्ट्ये
मंदिराच्या वेळा सकाळी ६ ते रात्री ८. येथे संध्याकाळी लाइट आणि साउंड शो होतो. हे मंदिर 1250 मध्ये गँग राजा नरसिंहदेव पहिल्याच्या काळात बांधले गेले. मंदिर 12 जोड्या चाके आणि 7 घोडे यांनी ओढलेल्या रथाच्या आकारात बांधले आहे. वाटेत तुम्हाला अनेक छोटी दुकाने दिसतील. हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते.

3. गोल्डन बीच
गोल्डन बीचला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र आहे. भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. पुरीमध्ये वेळ घालवण्यासाठी गोल्डन बीच हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. या बीचवर जाण्यासाठी 20 रुपये 3 तासासाठी एका दिवसासाठी 100 शंभर रुपये घेतात. हे बीच लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी देखील खूप सुंदर आहे. येथे बोटिंग सुविधा आहे.
बीच
शांत आणि स्वच्छ वातावरण. मुलांसाठी खेळण्याची जागा आणि बाग आहे.
आरामदायक खुर्च्या आणि ताजी हवा. संपूर्ण वातावरण नैसर्गिक आहे.
अन्न आणि पेय माहिती
पुरी आणि कोणार्कमध्ये व्हेज आणि नॉनव्हेजचे मिश्रण उपलब्ध आहे. तुम्ही जर शाकाहारी असाल, तर प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये जाऊ शकतात.
दोघा जणांसाठी अंदाजी एवढा खर्च होईल. ₹3000-₹5000 मध्ये आरामात प्रवास करू शकता. तुम्हाला बाइक भाड्याने घ्यायची असल्यास, ती दररोज ₹५०० मध्ये उपलब्ध आहे.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – गजानन महाराज प्रकटदिन,जीवनचरित्र,महिमा,चमत्कार विषयी संपूर्ण माहिती
रथयात्रा
जून-जुलैमध्ये होणाऱ्या रथयात्रेत गर्दी खूप असते. गर्दी टाळायची असेल तर या काळात प्रवास टाळा. तुमच्याकडे वेळ असल्यास, भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिर आणि नंदनकानन प्राणीसंग्रहालय सारख्या प्रमुख स्थळांना देखील भेट द्या.
जगन्नाथ पुरीची भेट हा एक संस्मरणीय अनुभव आहे, ज्यामध्ये धार्मिकता, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा समावेश आहे. तुम्ही जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर आणि गोल्डन बीचला एका दिवसात भेट देऊ शकतात.
आशा करतो कि तुम्हाला वरील लेख आवडला असेल.आवडला असल्यास तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला द्या तसेच काही सुच्वाय्च्गे असल्यास नक्की कळवा.
जगन्नाथ पुरी मंदिरद्दल विकिपीडिया वरून माहिती इथे वाचा
धन्यवाद !
1 thought on “Jagannath Puri Temple| जगन्नाथ पुरी मंदिरातील 10 रहस्य माहिती मराठीत”