Lek Ladaki Yojana 2024 |महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024: फॉर्म PDF, अर्ज प्रक्रिया, पात्रता अटी, आवश्यक कागदपत्रे आणि इतर तपशील |Maharashtra Application Form Documents and Eligibility


Table of Contents

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 काय आहे ?

(What is “Lek Ladaki Yojana 2024 “?)

महाराष्ट्र सरकारने मुलींचा सन्मान, शिक्षण, आणि सक्षमीकरणासाठी  “लेक लाडकी योजना” जाहीर केली आहे. १ एप्रिल २०२३ रोजी सुरु झालेल्या या योजनेद्वारे राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांतील सर्व मुलींना जन्मापासून १८ वर्षांपर्यंत या योजनेद्वारे विविध टप्प्यांवर आर्थिक मदत मुलींना  दिली जाईल. तरी  या ब्लॉगमध्ये आपण “लेक लाडकी योजना”  या योजनेचे उद्दिष्ट, लाभ, अर्ज प्रक्रिया, आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत या सर्व गोष्टीं बाबत सविस्तर माहिती पाहूया..


Lek Ladaki Yojana 2024

योजने बद्दल माहिती

योजना नावमहाराष्ट्र लेक लाडकी योजाना 2024
घोषणामहाराष्ट्र सरकार
लाभार्थीगरीब कुटुंबांच्या मुली
उद्दीष्टशिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे
आर्थिक मदतजन्मापासून ते 18 वर्षे ₹10,1000 /-
अंतिम एकरकमी₹75,000 / – वयाच्या 18 व्या वर्षी
राज्यमहाराष्ट्र
योजना सुरू करणे1 एप्रिल 2023 पासून
पात्रताकुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखपेक्षा जास्त नसावे
मदत टप्प्यातएकूण रक्कम पाच चरणांमध्ये केली जाईल
हेल्पलाइन क्रमांक022-26121234
ईमेलhttps://womenchild.maharashtra.gov.in/
Lek Ladaki Yojana 2024

“Lek Ladaki Yojana 2024 ” चा उद्देश आणि महत्त्व

(Objectives and Importance of Maharashtra Lek Ladki Yojana)

महाराष्ट्र शासनाच्या “लेक लाडकी योजने” द्वारे राज्यातील पटर मुलींना जन्मापासून ते मोठे होईपर्यंत  म्हणजेच 18 वर्षा पर्यन्त एकूण 101000 rs (एक लाख एक हजार रुपयांची ) आर्थिक मदत दिली जाणार आहे. या रोजने  मध्ये ही  मदत रक्कम पाच वेगवेगळ्या टप्प्यांत दिली जाईल, जेणेकरून मुलींना कोणत्याही आर्थिक बोजाशिवाय त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल. 

लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून शासनाकडून मदत दिली जाणार असून, त्यामुळे राज्यातील कुटुंबांना आपल्या मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता मिटणार आहे .


Lek Ladaki Yojana 2024

Lek Ladaki Yojana 2024 या योजनेचा मुख्य उद्देश 

1)शिक्षण आणि सक्षमीकरण: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना आर्थिक मदतीने प्रोत्साहन देऊन त्यांचे शिक्षण आणि सक्षमीकरण करणे आहे. 

2)स्त्री भ्रूणहत्या आणि बालविवाह रोखणे : मुलींना शिक्षण मिळाल्यामुळे लहान वयात लग्न करण्याचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे. 

3) तसेच समाजातील नकारात्मक घटनांना प्रतिबंध घालणे

4)स्वावलंबी बनवने : हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. राज्यातील मुलींचा दर्जा सुधारावा आणि त्यांना स्वावलंबी बनवावे, हे  या योजनेमागील सरकारचे माणस आहे.


Lek Ladaki Yojana 2024 या योजनेचे फायदे

(Benefits of Maharashtra Lek Ladki Yojana)

१. जन्मावेळी आर्थिक मदत: मुलीचा जन्म झाल्यावर कुटुंबाला ५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. 

