Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi |कोल्हापूर महालक्ष्मी माहिती मराठीत

नमस्कार, आज आपण या लेखामध्ये कोल्हापूर महालक्ष्मी विषयी माहिती मराठीत पाहणार आहोत.Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi, महालक्ष्मीचे व्रत कसे करतात. Mahalaxmi Vrath 2024 महालक्ष्मी साठी कोणता मंत्र म्हणतात. Mahalaxmi Mantra महालक्ष्मीची आरती Mahalaxmi Aarti.कोल्हापूरची महालक्ष्मी महाराष्ट्रातील काही लोकांची कुलदेवी असल्यामुळे वर्षातून एक वेळा मूळ खंडपीठावर जातात. श्री सूक्त याचे पठण करतात. व्यंकटेश स्तोत्र,

या स्तोत्राचे पठण करतात. दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात. नवरात्रामध्ये महालक्ष्मीची सेवा जास्त प्रमाणात करतात.


कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे. देवी महालक्ष्मीचे व ज्योतिर्लिंगाचे स्थान हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे. कारण या ठिकाणी पाहण्यासाठी खूप ऐतिहासिक स्थळे आहेत. कुलदेवी असणारी कोल्हापूरची महालक्ष्मी चे खूप महत्त्व आहे. या देवीची मनोभावे सेवा केली असता देवी महालक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न होते, आशीर्वाद देते. महालक्ष्मी मंदिराचे नाव भारतभर प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पल, मसाले आणि मंदिराचे सौंदर्य लोकांना खूप आकर्षित करते.


Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi
Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi

महालक्ष्मी मंदिराचा महिमा -Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi


महालक्ष्मी मंदिराला अंबाबाई मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. चालुक्य राजवटीच्या काळात याची स्थापना झाल्याचे सांगितले जाते.

मंदिराच्या खास गोष्टी-Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi
पाच कलश: मंदिरात पाच सुंदर कलश आहेत. मुख्य कलश देवी महालक्ष्मीचे आहेत आणि उर्वरित चार आसपासच्या देवतांचे आहेत.


हेमाडपंती शैली– मंदिर हेमाडपंती स्थापत्यशास्त्रात बांधलेले आहे. ही शैली त्याच्या मजबूत आणि सुंदर बांधकामासाठी ओळखली जाते.
रत्नजडित मूर्ती-देवी महालक्ष्मीची मूर्ती अतिशय खास आहे. हे मौल्यवान रत्ने आणि दगडांनी बनलेले आहे. ही मूर्ती सुमारे 5000-6000 वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते.
मंदिराजवळचा बाजार
मंदिराबाहेरील बाजार अतिशय रंगीबेरंगी आणि चैतन्यमय आहे. येथे तुम्ही कोल्हापुरी चप्पल, कृत्रिम दागिने आणि पूजा साहित्य खरेदी करू शकता. लहान मुलांची खेळणी आणि घर सजावटीच्या वस्तूही छोट्या स्टॉलवर उपलब्ध आहेत.

कोल्हापुरी चप्पलची खासियत
कोल्हापुरी चप्पल हे येथील ट्रेडमार्क उत्पादन आहे. या चप्पल मजबूत आणि स्टायलिश आहेत. स्थानिक लोकही त्यांच्या दारात सजावटीसाठी त्यांची खरेदी करतात.

महालक्ष्मी मंदिराचे अंतर्गत दृश्य
मंदिरात प्रवेश करताच त्याची पुरातनता लक्षात येते. येथील खांबांना गरुड स्तंभ म्हणतात. आत जाण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. दर्शनानंतर बाहेर पडताना मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर एक वेगळाच अनुभव येतो.

मंदिरात विशेष उत्सव
महालक्ष्मी मंदिरात वर्षभर अनेक विशेष उत्सव साजरे केले जातात. यापैकी काही अतिशय खास आहेत:

किरणोत्सव – हा उत्सव वर्षातून दोनदा मार्च आणि नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. या वेळी उगवत्या सूर्याची किरणे देवी महालक्ष्मीच्या पायावर पडतात. हे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात.
रथोत्सव आणि गोकुळाष्टमी या दिवशी मंदिरात विशेष आरती आणि पूजा केली जाते.


रंकाळा तलावाचे दृश्य
मंदिर दर्शनानंतर रंकाळा तलावात पाहण्यासाठी लोक जातात. हा तलाव कोल्हापूरचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील सूर्यास्त पाहण्यासारखा आहे.

कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्याला अंबाबाई असेही म्हणतात, ही महाराष्ट्रातील एक प्रमुख शक्तिपीठ आहे. कोल्हापूर शहरातील या मंदिराला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.

महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम 7व्या ते 9व्या शतकात चालुक्य राजवंशाच्या काळात झालेले आहे. हे बांधकाम अतिशय जुने आहे.
देवीची मूर्ती काळ्या दगडाची असून ती सुमारे 3 फूट उंच आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य तिच्या मुकुटात नवरत्नांनी सजलेली शेषनागांची प्रतिमा आहे.

महालक्ष्मी देवीला ‘श्री क्षेत्र करवीर निवासिनी” या नावानेही ओळखले जाते.

देवीचा उल्लेख स्कंदपुराण आणि मार्कंडेय पुराण यासारख्या पुरातन ग्रंथांमध्ये आहे
नवरात्रात देवीचे पूजा केली जाते नऊ दिवस वेगवेगळ्या दुर्गेचे महालक्ष्मी मंदिरात प्रकट करतात. वर्षातून तीनदा 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी; तसेच 9,10 आणि 11 नोव्हेंबर सूर्याच्या किरणांचा देवीच्या मूर्तीवर थेट पडणारा प्रकाश हा या मंदिराचा प्रमुख आकर्षण आहे. मंदिराचे गाभाऱ्यात देवीची मूर्ती विराजमान आहे.मंदिराच्या सभामंडपात आणि मुख्य प्रवेशद्वारावर अतिशय सुंदर शिल्पकाम आहे.

या मंदिराच्या आसपास इतरही अनेक देवतांची मंदिरे आहेत, जसे की गणपती, शिव आणि विष्णू नवरात्रोत्सवाच्या काळात किंवा किरणोत्सवाच्या दिवशी खूप गर्दी केली जाते.कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भक्तांसाठी श्रद्धेचा आणि मनःशांतीचा स्त्रोत आहे. हे मंदिर महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेचे महाराष्ट्रातील खूप लोकांची कुलदेवी असल्यामुळे वर्षातून एकदा महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी व मानपान करण्यासाठी जातात. पूर्ण वर्णाचा नैवेद्य ,साडीचोळी, गजरा, अर्पण करतात. नवरात्र मध्ये दुर्गा सप्तशतीचे14 पाठ करतात. नवरात्र उत्सवात दुर्गा सप्तशतीचे पारायण केले असता कोणत्याही प्रकारची संकटे येत नाही. व इच्छा पूर्ण होतात. तसेच देवीच्या टाका वर किंवा श्री यंत्रावर कुंकुमार्चन करतात. कुमकुम अर्चना करत असताना 16 वेळा श्री सूक्त 1 वेळा फलश्रुती 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणतात.


Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi


॥ श्रीसूक्त (ऋग्वेद) ॥ – Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi

॥ श्रीसूक्त (ऋग्वेद) ॥

ॐ ॥ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १॥

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥ २॥

अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवीर्जुषताम् ॥ ३॥

कां सोस्मितां हिरण्यप्राकाराम्
आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् ।
पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ४॥

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं
श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये
अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥ ५॥

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो
वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः ।
तस्य फलानि तपसा नुदन्तु
मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥ ६॥

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥ ७॥

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥ ८॥

गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीꣳ सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ९॥

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥ १०॥

कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥ ११॥

आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥ १२॥

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १३॥

आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १४॥

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं
गावो दास्योऽश्वान्विन्देयं पुरुषानहम् ॥१५॥

यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्य मन्वहम् ।
श्रियः पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ॥ १६॥


फलश्रुति – Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi

पद्मानने पद्म ऊरू पद्माक्षी पद्मसम्भवे ।
त्वं मां भजस्व पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् ॥ 17

अश्वदायी गोदायी धनदायी महाधने ।
धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे ॥ 18

पुत्रपौत्र धनं धान्यं हस्त्यश्वादिगवे रथम् ।
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु माम् ॥ 19

धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः । 20
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्नु ते ॥

वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा ।
सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ॥ 21

न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः ॥
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्सदा ॥ 22

पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते
पद्मालये पद्मदलायताक्षि ।
विश्वप्रिये विष्णु मनोऽनुकूले
त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ॥ 23

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यम्बके देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥

सरसिजनिलये सरोजहस्ते
धवलतरांशुक गन्धमाल्यशोभे ।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे
त्रिभुवनभूतिकरिप्रसीद मह्यम् ॥

विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् ।
विष्णोः प्रियसखींम् देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॥

महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही ।
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥

श्रीवर्चस्यमायुष्यमारोग्यमाविधात् पवमानं महीयते ।
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥

ऋणरोगादिदारिद्र्यपापक्षुदपमृत्यवः ।
भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा ॥

ॐ महादेव्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि ।
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥
॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi


॥ सिद्ध कुंजिका स्तोत्र ॥ Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi


शिव उवाच
शृणु देवि प्रवक्ष्यामि, कुञ्जिकास्तोत्रमुत्तमम्।

येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः शुभो भवेत॥1॥

न कवचं नार्गलास्तोत्रं कीलकं न रहस्यकम्।

न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनम्॥2॥

कुञ्जिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत्।

अति गुह्यतरं देवि देवानामपि दुर्लभम्॥3॥

गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वति।

मारणं मोहनं वश्यं स्तम्भनोच्चाटनादिकम्।

पाठमात्रेण संसिद्ध्येत् कुञ्जिकास्तोत्रमुत्तमम्॥4॥

॥ अथ मंत्र ॥
ॐ ऐं ह्रीं क्लीं
चामुण्डायै विच्चे॥

ॐ ग्लौं हुं क्लीं जूं सः ज्वालय
ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल

ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल
हं सं लं क्षं फट् स्वाहा॥

॥ इति मन्त्रः ॥
नमस्ते रूद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनि।

नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनि॥1॥

नमस्ते शुम्भहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिनि।

जाग्रतं हि महादेवि जपं सिद्धं कुरूष्व मे॥2॥

ऐंकारी सृष्टिरूपायै ह्रींकारी प्रतिपालिका।

क्लींकारी कामरूपिण्यै बीजरूपे नमोऽस्तु ते॥3॥

चामुण्डा चण्डघाती च यैकारी वरदायिनी।

विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मन्त्ररूपिणि॥4॥

धां धीं धूं धूर्जटेः पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी।

क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शीं शूं मे शुभं कुरु॥5॥

हुं हुं हुंकाररूपिण्यै जं जं जं जम्भनादिनी।

भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः॥6॥

अं कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं क्षं।

धिजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा॥7॥

पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा।

सां सीं सूं सप्तशती देव्या मन्त्रसिद्धिं कुरुष्व मे॥8॥

इदं तु कुञ्जिकास्तोत्रं मन्त्रजागर्तिहेतवे।

अभक्ते नैव दातव्यंगोपितं रक्ष पार्वति॥

यस्तु कुञ्जिकाया देवि हीनां सप्तशतीं पठेत्।

न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा॥

॥ इति श्रीरुद्रयामले गौरीतन्त्रे शिवपार्वतीसंवादे कुञ्जिकास्तोत्रं सम्पूर्णम् ॥
॥ ॐ तत्सत् ॥


महालक्ष्मी आरती – Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।

वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।

पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।

कमलाकारें जठरी जन्मविला धाता।

सहस्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥

जय देवी जय देवी…॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।

झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।

माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।

शशिकरवदना राजस मदनाची जननी॥

जय देवी जय देवी…॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।

सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।

गायत्री निजबीजा निगमागम सारी।

प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥

जय देवी जय देवी…॥

अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।

मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।

वारी मायापटल प्रणमत परिवारी।

हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥

जय देवी जय देवी…॥

चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।

लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।

पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।

मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥

जय देवी जय देवी…॥


Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi


सारांश – Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi
कोल्हापूरची महालक्ष्मी ही महाराष्ट्रातील लोकांची कुलदेवी असल्यामुळे वर्षातून एक वेळा महाराष्ट्रातील सर्व लोक येतात. देवीची ओटी भरतात . महालक्ष्मी देवी आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. व आपल्याला कुठल्याही गोष्टीत कुठल्याही आपले काम कोणतेही निर्वीघ्नपणे पार पडते. वर्षातून एक वेळा आपल्या कुळदेवीला जावे. देवीचा आशीर्वाद घ्यावा.


आशीर्वाद घेत असताना देवीचा जयजयकार मोठ्याने करावा.

महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती
राजेश्वरी आईसाहेब
आंबा माता की जय!
आंबा माता की जय !
आंबा माता की जय!
भारत माता की जय!


Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi
Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi

इतर धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे वाचा

संत ज्ञानेश्वर महाराज माहिती – Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti – ( इथे क्लिक करा )

काळभैरव जयंती माहिती – Kaal Bhairav Jayanti Mahiti (इथे क्लिक करा )

दत्त जयंती 2024 – Dattatrey Jyanti 2024 (इथे क्लिक करा )

श्री गुरुचरित्र ग्रंथ माहिती – Gurucharitra granth information marathi – (इथे क्लिक करा )


Akkalkot Swami Samarth Information- श्री क्षेत्र अक्कलकोट माहिती – (इथे क्लिक करून माहिती वाचा )


धन्यवाद !


येथून शेअर करा

3 thoughts on “Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi |कोल्हापूर महालक्ष्मी माहिती मराठीत”

Leave a Comment