नमस्कार , आज आपण या लेखांमध्ये कालभैरव जयंती ? Kaal Bhairav jayanti याविषयी संपूर्ण माहिती मराठीत पाहणार आहोत . Kaal Bhairav jayanti 2024 ? ची कालभैरव जयंती कधी आहे? कालभैरवाष्टकाचे Kaal Bhairavastak ? पठण केले असता आपल्याला कोणते अनुभव येतात. 2024 ची कालभैरव जयंती किती तारखेला आहे ?Kaal Bhairav jayanti 2024 Date? व कालभैरवाची आरती ? Kaal Bhairav Aarti? याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा, केली जाते. व्रत विषयी माहिती सांगितली जाते. व कथा सांगितली जाते. जाणून घेऊया संपूर्ण माहिती या लेखात .
कालभैरव जयंतीचे महत्त्व
भगवान कालभैरव हे भगवान शिवाचा एक उग्र आणि शक्तिशाली अवतार मानला जातो. यांना काशीचे रक्षक मानले जाते आणि त्यांच्या उपासनेने जीवनातील सर्व प्रकारचे भय, शत्रुत्व, आणि अडचणी दूर होतात. स्कंद पुराणानुसार, भगवान कालभैरवाची उत्पत्ती सृष्टीच्या रक्षणासाठी झाली. या दिवसाचा संबंध धर्म, सत्य, आणि न्याय यांच्याशी आहे.
कालभैरव जयंती ही कालाष्टमीच्या दिवशी येते, जी कार्तिक महिन्यातील कृष्ण अष्टमीला साजरी केली जाते. या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा केल्याने भक्तांना त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. व या दिवशी कालभैरवाष्टकाचे 11 वेळा पठण केले असता आपल्या जीवनातील शत्रूंचा नाश होतो.या वर्षी काळभैरव जयंती 23 नोव्हेंबरला आहे.
कालभैरव जयंतीची कथा
स्कंद पुराणानुसार, मेरु पर्वतावर एकदा ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि महादेव यांच्यात सृष्टीच्या श्रेष्ठतेवर चर्चा चालू होती. ब्रह्मदेवांनी स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी कठोर शब्द वापरले आणि शिवशक्तीला कमी लेखले.
ब्रह्मदेवाचे हे वर्तन पाहून महादेवाने आपल्या तीसऱ्या डोळ्यातून एक तेजस्वी दिव्य रूप प्रकट केले, ज्याला कालभैरव म्हटले जाते. कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाचव्या मस्तकाला छेदन केले. त्यामुळे ब्रह्मदेवांचा अहंकार नष्ट झाला, आणि त्यांनी महादेवाला वंदन केले.
भगवान कालभैरवाचे स्वरूप
कालभैरव हे उग्र स्वरूप असून ते काळावर नियंत्रण ठेवणारे आहेत. त्यांना सर्वश्रेष्ठ रक्षक देवता मानले जाते. त्यांचे स्वरूप काळ्या रंगाचे असून त्यांना हातात त्रिशूल, डमरू आणि पाश आहे. त्यांच्या सोबत श्वान असतो, जो त्यांच्या रक्षणाचा प्रतीक आहे.
अथर्ववेदातील कालभैरव
भगवान शिवाच्या कालभैरव स्वरूपाचे वर्णन अथर्ववेदात केले आहे. या वेदात भैरवाचे नाव घेणे, मंत्रजप, आणि उपासना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.
कालभैरव जयंतीची पूजा पद्धती
स्नान व शुद्धीकरण: या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वतःला शुद्ध करावे.
पूजा स्थळ सजवणे: घरातील देवघर किंवा मंदिर स्वच्छ करून सजवावे.
कालभैरवाचे चित्र किंवा मूर्ती: भगवान कालभैरवाचे चित्र किंवा मूर्ती स्वच्छ करून त्यांना तुळस, बेलपत्र, आणि फुलांनी सजवावे.
पूजा विधी
घंटानाद आणि मंत्रजप: पूजेसाठी मंत्रजप करा. मुख्यतः “ॐ कालभैरवाय नमः” या मंत्राचा जप 108 वेळा करावा.
नैवेद्य अर्पण: भगवान कालभैरवांना नैवेद्य म्हणून तिळाचे लाडू, गूळ, दूध, आणि फळे अर्पण करावीत. कालभैरवाला त्याच्या लाडूचा प्रसाद खूप प्रिय आहे. इच्छा असेल तर आपण कालभैरवाला तिळाचे लाडू ,गुळ, व दूध ,एखाद्या मंदिरात नेहून दान केले असता. कालभैरव आपल्याला लवकर प्रसन्न होतात व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
श्वान पूजन: कालभैरवांचा वाहन असलेल्या श्वानाला अन्न द्यावे. हा कार्य अत्यंत महत्त्वाचा आहे.
दीप प्रज्वलन: भगवान कालभैरवासमोर तुपाचा दिवा लावावा.
विशेष मंत्र
कालभैरवाष्टक: “देवराजसेव्यमानपावनांग…” याचा पाठ करा.
महामृत्युंजय मंत्र: जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी जप करा.
