नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण पाहत आहोत. यावर्षी 2025 मध्ये तर उन्हाळ्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे ती अजून सुरूच आहे. कधी अचानक पाऊस कधी गारपीट कधी जोराचा वारा अशा अनियमित हवामानामुळे पिकांचे नुकसान धान्याचे नासाडी होते. ऐन काढणीच्या वेळी किंवा मळणीच्या वेळी कधी मळणी झाल्यावर पाऊस येतो व यामध्ये शेतकऱ्याच्या धान्याचे नुकसान होते. हे नुकसान म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप मोठा आर्थिक तोटा आहे. असे पिकाचे नुकसान होऊ नये व पिकाचे या अनियमित हवामानापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्याला “ताडपत्री अनुदान योजना” ताडपत्रीची गरज पडते.
ताडपत्रीमुळे शेतकरी काढणीनंतरचे उत्पादन असेल कडबा असेल किंवा शेतीमाल बाजारात पाठवण्यापूर्वी सुरक्षित झाकून ठेवू शकतो. म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदी करता यावी यासाठी “Tadpatri Anudan Yojana 2025” या योजनेअंतर्गत 50 ते 85 टक्के पर्यंतचे अनुदान घोषित केले आहे. जिल्हा परिषदेच्या “महा-डीबीटी (Maha-DBT)”कृषी विभागामार्फत ही “Shetkari yojana” राबवण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू आहेत तर काही ठिकाणी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. बद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या लेखात खाली पाहणार आहोत.
Tadpatri Anudan Yojana 2025 योजनेचा उद्देश
- 1.शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण व्हावे.
- शेतीमाल बाजारात जाण्याअगोदर सुरक्षित साठवून ठेवता यावा.
- शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टळावे.
- अनियमित पाऊस गारपीट हवा यामुळे नुकसान होऊ नये.
- शेतीमाल स्वस्तामध्ये साठवणूक करता यावा.
- राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.
- यामुळे शेती क्षेत्राचा विकास होईल.
- शेतकऱ्यांना आर्थिक अडचण होऊ नये म्हणून ताडपत्री खरेदी करण्यास मदत करणे.
- धान्याचे पिकाचे संरक्षण करणे हा यामागचा उद्देश आहे.

ताडपत्री अनुदानाची वैशिष्ट्ये
- Tadpatri Anudan Yojana 2025 ही योजना जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्यामार्फत राबवली जात आहे.
- या योजनेचा लाभ शेतकऱ्याला थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल DBT(Direct Benifit Transfer) पद्धतीने.
- यामध्ये ताडपत्री खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचे बिल सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा आधार बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.
कोण अर्ज करू शकतो पात्रता
- अर्जदार नक्कीच महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- त्यांच्याकडे स्वतःची शेती असावी.
- या अनुदानाचा लाभ एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला एकदाच दिला जाईल.
- ज्या जिल्ह्यातून अर्जदार अर्ज करत आहे तो शेतकरी त्याच जिल्ह्याचा रहिवासी असावा.
- महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- ज्यांच्याकडे शेती नाही अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
Tadpatri Anudan Yojana 2025आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- सातबारा उतारा.
- बँक खात्याचे पासबुकची प्रत.
- शेतकऱ्याचा रहिवासी दाखला.
- जातीचा दाखला.
- उत्पन्नाचा दाखला.
- मोबाईल नंबर व पासपोर्ट साईज फोटो

अर्ज कसा करावा
ऑफलाईन अर्ज कसा करावा
- आपल्या जवळच्या तालुका कृषी कार्यालय किंवा पंचायत समितीमध्ये जावे.
- त्या ठिकाणाहून Tadpatri Anudan Yojana 2025 अनुदानाकरिता फॉर्म घ्या.
- लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रांसह जावे व ती सादर करावी.
- अर्ज व्यवस्थित भरून द्यावा.
- अर्ज जमा केल्यानंतर कृषी विभागाकडून त्या अर्जाची तपासणी होईल व अर्ज मंजूर केला जाईल.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा
- जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वेबसाईटवर लॉगिन करावे लागेल. त्यासाठी (इथे क्लिक करा.)
- ताडपत्री अनुदान योजना हा पर्याय निवडावा.
- अर्ज ऑनलाईन भरून आवश्यक ते कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करावी.
- त्याचा पूर्णपणे नीट भरला आहे का पाहून आवश्यक ते कागदपत्रे व्यवस्थित पुरवली आहेत का ते पाहावे.
- कोणतेही खोटी कागदपत्रे जोडू नये.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआऊट घ्यावी.
- अर्जाची तपासणी पूर्ण झाल्यावर अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होईल.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सूचना
आता सध्या साठी पाहत असाल तर महाडीबीटी पोर्टलवर ताडपत्री अनुदान उपलब्ध नाही मात्र जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून जर तुम्ही तिथे भेट द्यायला जाण त त्या ठिकाणी अजूनही Tadpatri Anudan Yojana 2025 अर्जाची प्रक्रिया सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही ऑफलाईन अर्ज घेतले जात आहेत. त्यामुळे आपल्या जवळच्या कृषी विभाग कार्यालयामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करावी. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून जे मेसेज अफवा फिरत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीकडे नक्की चौकशी करा कारण अर्ज अजूनही भरणे सुरू आहे अर्जाची नोंदणी झाल्यानंतर पावती जपून ठेवा.

ताडपत्रीसाठी अनुदानाची टक्केवारी
शेतकऱ्यांना ताडपत्रीसाठी दिले जाणारे अनुदान जिल्हा नुसार बदलते आहे. यामध्ये साधारणतः
- 50 टक्के ते 85 टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे. यामध्ये लहान आकाराचे ताडपत्री घेत असाल तर 50 टक्के अनुदान आहे व यासाठी पाच हजार रुपये पर्यंतचे अनुदान मिळेल.
- मध्यम आकाराचे ताडपत्री साठी 65 टक्के अनुदान व सात हजार रुपये इतके अनुदान दिले जात आहे.
- मोठी किंवा ताडपत्रीसाठी 85% अनुदान बारा हजार रुपये पर्यंत अनुदान रक्कम मिळेल.
शेतकरी मित्रांनो Tadpatri Anudan Yojana 2025 ही शेतकऱ्यांसाठी उपयोगी योजना आहे. या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा या उद्देशाने संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल व 50 ते 85 टक्के पर्यंत अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदी करण्यामध्ये थोडीशी मदत होईल व पिकांचे संरक्षण होईल. तर शेतकरी बांधवांनी अवश्य आपल्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा. याव्यतिरिक्त आपल्याला या योजनेमध्ये किंवा इतर योजनांमध्ये कोणतीही अडचणीत असेल किंवा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल – Kanda Chal Anudan Yoajana 2025 | कांदा चाळ योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती मराठी मधे इथे वाचा
धन्यवाद !