Gay Gotha Anudan Yojana | महाराष्ट्र शासन अनुदान योजना 2025,Online Application,फायदे आणि संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्याची नैसर्गिक परिस्थिती पाहता कधी अचानक खूप पाऊस तर कधी पावसाची कमतरता. अशा पद्धतीने अनेक नैसर्गिक तसेच वैयक्तिक अडचणींना सामोरे जात शेतकरी अविरत मेहनत असतो. शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी पशुपालन करतात. त्याकरिता “gay gotha anudan yojana” शेतकरी,पशुपालक, शेळीपालन करणारे, मेंढपाळ, कुक्कुटपालन अशा उद्योगांना चालना देऊन ग्रामीण भागातील युवकांना शेतकरी बंधूंना आर्थिक पाठबळ देण्यासाठी म्हणून ही “महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना 2025” “गाय म्हैस अनुदान योजना 2025” “Pashusavardhan yojana maharashtra” राबविण्यात येत आहे.

या लेखात आपण पशुसंवर्धन विभागाच्या ‘navinyapurn yojana’ “Gay Gotha Yojana” मुख्य योजना कोणत्या? त्यासाठी अनुदान कसे मिळणार आहे ? अर्ज कुठे करायचा? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे? लाभार्थ्यांसाठी कोणते निकष आहेत? “gay gotha yojana pdf” , gay gotha yojana online registration ,Government scheme maharashtra ,.Online aplication , subsidy yojana , Animal husbandry Department याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Gay Gotha Anudan Yojana मुख्य उद्दिष्टे

  • ग्रामीण भागातील शेतकरी,महिला,तसेच बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करणे.
  • दूध व मांस उत्पादनास चालना देणे.जनावरांच्या खरेदीसाठी अनुदान देऊन ग्रामीण भागात दुधाचे उत्पादन वाढवून आर्थिक सक्षमीकरण करणे.
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आधार देणे. अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती जमाती यांचे आर्थिक सबलीकरण करणे.
  • महिलांना सबसिडी देऊन पशुपालन व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे.
  • अपंग लाभार्थ्यांना आरक्षणाद्वारे उत्पन्न मिळवून देणे.
  • SC/ST लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानाचा लाभ दिला जाईल.
  • विमा संरक्षण तीन वर्षाचा विमा शासनाकडून उतरवला जातो म्हणजे प्राणी आजारी किंवा मृत्यू पडत असेल तरी तो तोटा होऊ नये म्हणून विमा संरक्षण देणे. अशा पद्धतीने स्वयंरोजगाराची संधी बेरोजगारीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

Gay Gotha Anudan Yojana
Gay Gotha Anudan Yojana

मुख्य योजना-Government schemes Maharashtra 2025

पशुसंवर्धन विभाग योजना (Animal Husbandry Department Scheme)

Gay Gotha Anudan Yojana या योजनेमध्ये ग्रामीण भागातील पशुपालकांना आर्थिक मदत व्हावी ग्रामीण भागातील दूध उत्पादनाला चालना मिळावी याकरिता दोन दुधाळ देशी किंवा दोन संकरित गाई किंवा दोन म्हशींचे गट वाटप करण्यात येणार आहेत.

लाभार्थी कोण ?

Gay Gotha Anudan Yojana या योजनेसाठी पात्र बचत गटातील महिला,अल्पभूधारक व्यक्ती,दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण इत्यादींना या योजनेचा लाभ घेता येईल.

लाभ कसा मिळेल ?

या दुधाळ देशी दुधाळ संकरित गायी किंवा दोन म्हशींच्या जी गट वाटप होणार आहे याकरिता सर्वसाधारण प्रवर्गातील जे लाभार्थी असतील त्यांना गटाच्या किमतीच्या 50% अनुदान मिळेल व अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना या गटाकरता 75 टक्के अनुदान मिळेल. आता आपण पाहू गटासाठी किती किंमत दिलेली आहे. यामध्ये 70 हजार रुपये प्रति गाय, 80 हजार रुपये प्रति म्हैस म्हणजेच दोन दुधाळ संकरित गाईंसाठी 1 लाख 56हजार 850 रुपये मिळतील. व म्हशींच्या गटाकरिता 1 लाख 79 हजार 250 रुपये मिळतील.
याचा शासन निर्णय खाली जोडलेला आहे पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही वाचू शकता.


दुधाळ जनावरांचा गटवाटप योजना-Gay Gotha Anudan Yojana (Cow & Buffalo Subsidy Scheme)

गट प्रकारगट किंमतपशुधन किंमतविमाअनुदानलाभार्थी हिस्सा
दुधाळ संकरित/देशी गाय (2 गाई)₹1,56,850₹1,40,000 (2 गाई)3 वर्षे75% शासन25% लाभार्थी
सुधारित म्हैस (1 म्हैस)₹1,79,258₹1,60,000 (1 म्हैस)3 वर्षे75% शासन25% लाभार्थी

Gay Gotha Anudan Yojana शासन निर्णय GR खाली download करा

Gay Gotha Anudan Yojana दुधाळ गाय म्हैस वाटप अनुदान GR (इथून डाऊनलोड करा )

संपूर्ण अनुदान माहिती इथे वाचा (click)


शेळी मेंढी पालन करण्याकरता अनुदान योजना

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेळीपालन व मेंढी पालन या शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय व यातून उत्पन्न मिळावे म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे.

लाभ कोणाला मिळेल ?

