नमस्कार ,आज आपण या लेखामध्ये Ghrushneshwar Mandir Information in Marathi |घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास,कथा,ज्योतिर्लिंगाविषयी संपूर्ण मराठीत माहिती घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगा विषयी मराठीत माहिती पाहणार आहेत. Grishneshwar Jyotirlinga Mahiti Marathi 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाणारे घृष्णेश्वर मंदिर आहे. Grishneshwar Temple संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील दौलताबाद येथे आहे. Aurangabad To Grishneshwar distance हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून पौराणिक कथेत खूप महत्त्व आहे. मंदिरात आपण कोणकोणत्या प्रकारे जाऊ शकतो? Grishneshwar औरंगाबाद घृष्णेश्वर ते अंतर किती आहे? दौलताबाद किल्ल्यापासून मंदिराचे अंतर सुमारे 11 किलोमीटर आहे. शिवपुराण, स्कंद पुराण, रामायण, महाभारत यांसारख्या .ग्रंथांमध्येही या मंदिराचा उल्लेख आढळतो.
वेरूळ मध्ये येलगंगा नदी जवळ हे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा शहाजीराजे भोसले यांचे वडील मोलाजीराजे भोसले यांनी 16 व्या शतकात या मंदिराचा जिनाउद्धार केला होता. इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाई यांनी हे मंदिर बांधलेले असून त्यानंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा परत एकदा बांधकाम केले. या मंदिराचे बांधकाम लाल दगडाने करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. या मंदिराला 27 सप्टेंबर इसवी सन 1960 मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Ghrushneshwar Mandir Information in Marathi घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास
Ghrushneshwar Mandir Information in Marathi | घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास,कथा,ज्योतिर्लिंगाविषयी संपूर्ण मराठीत माहिती हे मंदिर प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्राचीनतेमुळे आणि धार्मिक महत्त्वामुळे, राजे आणि सम्राटांनी त्याचे पावित्र जपून ठेवले आहे. मराठा साम्राज्यातील थोर थोर व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि मल्हारराव होळकर मंदिराची पवित्रता जपून ठेवली.
शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांनीही या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या सभोवतालची वास्तू आणि रचना दर्शवते की ते प्राचीन दक्षिण भारतीय वास्तुकलेच्या आधारावर हे मंदिर बांधले गेले आहे. हे लाल रंगाच्या दगडांनी बनलेले आहे, हे मंदिर खूप सुंदर आणि आकर्षक आहे.

घृष्णेश्वर मंदिराची वास्तुकला
Ghrushneshwar Mandir Information in Marathi | घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास,कथा,ज्योतिर्लिंगाविषयी संपूर्ण मराठीत माहिती मंदिराची वास्तू दक्षिण भारतीय शैलीची आहे. मुख्य गाभारा आणि मंडप लाल दगडांनी बनवलेले आहेत. मंदिराच्या शिखरावर अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे. गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली असून त्यासमोर नंदीची विशाल मूर्ती आहे. हे मंदिर सुमारे 4600 स्क्वेअर फूट परिसरात पसरले आहे. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरेही आहेत. मुख्य मंदिराभोवती छोटे दिवे आणि तोरण आहेत. मंदिरातील वातावरण शांतता आणि अध्यात्माने भरलेले आहे.
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कथा
सुधर्मा आणि सुधा नावाचे दोन पती-पत्नी होते. विवाहित पती-पत्नी दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते. परंतु त्यांना संतती नसल्यामुळे ते कायम चिंतेत राहत होते. सुधा कधीही आई होऊ शकत नव्हती. म्हणून सुधी हाने तिचा पती सुधर्मा व हिची धाकटी बहीण घुश्मासोबत लग्न केले अगदी थोड्याच दिवसात घुश्माला एक सुंदर मुलगा झाला.सुधावरचे पतीचे प्रेम, घर, आदर, सर्व जात होते. हे तिच्या लक्षात आले व तिच्या मनात इर्षाचे बीज फुटू लागले एक दिवस दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली. तळ्यामध्ये त्याचे शरीर त्या तलावात टाकून दिले.
घुश्मा त्याच तळ्यामध्ये शिवलिंगाचे विसर्जन करत होती. घुश्मा भगवान शिवाची उपासना करत होती. व ती दररोज सकाळी उठून 108 शिवलिंग बनवून शिवलिंगाचे पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे. मुलाची बातमी ऐकून सर्वत्र आक्रोश झाला. पण घुश्मा दररोज प्रेमानेच शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवांची पूजा करत राहिली. जेव्हा घुश्मा तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली. तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला. त्यावेळी घुश्माला भगवान शिव सुद्धा दिसले. भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले. आणि तिला तिची शिक्षा दिली पाहिजे. असे घुश्माला म्हणाले पण घुश्माने तिला क्षमा करावी अशी शिवाकडे विनंती केली. भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी इथे राहण्याची प्रार्थना केली. घुश्माची विनंती मान्य केली. व भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने इथेच राहू लागले. आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.

