नमस्कार,आज आपण या लेखामध्ये नवनाथ भक्तिसार Navnath Bhaktisar , Navnath Bhaktisar Pdf,नवनाथ ग्रंथाचा महिमा,ग्रंथाचे पारायण कसे करावे व या ग्रंथाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.navnath granth information in Marathi नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे खूप लोक मनोभावे पारायण करतात.Navnath name navnath bhaktisar नवनाथ पारायण करण्यासाठी नवनाथाचा फोटो घरी असावा. navnath photo नवनाथ ग्रंथातील पाचवा अध्याय वाचल्यास वाईट शक्तींचा नाश होतो. navnath bhaktisar adhyay 5 नवनाथ मंत्र navnath mantra
श्री नवनाथ ग्रंथ हा नाथपंथाचा एक आध्यात्मिक ग्रंथ आहे. हे शास्त्र भक्तांना दिव्य अनुभव देतात. नवनाथ पारायण विधी, योग्य पद्धतीने केल्यास, केवळ आध्यात्मिक शांतीच नाही तर जीवनाला नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरते. या लेखात आपण पारायणाची पद्धत, तयारी, शुभ मुहूर्त आणि अध्याय वाचनाचे महत्त्व याविषयी माहिती पाहणार आहोत.
श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा Navnath Bhaktisar महिमा
नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ नवनाथ संप्रदायातील सिद्धांच्या चरित्र कथा भक्ती कथांचा एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ “धोंडीसूत मालू नरहरी” यांनी लिहिला असून ग्रंथाच्या समारोपातील ओव्यांवरून समजते की हा ग्रंथ शके १७४१ प्रमाथी संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस लिहून पूर्ण झाला होता. नवनाथ संप्रदायातील सिद्धांच्या कथांचे वर्णन त्यांचे शिकवणी सांगणारा हा ग्रंथ म्हणजे नवनाथ संप्रदायातील नऊ गुरू, नऊ संत, किंवा नऊ नाथ किंवा नऊ गुरूंचा अंश असे मानून अत्यंत आदराने या ग्रंथाचे पूजा व पारायण केले जाते. श्री नवनाथ भक्तिसागर ग्रंथ हे नाथपंथाची परंपरा आणि तत्वज्ञान समजून घेण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. यात नवनाथांच्या करमणुकीचे, शिकवणीचे आणि भक्तांना ज्ञानप्राप्तीचे मार्गाचे वर्णन केले आहे. हे पुस्तक साधकांसाठी मार्गदर्शकाचे काम करते.

9 नाथांची नावे काय आहेत ? Navanath List in Marathi ? Navnath names
नवनाथांची नावे | समाधीस्थान |
मच्छिंद्रनाथ | सावरगाव ता. आष्टी, जि.बीड |
गोरक्षनाथ | मंजरसुंभा, ता. जि. अहील्यानगर |
गहिनीनाथ | चिंचोली ता. आष्टी जि.बीड |
जलिंदरनाथ | यावलवाडी, ता. शिरूर , जि.बीड |
कानिफनाथ | मढी , ता. पाथर्डी,जि. अहिल्यानगर |
भर्तरिनाथ | हरंगुळ, ता. गंगाखेड, जि. परभणी |
रेवणनाथ | विटेगाव , ता. खाणापुर ,जि.सांगली |
नागनाथ | वडवळ, ता.चाकुर ,जि.लातूर |
चरपटीनाथ. | गुप्त भ्रमण सुरू आहे |
Navnath Bhaktisar पारायण सुरू करण्यापूर्वी तयारी
Navnath Bhaktisar पारायण सुरू होण्यापूर्वी काही तयारी करणे आवश्यक आहे. सकाळी लवकर उठावे गोमुत्र टाकून स्नान करावे. तुळशीस पाणी घालावे नियमित देवपुजा करावी. मोठ्या माणसांना नमस्कार करावा. देवाच्या जवळ स्वच्छ जागेवर चौरंग ठेवावा. त्यावर लाल वस्त्र टाकावे . त्यावर श्री नावानाथांचा फोटो ठेवावा समोर तांदुळ याची रास मांडावी. त्याराशित एक नाणे ठेवावे त्यावर रिकामा ताब्या ठेवावा. ताब्यात पाणी घालावे व पाण्यात हळद, कुंकुं, अक्षदा, एक नाणे, एक सुपारी टाकावी ५ विड्याची ची पाने लावावी. त्यावर श्रीफळ ठेवावे.
तांब्यास अष्टगंधाची ५ बोटे ओढावीत स्वस्तिक, त्रिशूल काढावे श्रीफळावर ओम काढावा. कलशाच्या उजव्या बाजुस विड्याची २ पाने ठेवावी त्यावर तांदुळाचीची रास मांडावी राशीत एक नाणे ठेवावे एक सुपारी पंचामृत, गुलाब पाणी शुध्दपाण्याने धुऊन पुसुन त्यावर ठेवावी गणपतीचे नामस्मरण ११ वेळ करुन हलद कुंकुं अक्षदा अत्तर गंध फुले वाहावी. मागे एका सरळ रेषेत तांदळाच्या ३ राशी माडाव्या अशा ३ ओळी माडाव्या समोर एक राश माडावी प्रत्येक राशीत एक एक नाणे ठेवावे.
एक एक सुपारी घेऊन पंचामृत गुलाब पाणी व शुध्द पाण्याने स्वछं धुऊन पुसुन घ्यावे प्रत्येक राशीवर थोडे भस्म टाकावे व एक एक सुपारी राशीवर ठेवत जावी सर्व सुपारी ठेऊन झाल्यावर अत्तर लावावे. प्रत्येक सुपारीस गंधफुल वाहावे एक एक सुपारीस स्पर्श करुन गायत्री मंत्राचा ११ वेळ जप करावा फुले वाहावी व परत समोरील सुपारीस फुले तुळस पत्रे किंवा बेलपाने वाहत ११ वेळ ओम चैतन्य दत्तात्रयाय नम: जप करावा व प्रत्येक सुपारीस अशीच पुजा करावी नवनाथांच्या नावाचा जप करा फुले तुळस, बेलपाने वाहावी. ब्रह्मचर्य पाळा.