२. प्राथमिक शिक्षणासाठी मदत: मुलगी पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यावर ४,००० रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत मिळेल. 

३. सहावीचे शिक्षण: मुलगी सहाव्या वर्गात गेल्यावर ६,००० रुपये दिले जातील. 

४. माध्यमिक शिक्षणासाठी अनुदान: अकरावीत प्रवेश घेतल्यावर ८,००० रुपयांची आर्थिक मदत मिळेल. 

५. १८ वर्षांनंतर एकरकमी अनुदान: मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला एकरकमी ७५,००० रुपये दिले जातील. 

या रकमेचा वापर तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा अन्य गरजांसाठी केला जाऊ शकतो.

या योजनेद्वारे एकूण १,०१,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.


Lek Ladaki Yojana 2024 या योजनेसाठी पात्रता व निकष

योजनेसाठी पात्रता निकष

(Eligibility Criteria for Maharashtra Lek Ladki Yojana)

  • मूल रहिवासी: अर्जदार हा महाराष्ट्राचा मूल रहिवासी असला पाहिजे.
  • जन्मतारीख: मुलीचा जन्म हा १ एप्रिल २०२३ किंवा त्या नंतरचा झालेला असला पाहिजे . (आधीच चालणार नाही ) त्या मुली योजने साथी पात्र ठरणार नाहीत .
  • रेशन कार्ड: लाभार्थी कुटुंब पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक असावे.
  • वार्षिक उत्पन्न: अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹१,००,००० पेक्षा कमी असावे.
  • सरकारी नोकरी: कुटुंबातील कोणताही सदस्य हा सरकारी नोकरीत नसावा महत्वाचा नियम.
  • आयकर भरणे: कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आयकर भरलेला नसावा व भरत नसावा .
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र: आई-वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे

Lek Ladaki Yojana 2024

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

(Required Documents for Application)

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे :

१. मुलीचा जन्म दाखला 

२. आधार कार्ड 

३. पालकांचे आधार कार्ड 

४. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड

५. उत्पन्नाचा दाखला 

६. बँक खाते तपशील 

७. पालकांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र 

८. रहिवासी प्रमाणपत्र 

 ९. बोनाफाईड प्रमाणपत्र (शिक्षणाचा पुरावा)

 १०. मोबाईल नंबर


Lek Ladaki Yojana 2024 ची वेबसाइट लिंक :

(Lek ladki yojana official website link )

 या योजनेची अधिकृत वेबसाईट अजून तयार करण्यात आलेली नाही. यासाठी तुम्हाला वाट पहावी लागेल. परंतु तुम्हाला वेबसाईट आल्यानंतर लवकरच कळवण्यात येईल.

लेक लाडकी योजना फॉर्म व GR डाउनलोड करा 

लेक लाडकी योजना GR व PDF form(Lek Ladaki Yojna GR and PDF Form Download इथे वाचा लिंक ओपन करा )

लेक लाडकी योजना form (इथे लिंक ओपेन करा अर्ज वाचण्यासाठी)


Lek Ladaki Yojana 2024 या योजनेची संपूर्ण अर्ज प्रक्रिया:

(Application Process for Lek Ladki Yojana)

१. फॉर्म भरणे: फॉर्म  हा सरकारी विभागातून योजनेसाठीचा अर्ज मिळवा. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

२. कागदपत्रे जोडा: सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्मसोबत जोडा. 

३. अर्ज जमा करणे: अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षक अधिकारी किंवा संबंधित जिल्हा कार्यालयात जमा करा. 

४. तपासणी प्रक्रिया: अर्जाचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यास अर्जदाराला लाभ मिळण्यास सुरुवात होईल. 

५. अर्ज मंजुरीची माहिती: मंजूर झालेल्या अर्जदाराला एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.


महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे सामाजिक महत्त्व :

(Social Importance of Maharashtra Lek Ladki Yojana)

“लेक लाडकी योजना” समाजातील मुलींना योग्य आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देऊन त्यांचे शिक्षण, आरोग्य, आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरते आहे. योजनेद्वारे मुलींचा दर्जा सुधारण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत मिळते. सरकारची ही योजना मुलींना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करते आणि त्यांच्या भविष्यासाठी एक मजबूत आधारभूत भूमिका साकारते.

