PM Vishwakarma Yojana 2024 ऑनलाइन अर्ज कसा करावा, पात्रता, लाभ कोणाला मिळणार, काय अटी आहेत संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या लेखात.
नमस्कार , आपणा सर्वांना माहिती आहे की आपला भारत देश हा वेगवेगळ्या संस्कृती,कलाकुसरी,शिल्पकला,खादी उद्योग,हस्तकला इ. जपणारा देश आहे. आपल्या भारतामध्ये अनेक असे कुशल कारागीर आहेत ज्यांना कधीकधी मदतीची गरज भासते त्यांचा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी. याच कलाकुसरी हस्तकला व कारागिरांच्या कौशल्याने आपल्या देशाला संपूर्ण जगभरात एक विशिष्ट ओळख मिळवून दिली आहे.
म्हणूनच PM Vishwakarma Yojana 2024 या योजनेअंतर्गत भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 ही सुरू केली आहे. भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपारिक हस्तकला आणि कारागिरांना सहाय्य देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी आहे. या योजनेमुळे संपूर्ण देशातील कारागिरांनी त्यांचे कौशल्य जतन करावे तसेच त्यांना या उद्योगातून आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून भारत सरकारने 17 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घोषित केली आहे.
योजनेची वैशिष्ट्ये व उद्दिष्टे
PM Vishwakarma Yojana या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात एकूण 18 पारंपारिक उद्योगांचा समावेश केलेला आहे. यासाठी सरकारने 13000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे .
या योजनेमुळे पारंपारिक शिल्पकला,हस्तकला,कलाकुसरी मध्ये काम करणाऱ्या कारागिरांना आर्थिक मदत तसेच प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाबद्दल माहिती दिली जाणार आहे आणि आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सक्षम,आत्मनिर्भर करण्यावरती भर दिला गेला आहे. आपल्या पारंपारिक कलाकुसरी हस्तकलेचे जतन व्हावे आणि कारागिरांना देखील आर्थिक सहाय्य मिळावे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. PM Vishwakarma Yojana सध्या पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी( 2023-24) ते (2027-28)या कालावधी साठी मंजुरी मिळाली आहे.या योजनेमुळे हस्तकला उद्योग व पारंपारिक कला यामध्ये काम करणाऱ्या कारागिरांची गुरु शिष्य परंपरा असेल अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपारिक कौशल्य जपण्यासाठी चा उद्योग असेल तर अशा उद्योगांना या योजनेमार्फत अधिक बळकटी मिळेल व यांच्या हस्तकलेचा दर्जा अधिक सुधारावा तसेच ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हे देखील या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे
काय आहे ही योजना ?योजनेबद्दल माहिती
प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र
या PM Vishwakarma Yojana योजनेमध्ये सहभागी लाभार्थ्यांना पाच ते सात दिवसांचे (चाळीस तासांचे) कौशल्य प्रशिक्षण दिले जाते, या ट्रेनिंगच्या दरम्यान कारागिरांना पाचशे रुपये प्रति दिवस प्रमाणे ट्रॅव्हलिंग भत्ता किंवा प्रोत्साहन म्हणून पाचशे रुपये दिले जातात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाते ज्यामुळे त्यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळणे सोपे होते.
टूल किट म्हणजे नेमके काय ?
टूल किट म्हणजे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर कारागिरांना व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी एक आर्थिक मदत म्हणून पंधरा हजार रुपये दिले जातात.
मार्केटिंग आणि व्यवसाय सहाय्य
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांचा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी व त्याचे मार्केटिंग करण्यासाठी देखील व्यवसाय सहाय्य केले जाते.
कर्ज किंवा लोन किंवा अनुदान
या योजनेअंतर्गत वरती सांगितल्याप्रमाणे लाभार्थ्यांना पाच ते सात दिवसांचे ट्रेनिंग देऊन टूलकिट करिता 15 हजार रुपये दिले जातात.याशिवाय या योजनेचे मोठी खासियत म्हणजे व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला एक लाख रुपये कर्ज मिळते हे कर्ज बँकेमधून कोणत्याही हमीशिवाय म्हणजे सिक्युरिटी शिवाय कारागिरांना मिळते याकरिता (5 %) व्याजदर लागेल . हे कर्ज वेळेवर म्हणजे एक वर्षांमध्ये जर फेडले तर दुसरा टप्प्यात दोन लाख रुपये कर्ज मिळू शकते जे पुढील 30 महिन्यात फेडायचे असते.असे एकूण ३ लाख रूपापर्यंत चे कर्ज उपलब्ध करून दिले जाते .