Ghrushneshwar Mandir Information in Marathi मंदिराच्या जवळ असणारी पर्यटन स्थळे
1अजिंठा
2 लेणी
3 एलोरा
4 गुहा
5 बीबी का मकबरा
6 दौलताबाद किल्ला
7 बौद्ध लेणी
8 सिद्धार्थ गार्डन
9 सलीम अली तलाव
10 बानी बेगम गार्डन
11 जैन लेणी
12 पंचाकी
13 खुलताबाद
14 कैलासा मंदिर
15 जामा मशीद
16 भद्र मारुती मंदिर
17 सोनारी महाल
मंदिरात जाण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान घृष्णेश्वर मंदिराला लोक अवश्य जातात.
मंदिराचे धार्मिक महत्त्व
श्रावण महिना भगवान शंकराची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात हजारो भाविक भगवान शंकराची पूजा करण्यासाठी येतात.
सोमवारी Grishneshwar Jyotirlinga येथे भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विशेष पूजा आणि उत्सवाचे आयोजन केले जाते.
घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाची वेळ पहाटे साडेपाच ते रात्री साडेनऊ अशी आहे. येथे भाविक जलाभिषेक, रुद्राभिषेक असे पूजाविधी करतात. हे ठिकाण सर्व शिवभक्तांसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

मंदिर आणि पर्यटन
Ghrushneshwar Mandir Information in Marathi या मंदिराला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने भरलेला आहे. दौलताबाद किल्ला आणि एलोरा लेणी या मंदिराच्या अगदी जवळ आहेत, ज्यामुळे ते पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे.
मंदिरात कसे जायचे?
घृष्णेश्वर मंदिरात जाण्यासाठी औरंगाबाद शहरातून टॅक्सी किंवा बसची सोय आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि विमानतळ या मंदिरापासून जवळ आहे. मंदिराजवळ राहण्यासाठी हॉटेल आणि धर्मशाळाही आहेत.
आजकाल डिजिटल युगात घूष्मेश्वर मंदिराची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे.
घृष्णेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर सांस्कृतिक वारसाही आहे. त्याची पुरातनता, वास्तुकला आणि अध्यात्मिक महत्त्व त्याला आणखीन सुंदर बनवते. भगवान शंकराच्या या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
हे मंदिर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आहे. धार्मिक श्रद्धेबरोबरच या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्वही आहे. या मंदिराचा उल्लेख शिवपुराण आणि इतर पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. घृष्णेश्वर मंमंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे आणि दिवे आहेत, ज्यामुळे ते आणखी खास बनले आहे. हे मंदिर सुमारे 5000 स्क्वेअर फूट परिसरात पसरले आहे.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व,कसे जायचे? टायमिंग,इतर प्रेक्षणीय स्थळे व संपूर्ण माहिती मराठीत
धार्मिक परंपरा आणि उत्सव
महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात मंदिरात पूजेचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीच्या रात्री येथे भव्य पूजा आणि रुद्राभिषेक होतो. यावेळी हजारो भाविक भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी येतात. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवले जाते तसेच तेलाचे दिवे लावले जातात. महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले जाते. लघु रुद्र रुद्राभिषेक या ठिकाणी केला जातो.
रुद्र अभिषेक करण्यासाठी आपण आपल्या घरून महादेवाची पिंड घेऊन जाऊन मंदिरात बसून रुद्राभिषेक करू शकता. रुद्राभिषेकासाठी लागणारे साहित्य
महादेवाची पिंड, गळती किंवा ताम्हण पळी, बेलपत्र, अखंड अक्षता ,हळदी कुंकू, भस्म, खडीसाखर, अगरबत्ती तेलाचा किंवा तुपाचा दिवा बसण्यासाठी आसन हे सर्व साहित्य घेऊन आपण मंदिरात जाऊन रुद्र अभिषेक करू शकतो. किंवा लघु रुद्र करायचा असल्यास आपण ब्राह्मणाकडून लघु रुद्र अभिषेक करू शकतो.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पूजा केली जाते. मंदिरात भाविक जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करतात. या दरम्यान भगवान शिवाच्या मंत्रांचा जप केला जातो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो. ओम त्र्यंबक याच्यामही सुगंधी पुष्ठवर्धनम्रकमेव उरूरकमव बंधनानं मृत्यूमोक्षि यमामृतात या मंत्राचा केला जातो. महामृत्युंजय मंत्राचा जप केला असता एखादा आजारी पेशंट बरा होतो. किंवा एखाद्या रस्त्यावरील एकाच ठिकाणी वारंवार जर अपघात होत असेल तर त्या ठिकाणी महामृत्युंजय मंत्राचा जप केला असता . पुढे येणारी संकटे टळतात.
विमानाने: औरंगाबाद विमानतळावरून कॅबने मंदिरात जाता येते.
रस्त्याने: महाराष्ट्रातील इतर शहरांमधूनही बस आणि टॅक्सी सुविधा उपलब्ध आहेत.
घृष्णेश्वर मंदिरा विषयी विकिपीडिया वरील माहिती – इथे वाचा
मंदिरात सुविधा
मंदिर परिसरात दर्शनासाठी चोख व्यवस्था आहे. येथे भाविकांसाठी प्रसाद व पाण्याची व्यवस्था आहे. धर्मशाळा आणि राहण्यासाठी हॉटेल्सही जवळपास उपलब्ध आहेत.
घृष्णेश्वर मंमंदिर हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून त्याचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. हे ठिकाण भाविकांना शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते.
अशाच विविध धार्मिक विषयावरील लेख वाचण्यासाठी या संकेत स्थळाला नेहमी भेट द्या.
धन्यवाद !
1 thought on “Ghrushneshwar Mandir Information in Marathi |घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास,कथा,ज्योतिर्लिंगाविषयी संपूर्ण मराठीत माहिती”