Navnath Bhaktisar पारायण पद्धत
पारायण शुभ नक्षत्र आणि तिथीमध्ये सुरू करावे. शुभ नक्षत्र: रोहिणी, अश्विनी, पुष्य, अनुराधा, रेवती.शुभ दिवस शुक्रवार आणि पौर्णिमा तिथी.
Navnath Bhaktisar नियमित वाचन
दररोज शास्त्राचे 3 ते 5 अध्याय वाचा. एकाग्रतेने आणि निष्ठेने वाचा.
आरती आणि भजन पठणानंतर श्री गणेश, श्री शिव आणि श्री नवनाथ यांची आरती करावी.
भजन आणि कीर्तन करा.
श्री नवनाथांच्या कार्याचे मनन करावे.
1. शांतता आणि एकाग्रता वाचताना बाहेरचा आवाज टाळा. मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवा.
2. सात्विक अन्न:
शुद्ध आणि सात्विक अन्नच खावे.
कांदा आणि लसूण टाळा.
शक्य असल्यास कुटुंबासह पारायण करावे. सामूहिक वाचनाने ऊर्जा आणि भक्ती वाढते.
दैवी अनुभव
Navnath Bhaktisar पारायण दरम्यान आणि नंतर भक्तांना अनेक दिव्य अनुभव येतात. पारायण चालू असताना डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या कुशीवर झोपले असता नवनाथ महाराज आपल्या स्वप्नात येतात व आपल्याला अनुभव देतात म्हणून पारायण काळात डाव्या कुशीवर झोपावे. बेडवर झोपू नये. जमिनीवर घोंगडी अंथरून झोपावे. पारायण चालू असताना पर अन्न वर्ज करावे. पारायण चालू असताना वाईट बोलू नये. व कोणाशी भांडण करू नये.
Navnath Bhaktisar पारायण झाल्यानंतर देखील नवनाथ महाराजांच्या मंत्राचे पठण करावे. ओम श्री नमो चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो या मंत्राचे पठण हाताच्या नाडीवर करावे. या मंत्राचे पठण केले असता आपल्याला अनेक शुभ मिळते. पारायण चालू असताना गावाला जाऊ नये स्वच्छ कपडे घालावीत. स्त्रिया पारायण करत असतील तर स्त्रियांनी साडी घालावी व पदर घेऊन वाचन करावे. पारायणाच्या शेवटी लहान नऊ बालकांना जो महाप्रसाद करणार आहे तो प्रसाद द्यावा व दक्षिणा द्यावा.
1. आध्यात्मिक शांती
पारायण केल्यानंतर मनाला शांती मिळते.
2.घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.
3. भक्तांना श्री नवनाथांशी संबंधित स्वप्ने पडतात.
4.पारायण दरम्यान अनेक भक्तांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचा अनुभव आला आहे.पारायणाच्या शेवटच्या दिवशी पूजा आणि आरती करा. पंचामृत व प्रसाद वाटप करा. गरिबांना दान करा. ध्यान करा आणि श्री नवनाथांचे आभार माना. शेवटी, कुटुंबासोबत सामूहिक आरती करा.
श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे योग्य पद्धतीने आणि भक्तीने पठण केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात. हे आत्म्याला शुद्ध करते आणि देवाशी जोडण्याचा मार्ग मोकळा करते. पारायण दरम्यान नियमांचे पालन करणे आणि पवित्रता राखणे खूप महत्वाचे आहे. दैवी अनुभव प्राप्त करण्यासाठी भक्ती आणि श्रद्धेने या पद्धतीचा अवलंब करा.