दहा शेळ्या किंवा मेंढ्या व एक बोकड व एक नरमेंढा असे वाटप होणार आहे. लाभार्थ्यांना गटाच्या किमतीच्या 50% अनुदान हे सर्वसाधारण प्रवरगासाठी असेल. व अनुसूचित जाती जमातींसाठी गटाच्या किमतीच्या 75 टक्के इतक्या अनुदान मिळेल यामध्ये उस्मानाबादी संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच दख्खनी मेंढ्या व अन्य स्थानिक जातीच्या गटांचे वाटप करण्यात येणार आहे.

लाभार्थी

दारिद्र्य रेषेखालील अल्पभूधारक अत्यल्पभूधारक सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गट इत्यादींना याचा लाभ घेता येईल.
गटाची किंमत
उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळी एक लाख 35 हजार 45 रुपये तसेच स्थानिक शेळीची किंमत 78 हजार 231 रुपये. मडग्याळ मेंढ्या एक लाख 28 हजार 850 रुपये. व दख्खनी आणि स्थानिक मेंढ्या एक लाख 3हजार 545 रुपये.

शासन निर्णय जीआर खाली जोडलेला आहे (इथे क्लिक करा).

शेळी व मेंढी गटवाटप योजना (Goat & Sheep Farming Scheme)

जात/गटएकूण किंमतपशुधन किंमतविमाअनुदानलाभार्थी हिस्सा
उस्मानाबादी/संगमनेरी शेळी गट₹1,03,545₹90,0003 वर्षे75% शासन25% लाभार्थी
माडग्याळ/दक्खनी मेंढी गट₹1,03,545₹90,0003 वर्षे75% शासन25% लाभार्थी
स्थानिक जाती गट₹78,231₹68,0003 वर्षे75% शासन25% लाभार्थी

Gay Gotha Yojana
Gay Gotha Anudan Yojana

कुक्कुट पालन पक्षी संगोपन योजना

1000 कुक्कुट पक्षी संगोपनद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय करण्याकरिता ही योजना राबविण्यात येत आहे.

लाभार्थी

अत्यल्पभूधारक अल्पभूधारक सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गट किंवा या तीन मधील वैयक्तिक महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकते.

लाभ कसा मिळेल ?

हा प्रकल्प सुरू करण्यासाठी एकूण किंमत दोन लाख 25 हजार रुपये इतकी जाहीर केले असून. पक्षांचा खुराडा 10 चौरस फूट त्यासाठी लागणारी स्टोर रूम पाण्याचे टाकी राहण्याचे सोय लाईट असे एकूण मिळून दोन लाख रुपये इतर उपकरणे जसे खाद्याची भांडी ब्रुडर पाण्याची भांडी इत्यादी सर्व मिळून 25 हजार रुपये इतके अनुदान जाहीर केले आहे यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के तर अनुसूचित जाती जमातींना 75 टक्के इतके अनुदान मिळेल.

संपूर्ण शासन निर्णय वाचण्याकरिता व डाऊनलोड करता (इथे क्लिक करा)

एकात्मिक कुक्कुट विकास योजना (Poultry Farming Scheme)

गट प्रकारएकूण किंमतसमाविष्ट घटकअनुदानप्रवर्ग
100 एकदिवसीय पिल्ले₹29,500पिल्ले, खाद्य, औषध, वाहतूक, निवारा, भांडी50%सर्व प्रवर्ग (General + SC/ST)
25+3 तल्लंगा पिल्ले₹10,850पिल्ले, खाद्य, वाहतूक, भांडी50%सर्व प्रवर्ग (General + SC/ST)

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड, फोटो
  2. रहिवासी दाखला
  3. जातीचा दाखला (SC/ST असल्यास)
  4. सातबारा किंवा भाडे करार
  5. दारिद्र रेषा प्रमाणपत्र
  6. बेरोजगार नोंदणी प्रमाणपत्र

online अर्ज करण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्या (क्लिक करा ).

Offline अर्ज करण्यासाठीं आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन चौकशी करा व फोर्म भरा.


Gay Gotha Anudan Yojana
Gay Gotha Anudan Yojana

FAQ Gay Gotha Anudan Yojana

Q1. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या योजना कोणत्या आहेत?
👉 गाय-म्हैस योजना, शेळी-मेंढी योजना, कुक्कुटपालन योजना, वैरण विकास योजना, विशेष पशुधन उत्पादन योजना.

Q2. Cow Buffalo Subsidy किती मिळते?
👉 75% Subsidy शासनाकडून आणि 25% हिस्सा लाभार्थीने द्यावा लागतो.

Q3. Goat Farming Subsidy Maharashtra मध्ये किती मदत मिळते?
👉 75% अनुदान शासनाकडून मिळते.

Q4. अर्ज कुठे करायचा?
👉 MAHA BIMS Portal वर Online अर्ज करावा लागतो.

Q5. अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
👉 आधार कार्ड, फोटो, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, सातबारा / भाडेकरार, दारिद्ररेषा दाखला, बेरोजगार नोंदणी.


मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ही जी अनुदान योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबवत आहेत यामध्ये प्रत्येक शेतकरी पशुपालक तरुण महिला बचत गट या सर्वांना एक सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे. ऑनलाइन अर्ज करणे सहज सोपे आहे वरती सर्व लिंक दिले आहेत. आवश्यक कागदपत्र तयार ठेवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा योग्य माहिती अयोग्य पद्धतीने वेळेत अर्ज केल्यास या सबसिडीचा फायदा नक्की मिळेल. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी www.digitalcronies.com या संकेतस्थळाला भेट द्या.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – अमृत योजना 2025 टायपिंग आणि शॉर्टहँड(GCC-TBC) प्रमाणपत्र धारकांसाठी आर्थिक मदत योजना (इथे क्लिक करा)

धन्यवाद !


येथून शेअर करा

Leave a Comment