महाराष्ट्र सरकारची “लेक लाडकी योजना” राज्यातील मुलींसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी अर्थसहाय्य मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कुटुंबांनी दिलेल्या सूचना आणि अर्ज प्रक्रिया लक्षात घेऊन वेळेत अर्ज करावा.

अशाप्रकारे लेकींना सशक्त, शिक्षित आणि आत्मनिर्भर बनवून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी “लेक लाडकी योजना” महत्त्वाची भूमिका बजावेल.


लेक लाडकी योजना 2024 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1)लेक लाडकी योजनेचे मुख्य उद्दीष्ट काय आहे?

शिक्षण आणि आर्थिक सहाय्य देऊन राज्यातील गरीब कुटुंबांच्या मुलींना सक्षम बनविणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

2)लेक लाडकी योजनेंतर्गत किती आर्थिक सहाय्य मिळेल?

या योजनेंतर्गत, जन्मापासून 18 वर्षे वयोगटातील पाच टप्प्यात एकूण ₹98,000 / प्राप्त होईल.

3)प्रत्येक मुलीला लेक लाडकी योजनेचा फायदा होईल का?

नाही, केवळ 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखपेक्षा कमी आहे अशा मुलींना या योजनेचा फायदा होईल.

4)लेक लाडकी योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते विधान आणि पासपोर्ट आकार फोटो आवश्यक आहेत.

5)लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन कसे अर्ज करावे?

ज्याही पालकांना त्यांच्या मुलीसाठी लेक लाडकी योजनेचा  भरायचा असेल. तर त्यांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी मध्ये, किंवा गावातील अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज भरायचा आहे.

6)अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
मुलीचा जन्म दाखला
कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
मुलगी व तिच्या पालकांचा आधार कार्ड
रेशन कार्ड (पिवळे किंवा नारंगी)
बँक खाते तपशील (आईच्या नावाने किंवा आई नसल्यास वडिलांच्या नावाने संयुक्त खाते).
कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (पहिल्या मुलीसाठी तिसरा हप्ता मिळवण्यासाठी आणि दुसऱ्या मुलीसाठी दुसरा हप्ता मिळवण्यासाठी लागू)

7) या योजनेअंतर्गत किती आर्थिक सहाय्य दिले जाते?
या योजनेद्वारे खालील प्रमाणे टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते:
जन्मानंतर ₹५,०००
पहिल्या इयत्तेत असताना ₹६,०००
सहाव्या इयत्तेत असताना ₹७,०००
अकराव्या इयत्तेत असताना ₹८,०००
१८ वर्षांच्या वयात ₹७५,०००
एकूण मिळून ₹१,०१,००० आर्थिक सहाय्य दिले जाते.

8) लेख लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
अर्ज आंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने भरावा लागतो. अर्ज भरून आंगणवाडी सेविका यांच्या कडे जमा करावा , त्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करतील.

9 ) मुलीची आई नसल्यास काय करता येईल ?
आई नसल्यास मुलीच्या नावाने आणि वडिलांच्या नावाने joint account खाते उघडता येईल. या वेळी आईच मृत्यू प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे.

10 ) अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क करू शकतो?
अधिक माहितीसाठी गावातील आंगणवाडी सेविका किंवा महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा.


सरकारी योजनाच्या माहिती करा खाली वाचा

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना बद्दल ( इथे वाचा )

माझा लाडका भाऊ योजना बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा )

माझी लाडकी बहिण योजना बद्दल माहिती साठी (इथे क्लिक करून वाचा )

विश्वकर्मा योजना छोट्या व्यावसायिकांसाठी कर्ज योजना (इथे वाचा )

PM Internship Yojana २०२४ (इथे क्लिक करून वाचा )


अशाच विविध माहिती करिता आपण या ठिकाणी नक्की भेट या आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा .धन्यवाद .

येथून शेअर करा

Leave a Comment