नवनाथ पारायण- नियम, महत्व, आणि पद्धत
Navnath Bhaktisar पारायण हे भक्ती, श्रद्धा, आणि आत्मिक ग्रंथ आहे. श्रावण महिन्यात नवनाथ महाराजांच्या कृपेने पारायण केल्याने साधकाच्या जीवनातील अडथळे दूर होतात. नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो, आणि इच्छित फलप्राप्ती होते.
नवनाथ पारायणाचे महत्व
नवनाथ हे शक्तिशाली योगी असून, त्यांच्या कृपेने साधकाला वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते. जीवनातील अडथळे, वाईट नजर, किंवा करणी दूर होण्यासाठी नवनाथ पारायण अत्यंत प्रभावी आहे.
नवनाथ पारायणाने घरात सात्त्विकता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा प्रबळ होते.
पारायण करण्याची पद्धत
१. ग्रंथाची निवड
नवनाथ भक्तिसार ग्रंथ, ज्यामध्ये ९०० श्लोक आहेत, पारायणासाठी योग्य आहे.
नऊ अध्यायांमध्ये विभागलेला हा ग्रंथ एक दिवसात किंवा नऊ दिवसांत वाचता येतो.
२. मांडणी
घरातील पूर्व किंवा पश्चिम दिशेला नवनाथ महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवा.
फोटोच्या बाजूला मंगल कलश ठेवा.
रांगोळी काढून, धूप-दीप प्रज्वलित करून नैवेद्य दाखवा दूध, साखर.
३. पारायणाची वेळ
सकाळी सूर्योदयानंतर.
प्रदोषकाळी संध्याकाळी चारनंतर.
४. पारायणाच्या आधी मंत्र
स्वामी स्तवन
नवार्ण मंत्र ॐ अँड व्री क्लीं चामुंडायै विच्चे
शाबरी मंत्र ॐ श्री चैतन्य गोरक्षाय नमः
गणपती अथर्वशीर्ष पठण केल्यावर वाचन सुरू करा.

पारायणाचे नियम
पारायणाच्या दरम्यान
एका बैठकीत पूर्ण अध्याय वाचा.
ब्रह्मचर्याचं पालन करा.
कांदा-लसूण, मसालेदार पदार्थ, आणि बाहेरचे जेवण वर्ज्य करा.
महिलांनी साडी किंवा डोक्यावर पदर असलेला पंजाबी ड्रेस घालावा.
काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल – श्री क्षेत्र गाणगापूर दत्त मंदिर एक पवित्र तीर्थस्थान या विषयी संपूर्ण माहिती मराठीत
संकल्प
पारायण करताना संकल्प करा की हे कार्य अखंड चालेल.
नवनाथ पारायण प्रकार
एकदिवसीय पारायण एका दिवशी संपूर्ण ग्रंथ वाचावा.
सात/नऊ दिवसांचे पारायण दररोज एक अध्याय वाचून संपूर्ण पारायण पूर्ण करावे.
३६ दिवसांचे पारायण विशिष्ट कारणांसाठी ३६ दिवस सलग पारायण करावे.

Navnath Bhaktisar नवनाथ भक्तिसार Pdf
संपूर्ण pdf डाऊन लोड करण्यासाठी इथे क्लिक करा – नवनाथ भक्तिसार Pdf
नवनाथ पारायणाचे फल
साधकाच्या आयुष्यातील वाईट शक्ती, करणी, दोष नष्ट होतात.
घरात शांती, समृद्धी आणि आनंद नांदतो.
ज्यांच्या जीवनात अडथळे आहेत. त्यांना मार्ग सापडतो. पारायण झाल्यावर नऊ नाथांच्या रूपाने नऊ मुलांना किंवा गाईला नैवेद्य अर्पण करा.
नैवेद्यात तांदळाची खीर, उडीद वडे, आणि श्रावणी घेवडा असाव्यात. नवनाथ पारायण हे केवळ धार्मिक कार्य नसून आध्यात्मिक शक्तिशाली मार्ग आहे. गुरुचरित्राप्रमाणेच, नवनाथ भक्तिसार वाचनाने भक्ताचे मनोबल वाढते, आणि त्याला नवनाथ महाराजांची कृपा लाभते.
नवनाथ भक्तिसार विकिपीडियावरील माहिती इथे वाचा – (इथे क्लिक करा)
हेही वाचा – Kuravpur Information in Marathi कुरवपूर संपूर्ण माहिती मराठीत
श्री नवनाथ ग्रंथ हा नाथपंथाचा एक आध्यात्मिक ग्रंथ आहे. हे शास्त्र भक्तांना दिव्य अनुभव देतात. नवनाथ पारायण विधी, योग्य पद्धतीने केल्यास, केवळ आध्यात्मिक शांतीच नाही तर जीवनाला नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरते
तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा .
धन्यवाद !