लाभ कोणाला मिळेल ?
या योजनेचा लाभ मुख्य करून ग्रामीण तसेच शहरी भागातील पारंपारिक कारागिरांना मिळणार आहे. पुढील पाच वर्षात जवळजवळ 30 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
एकूण 18 शिल्पकला किंवा लघु व्यवसाय कोणते आहेत ?
- सुतार
- फोडी बांधणी कारागीर
- चिलखत बनवणारे कारागीर
- लोहार
- हातोडी आणि अवजार बनवणारे
- कुलूप बनवणारे
- सोनार
- कुंभार
- शिल्पकार यामध्ये मूर्तिकार दगडी कोरीव काम दगड फोडणारे इ.
- चर्मकार (चप्पल पादत्राणे बनवणारे कारागीर)
- मिस्त्री बांधकाम
- टोपल्या चटई झाडू अशा प्रकारचे साहित्य बनवणारे कारागीर.
- बाहुल्या आणि पारंपारिक लाकडी खेळणी बनवणारे कारागीर.
- न्हावी (केश करताना कार)
- फुलांचे हार बनविणारे कारागीर
- धोबी (परीट)
- शिंपी( शिलाई काम करणारे )
- मासेमारीचे जाळे विणणारे
PM Vishwakarma Yojana ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला https://pmvishwakarma.gov.in /तुमच्या जवळच्या csc centre किंवा सायबर कॅफे ला जावे लागेल
- CSC केंद्रातून अर्ज भरणे – तुम्हाला अर्ज करण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जावे लागेल. तिथे तुम्ऑहाला फॉर्म भरता येईल.फोर्ममधे कोणत्याही चुका होऊ देवू नका .फॉर्म भरून झाल्यावर
- प्रिंटआउट घ्या – फॉर्म भरल्यानंतर चार पानांची प्रिंट घ्या आणि ती सुरक्षित नीट ठेवा.
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन – फॉर्म भरल्यावर ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका किंवा इतर स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर तुमचं डॉक्युमेंट/कागदपत्रे यांचे व्हेरिफिकेशन होईल.
- प्रशिक्षण/ट्रेनिंग – अर्ज मंजूर झाल्यानंतर, आठ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते . प्रत्येक दिवशी 500 रुपये खर्चासाठी दिले जातील तुमचा प्रवास भत्ता समजा किंवा दिवसाचा खर्च म्हणून ट्रेनिंग दरम्यात रोज ५०० रु. मिळतील .
- टूल किट आणि लोन/कर्ज – प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 15 हजार रुपये टूल किट म्हणून मिळतील , ज्याचा वापर तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करता येईल. याशिवाय त्यानंतर १ लाख रुपयांपर्यंत कोणतीही हमी न घेता बनके कडून तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कर्ज मिळू शकते.
सूचना PM Vishwakarma Yojana
तुमच्याकडे या कोणत्याही व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र एखाद्या शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून घेतलेले असावे.असे नसेल तर या प्रमाणपत्राशिवाय तुमचा अर्ज रद्द होईल .शिवाय तुमचे सर्व कागदपत्र बरोबर आहेत का याची दक्षता घ्यावी .कारण विश्वकर्मा योजना हे एक उत्तम साधन आणि संधी आहे ज्यामुळे छोटे उद्योजक आपले व्यवसाय वाढवू शकतात. पण, योग्य माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज करणे हे खूप महत्त्वाचे आहे.
PM Vishwakarma Yojana अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- व्यवसायाच्या प्रमाणपत्र (सरकार मान्यताप्राप्त)
- बँकचे पासबुक
- उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे .)
- जातीचा दाखला प्रमाणपत्र (SC/ST/OBC साठी)
अर्ज प्रक्रिया – PM Vishwakarma Yojana
- CSC केंद्रातून अर्ज भरणे: तुम्हाला अर्ज करण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जावे लागेल. तिथे तुमचं ऑनलाईन फॉर्म भरता येईल.
- प्रिंटआउट घ्या: फॉर्म भरल्यानंतर चार पानांची प्रिंट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन: फॉर्म भरल्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका किंवा अन्य स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल.
- प्रशिक्षण: अर्ज मंजूर झाल्यानंतर, आठ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक दिवशी 500 रुपये खर्चासाठी दिले जातील.
