Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti|संत ज्ञानेश्वर महाराज माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये एक महान संत ज्ञानेश्वर महाराज Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti यांच्या विषयी मराठीत माहिती पाहणार आहोत. Sant Dyaneshvar Maharaj Mahiti संत ज्ञानेश्वर महाराज यांचे बालपण कोठे व कशा प्रकारे गेले. त्यांच्या वडिलांचे नाव काय होते. त्यांच्या आईचे नाव काय होते . त्यांना किती भावंडे होती त्यांचे पहिले गुरू कोण होते. त्यांनी वयाच्या कितव्या वर्षी समाधि घेतली.Sant Dyaneshvar Maharaj Samadhi ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कधी असते व कुठल्या रूटने पालखी सोहळा पंढरपूर कडे जातो. Sant Dyaneshvar Maharaj Palkhi Route ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग व संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती . Sant Dyaneshvar Maharaj Aarti याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत . संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव 28 नोव्हेंबरला आहे. हा कार्यक्रम आळंदी मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वर महाराजा महान संता पैकी एक होते . ते नुसते संत नसून महान योगी, तत्त्वज्ञान आणि संत कवी होते. महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील ते एक अद्वितीय संत होते. त्यांचे योगदान केवळ धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी साहित्य आणि समाजातील प्रत्येक घटकात मोलाचे योगदान दिले. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे ज्ञान व योग्य मार्गदर्शन करणारे हे संत होते.

त्यांच्या ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि हरिपाठ या ग्रंथांनी भक्ती चळवळीला नवी दिशा तर दिलीच पण मराठी भाषा आणि साहित्यही समृद्ध केले. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या अभंग ज्ञानेश्वरी अमृतानुभव हे ग्रंथ आणि पसायदान आज देखील मोठ्या आदराने सर्व लोक म्हणतात.


Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti

संत ज्ञानेश्वरांचे चरित्र

संत ज्ञानेश्वरांचे चरित्र Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti


संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंबात इसवी सन १२७५ मध्ये झाला. त्यांचे वडील विठ्ठल पंत आणि आई रुक्मिणीबाई या धार्मिक स्वभावाच्या होत्या. ज्ञानेश्वरांचे घराणे नाथ संप्रदाय आणि वारकरी परंपरेशी निगडित होते. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत यांनी विवाह नंतर संन्यास घेतला होता. त्यांच्या गुरुला समजले की ते विवाहित आहे तेव्हा त्यांनी काशी ऊन त्यांना परत जाण्यास सांगितले. विठ्ठल पंत हे त्यांच्या गुरुच्या आज्ञेनुसार त्यांच्या गावी व घरी आले. अगदी लहान असल्यापासूनच या चारही भावंडांना वडिलांकडून विद्याचे बाळकडू मिळाले होते व आईकडून चांगल्या प्रकारचे संस्कार मिळाले होते. त्यामुळे पुढे चालून हे सर्व मुले संस्कारी व न्यानी बनली.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील हे संन्याशी होते. म्हणून त्यांच्या गावातील लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. पण ते लोकांच्या त्रासाला न डगमगता ठामपणे उभा राहिले . व प्रत्येकाचा त्रास सहन केला अगदी कोणालाही काही न बोलता सगळा त्रास सहन केला.


ज्ञानेश्वरांची तीन भावंडे

निवृत्तीनाथ – संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ व त्यांचे गुरु होते.

सोपानदेव – हे त्यांचे भाऊ आणि कवी होते.


मुक्ताबाई – त्यांची बहीण होती.
ज्ञानेश्वरांनी लहान वयातच विद्वत्ता दाखवली त्यांच्या ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि हरिपाठ या ग्रंथांनी भक्ती चळवळीला नवी दिशा तर दिलीच पण मराठी भाषा आणि साहित्यही समृद्ध केले


Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti

ज्ञानेश्वर आणि त्यांचे ग्रंथ – Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti

  1. ज्ञानेश्वरी
    हा ग्रंथ भगवद्गीतेचा मराठीत अनुवाद आहे. आल्या 9000 ओव्या आहेत, ज्यात गीतेच्या श्लोकांचे साधे आणि पद्धतीने अर्थ सांगितला आहे. ज्ञानेश्वरीत केवळ धार्मिक घटक नाहीत, तर ती जगण्याचे तत्त्वज्ञानही लोकांना देते. अवश्य सगळ्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे व ते पारायण करावे. व ते पारायण सामुदायिक पद्धतीने केले असता त्याचे फळ खूप जास्त पटीत मिळते.
  2. अमृतानुभव
    या ग्रंथात अद्वैत तत्त्वज्ञानाचा विस्तार केला आहे. हे पुस्तक ज्ञान सर्व लोकांपर्यंत प्रयत्न केला आहे.
  3. हरिपाठ
    हरिपाठात २८ भक्ती अभंग आहेत. ही गाणी वारकरी संप्रदाय आवडीने गातात. ज्या ठिकाणी भजन असते व किर्तन असते त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग घेतले जातात व कीर्तनामध्ये एखादा अभंग घेऊन त्याचे अर्थ सांगितला जातो.