ॐ त्र्यँम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्णम् । उ॒र्वारु॒कमि॑व॒ बन्ध॑नान्मृ॒त्योर्मु॑क्षीय॒माऽमृता॑ ।
कालभैरवअष्टकं
देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ १॥
भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ २॥
शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ३॥
भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥ ४॥
धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मधायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ५॥
रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम् ।
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ६॥
अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं दृष्टिपात्तनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ७॥
भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ८॥
॥ फल श्रुति॥
कालभैरवाष्टकं पठंति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिं नरा ध्रुवम् ॥
कालभैरव कथा आणि उपासना महत्त्व
काशीतील महत्त्व
भगवान कालभैरवाला काशी नगरीचा कोतवाल म्हटले जाते. कारण जेव्हा एखादा भक्त काशीमध्ये मरण पावतो, तेव्हा भगवान कालभैरव स्वतः त्याला मुक्ती प्रदान करतात. त्यामुळे काशीमध्ये कालभैरवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.
भय नाशक
भगवान कालभैरवाची पूजा केल्याने भीती, अडचणी, आणि शत्रुत्व दूर होते. त्यांची उपासना केल्याने मानसिक शांती लाभते.
विविध सेवा आणि व्रते – Kaal Bhairav Jayanti 2024
दानाचे महत्त्व
या दिवशी जे काही अत्यंत गरजू लोक आहेत अशा लोकांना दान केल्या असता कालभैरव देव आपल्याला लवकर प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, आणि धनदान करावे.
उपवास
कालभैरव जयंतीला उपवास केल्याने भक्तांचे पाप क्षय होतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फराळ न करता फळ हार करून उपवास सोडावा.
कालभैरव गाथा व आरती
“शिव पुराण” किंवा “कालभैरव कथा” वाचावी किंवा ऐकावी.
कालभैरवाची आरती
जय देव जय देव जय भैरवनाथा । सुंदर पदयुग तूझें वंदिन निजमाथां ॥ध्रु॥
भैरवनाथा गौरव दे मज भजनाचें । रौरव संकट नाशी जनना- निधनाचें ॥ निशिदिनिं देवा दे मज गुणकीर्तन वाचे । कैरवपदनखचंद्रीं करिं मन मम साचें ॥जय०॥१॥
भवभयभंजन सज्ज्नरंजन गुरुदेवा । पदरजअंजन लेतां प्रगटे निज ठेवा ॥ जेव्हां दर्शन देसी भाग्योदय तेव्हां । अनंत पुण्यें लाधे आम्हां तव सेवा ॥ जय० ॥२॥
कलिमलशमना दानवदमना दे पाणी । डमरूरव अमरांते निर्भय सुखदानी । काशीरक्षक तक्षकमालाधर चरणीं । तोडर मिरवी अरिंगन मस्तकिं मनकर्णी ॥जय० ॥३॥
लक्षीं करुणाचक्षी अनुचर निजपक्षी । भक्षीं दुष्टां सुष्टां संरक्षीं ॥ साक्षी कर्माकर्मी ज्गदंतरकुक्षीं । मुमुक्षुपक्षी वसती तव पदसुरवृक्षीं ॥ जय० ॥४॥
सोनारीं पुरधामीं भैरव कुळस्वामी । स्मरतां सत्वर पावसि संकटहरनामीं ॥ इच्छित देसी दासां जो जो जें कामी । मुक्तेश्वरीम हेतू निश्चय कुळधर्मी ॥ जय० ॥५॥
आधुनिक काळात कालभैरव जयंतीचे महत्त्व
आजही भक्त भगवान कालभैरवाच्या कर्तृत्वावर श्रद्धा ठेवून त्यांच्या उपासना करतात. आधुनिक युगातही कालभैरवाची उपासना केल्याने संकटांवर मात केली जाते.
कालभैरव जयंती:Kaal Bhairav Jayanti 2024
कालभैरव जयंती हा दिवस भक्तांसाठी श्रद्धा आणि भक्तीने भरलेला असतो. या दिवशी केलेल्या सेवांचा परिणाम भक्तांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे या पवित्र दिवशी भगवान कालभैरवाची पूजा, व्रत, आणि दान करून कालभैरव जयंती साजरी केली जाते प्रत्येक ठिकाणी कालभैरव जयंती साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
भगवान कालभैरवांची उपासना केल्याने भयमुक्त, शांत, आणि संतुलित जीवनाची अनुभूती मिळते. त्यामुळे या दिवशी शक्य तितकी सेवा आणि उपासना करून भगवान कालभैरवांचा आशीर्वाद मिळवा. कालभैरव जयंती दिवशी11 वेळा कालभैरवाष्टकाचे पठण केले असता आपल्या जीवनातील शत्रूंचा नाश होतो.
सरकारी योजनाच्या माहिती करा खाली वाचा
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना बद्दल ( इथे वाचा )
माझा लाडका भाऊ योजना बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा )
माझी लाडकी बहिण योजना बद्दल माहिती साठी (इथे क्लिक करून वाचा )
विश्वकर्मा योजना छोट्या व्यावसायिकांसाठी कर्ज योजना (इथे वाचा )
PM Internship Yojana २०२४ (इथे क्लिक करून वाचा )
अशाच विविध माहिती करिता आपण या ठिकाणी नक्की भेट या आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा .धन्यवाद .
1 thought on “Kaal Bhairav Jayanti 2024 |काळभैरव जयंती 2024 : जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी , महत्व ,पौराणिक कथा ,काळभैरव अष्टकं”