- किट आणि लोन: प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 15 ते 20 हजार रुपये किट मिळेल, ज्याचा वापर तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करता येईल. याशिवाय, एक लाख रुपयांपर्यंत बिन हमी लोन मिळू शकते.
सतत विचारले जाणारे प्रश्न – PM Vishwakarma Yojana
प्रश्न 1: PM Vishwakarma Yojana योजना काय आहे?
उत्तर: पी.एम विश्वकर्मा योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक योजना आहे जी कुशल कारागीर, शिल्पकार,पारंपरिक वारसा हक्काने चालणारे कौशल्य युक्त काम अशा कामांकरिता आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, आणि व्यवसाय विकासासाठी मदत देऊन त्यांना आर्थिक साहाय्य केले जाते .
प्रश्न 2: या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?
उत्तर: लोहार, सोनार , राजमिस्त्री, न्हावी , धोबी, कुंभार, आणि इतर पारंपरिक व्यवसायात कार्यरत असलेले शिल्पकार या योजनेचा लाभ घेऊ शकतात याबद्दल अधिक माहिती वरती वाचा .
प्रश्न 3: या PM Vishwakarma Yojana योजने अंतर्गत किती कर्ज मिळू शकते?
उत्तर: योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये आणि वेळेवर परत फेड केल्यास दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते.
प्रश्न 4: कर्जावर किती व्याजदर लागतो?
उत्तर: कर्जावर 8% पर्यंत व्याज सरकारकडून दिले जाते, त्यामुळे तुम्हाला केवळ 5% व्याजदरावर कर्ज मिळू शकते.
प्रश्न 5: अर्ज करण्याची काय प्रक्रिया आहे?
उत्तर: अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्याया सायबर कॅफे मधे जाऊन सी.एस.सी लॉगिनद्वारे अर्ज भरावा लागतो. तुम्हाला तुमचा आधार आणि बायोमेट्रिक वेरिफिकेशन करणे यासाठी आवश्यक आहे.
प्रश्न 6: अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात ?
उत्तर: आधार कार्ड, आधारशी जोडलेला मोबाइल नंबर, बँक खाते तपशील, आणि काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
प्रश्न 7: या योजनेअंतर्गत प्रशिक्षण एकूण किती दिवसांचे असते?
उत्तर: प्रशिक्षण 5-7 दिवसांचे (40 तासांचे) असते, या दरम्यान लाभार्थ्यांना प्रति दिवस 500 रुपये भत्ता दिला जातो .
प्रश्न 8: या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मी कोठे संपर्क करू शकतो?
उत्तर: अधिक माहितीसाठी, तुम्ही pm.gov.in या वेबसाइटवर जाऊ शकता किंवा नजीकच्या सीएससी केंद्रावर संपर्क करू शकता किंवा या शिवाय अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट करून विचारू शकता .
प्रश्न 9: अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासू शकतो?
उत्तर: तुम्ही लॉगिन करून पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासू शकता जिथे फॉर्म भरला त्याठिकाणी जाऊन चेक करू शकता .
प्रश्न 10: PM Vishwakarma Yojana अर्जामधे काही समस्या असल्यास काय करावे?
उत्तर: जर तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये कोणतीही समस्या आली तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
प्रश्न 11: ही PM Vishwakarma Yojana योजना किती कालावधीसाठी आहे?
उत्तर: PM Vishwakarma Yojana 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल.
प्रश्न 12: या PM Vishwakarma Yojana योजनेचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय असेल?
उत्तर: या PM Vishwakarma Yojana योजनेमुळे कारीगरांची आर्थिक स्थिती सुधारेल, त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढेल आणि जागतिक स्तरावर भारतीय सांस्कृतिक वारशाला नवी ओळख मिळेल. यामुळे कारीगरांची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि ते अधिक आत्मनिर्भर होतील.
याशिवाय अधिक योजना मनोरंजन विश्वाबद्दल तसेच धार्मिक गोष्टीबद्दल अधिक माहिती खाली वाचा
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना बद्दल ( इथे वाचा )
माझा लाडका भाऊ योजना बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा )
माझी लाडकी बहिण योजना बद्दल माहिती साठी (इथे क्लिक करून वाचा )
मनोरंजन विश्व – बिग बॉस मराठी सिझन 5 (इथे वाचा )