वारकरी संप्रदाय आणि संत ज्ञानेश्वर – Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti


वारकरी संप्रदायाचा मुख्य उद्देश भक्तीतून सामाजिक समता आणि आत्मशुद्धी वाढवणे हा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज हे पंढरपूरच्या विठोबाला पूजनीय दैवत मानत होते.

वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्ये
विठ्ठलाची भक्ती.
समाजातील जातिभेद व भेदभाव दूर करणे.
भजन, कीर्तन, अभंग यातून भक्ती.
ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या प्रवचनातून आणि गीतांमधून या पंथाला सखोलता आणि ओळख दिली.

ज्ञानेश्वर आणि नाथ संप्रदाय
ज्ञानेश्वर महाराजही नाथ संप्रदायाशी संबंधित होते. हा संप्रदाय योग आणि तत्वज्ञानावर आधारित आहे. त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आणि नाथ संप्रदायाचे अनुयायी होते. नाथ संप्रदायाचे लक्ष मानवी जीवनाला आध्यात्मिक उंचीवर नेण्यावर होते.

संत ज्ञानेश्वरांचा सामाजिक संदेश
ज्ञानेश्वर महाराजांचे ध्येय केवळ आध्यात्मिक ज्ञानापुरते मर्यादित नव्हते. समाजसुधारणेवरही त्यांनी भर दिला. त्यांचे विचार आजही समर्पक आहेत.

ज्ञानेश्वरांचे प्रमुख सामाजिक संदेश
जातिवादाला विरोध महाराज हे सर्वांना म्हणत होते.
ते महिलांचा खूप आदर करायचे. मुक्ताबाई त्यांच्या विचारांचे प्रतीक होत्या.
शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार : शिक्षण सर्वांसाठी असले पाहिजे हे त्यांनी आपल्या ग्रंथातून दाखवून दिले.
ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी
संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी समाधी घेतली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी या गावी समाधी घेतली. हे ठिकाण आजही भाविकांचे तीर्थक्षेत्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सुरुवात ही आळंदी येथून होते.
त्यांच्या समाधीमागे एक महान संदेश आहे – आत्मा अमर आहे आणि जीवनाचा उद्देश भक्ती आणि सेवा आहे.

हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा |पुण्याची गणना कोण करी ।

अतिशय सरळ शब्दात संत ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगरचना केल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द म्हणजे, जसे ‘अमृत कण कोवळे’ इतके नाजूक आहेत. त्या शब्दांचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की, सातशे वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी त्या अभंगांची गोडी तेवढीच ती कमी झाली नाही व कधीही कमी होणार नाही.
ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून पंढरपूरकडे आषाढी एकादशी वारी निमित्त रवाना होते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व मानले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आषाढी वारीच्या एक दिवस अगोदर पंढरपूर मध्ये पोहोचते. या वारीचा मार्ग हा ठरलेला आहे. व मागे व पुढे सर्व वारकरी असतात . व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीमध्ये असतात.


संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुढील मार्गाने पंढरपूर कडे जाते.
आळंदी

पुणे

सासवड

जेजुरी

वाल्हे

लोणंद

तरडगाव

फलटण

बरड

माळशिरस

वेळापूर

भंडी शेगाव

वाखरी

पंढरपूर

रिंगण


Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti

संत ज्ञानेश्वर महाराज आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||

लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |
नाम ठेविलें ज्ञानी || १ ||

कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबरही |
साम गायन करी || २ ||

प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें | रामा जनार्दनी |
पायीं मस्तक ठेविलें || ३ ||



संत ज्ञानेश्वर महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे एकमेवाद्वितीय संत आहेत. त्यांचे धर्मग्रंथ, विचार आणि भक्तिगीते आपल्याला जीवनातील प्रत्येक पैलू समजून घेण्याची प्रेरणा देतात.

त्यांची शिकवण आपल्याला शिकवते की भक्ती ही केवळ मंदिरांपुरती मर्यादित नाही तर ती आपल्या कृती, विचार आणि वागण्यातून नाही तर दररोजच्या जीवनात उपयोग झाला पाहिजे.


Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti

नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी
जन्मश्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५)
जन्मस्थान आपेगाव, पैठण, महाराष्ट्र.
वडीलविठ्ठलपंत कुलकर्णी
आईरुक्मिणीबाई कुलकर्णी
भाऊनिवृत्तीनाथ (मोठे भाऊ), सोपानदेव,
बहीणमुक्ताई
ग्रंथज्ञानेश्वरी ,अमृतानुभव ,हरिपाठ
ग्रंथवयाच्या 21 व्या वर्षी 1296
Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti

सरकारी योजनाच्या माहिती करा खाली वाचा

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना बद्दल ( इथे वाचा )

माझा लाडका भाऊ योजना बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा )

माझी लाडकी बहिण योजना बद्दल माहिती साठी (इथे क्लिक करून वाचा )

विश्वकर्मा योजना छोट्या व्यावसायिकांसाठी कर्ज योजना (इथे वाचा )

PM Internship Yojana २०२४ (इथे क्लिक करून वाचा )


येथून शेअर करा

13 thoughts on “Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti|संत ज्ञानेश्वर महाराज माहिती”

Leave a Comment