नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता कधी अचानक पाऊस होतो तर कधी कधी पावसाचा अगदी दुष्काळ होऊन जातो आणि या सर्व संकटांना सामोरे जात शेतकरी आपलं काम तितक्याच मेहनतीने करत असतो. त्यातच दरवर्षी शेतकऱ्यासाठी कांदा उत्पादन हे कधीकधी नगदी पीक सोनेरी पीक ठरते पण कधी कधी हाच कांदा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतो. कांद्याला कधी भाव चांगला मिळत नाही कांद्याची साठवण करणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे हवामानाचे बदल आहेत येणाऱ्या अनेक अडचणी आहेत या अडचणींवर उपाय म्हणून maha dbt farmer scheme अंतर्गत राज्य शासनाने” कांदा चाळ योजना” “Kanda Chal Anudan Yoajana 2025” सुरू केली आहे.
शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळत नसेल तर Onion storage shed हा कांदा साठवणूक करण्यासाठी म्हणून एक चांगला उपाय आहे अशी चाळ बांधण्यासाठी सरकारकडून “कांदा चाळ अनुदान” दिल जात आहे. यामुळे तुम्हाला कांदा साठवण्यासाठी तुमचे स्वतःचे कांदा चाळ बांधता कांदा चाळ कशी बांधायची त्याची काय अर्जाची प्रक्रिया आहे कुठे ऑनलाईन अर्ज करायचा इत्यादी संपूर्ण माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Kanda Chal Anudan Yoajana 2025 ची वैशिष्ट्ये
- शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेपर्यंत तुम्ही कांदा साठवून ठेवू शकता.
- यामुळे कांद्याचं वेस्टेज किंवा नासाडी कमी होईल. यामध्ये कांद्याला चारी बाजूंनी चांगले हवा लागल्याने कांदा खराब होणार नाही.
- कांद्याची साठवणूक वैज्ञानिक पद्धतीने नेमकी कशी करायची याबद्दल देखील माहिती मिळेल. व ती अमलात आणता येईल.
- कांद्याच्या चाळीमध्ये कांदा साठवल्यामुळे ही एक प्रकारे नैसर्गिक पद्धतीने केली गेलेली साठवणूकच आहे यामुळे कांदा जो साध्या पद्धतीने ढीग करून साठवल्याने किंवा पसरून साठवल्याने जितका खराब व्हायचा वाया जायचा तो या पद्धतीने चांगला जास्त काळासाठी टिकेल.
- शेतकऱ्याला नक्कीच या अनुदानामुळे फायदा होईल. कांद्याला बाजार भाव आल्यावर शेतकऱ्याला हक्कांना आता येईल.
- सरकारकडून अनुदान मिळत असल्यामुळे चाळ बांधणे सोपे होईल.

Kanda Chal Anudan Yoajana 2025साठी कोण पात्र आहे ?
- अर्जदार हा नक्कीच महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- त्यांच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवर करता येते. जर तुम्हाला येत नसेल तर खाली कमेंट मध्ये विचारा मी याबद्दल पुढे लेख लिहून देईल.
- ज्या शेतकऱ्याकडे स्वतःचा पाच ते पंचवीस टन इतका कांदा उत्पादन होत असेल तर असेच शेतकरी फक्त या अनुदान योजनेसाठी पात्र आहेत.
- जर 25 टन ते 1000 टन कांदा एखाद्या शेतकरी गटाचा मिळून होत असेल तर ते देखील शेतकरी पात्र आहेत.
- शेतकऱ्याच्या नावावर त्यांची जमीन असणं व पिकाचा तपशील महाडीबीटी पोर्टलवर नमूद केलेलं असणे गरजेचे आहे.
Kanda Chal Anudan Yoajana 2025 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड लागणारे
- शेतकरी आयडी कार्ड म्हणजेच फार्मर आयडी जे महाडीबीटी पोर्टलवर मिळेल.
- सातबारा उतारा किंवा जमिनीचे नोंदणी पत्र लागेल.
- पासपोर्ट साईजचा फोटो
- पिकाची पूर्ण माहिती असणारा तपशील
- आपल्या बँक त्याचे डिटेल्स
- जर गरज असेल तर प्रकल्पाचा अहवाल किंवा अंदाजपत्रक लागेल.
Kanda Chal Anudan Yoajana 2025 साठी मिळणारे अनुदान पाहूया.
महाराष्ट्र शासनाकडून चाळ बांधणी करता कांदा किती उत्पादन होणार आहे किती टन उत्पादन आहे त्यानुसार अनुदान मिळणार आहे. किती टन कांदा उत्पादन आहे त्या प्रमाणे किती अनुदान मिळेल हे खाली नमूद केले आहे.
1) 5 टन ते 25 टन असेल तर दहा हजार रुपये प्रति टन मिळतील.
2) 25 टन ते 500 टन असेल तर आठ हजार रुपये प्रति टन इतके अनुदान मिळेल.
3) 500 टन ते 1000 टन साठी सहा हजार रुपये प्रति टन इतके अनुदान मिळेल.
4) लहान कांदा चाळीची जर शेतकऱ्याला आवश्यकता असेल तर शेतकरी तसा वैयक्तिक अर्ज देखील करू शकतात.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?
- 1.कांदा चाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना सुरुवातीला महाडीबीटी पोर्टल वर जावं लागेल. याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या सर्व योजनांचे अर्ज केले जातात. Farmer scheme या ऑप्शन मध्ये तुम्हाला Integrated Horticulture अंतर्गत कांदा चाळ योजना मिळेल. (Onion storage subsidy Scheme) असे लिहिलेले असेल.
- त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा फार्मर आयडी(Farmer ID)टाकून तुम्हाला एक ओटीपी (OTP) येईल त्यावरून तुम्हाला लॉगिन (Login) करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर आपली स्वतःची माहिती जमीन पिकाचा तपशील तुम्हाला आपोआप तिथे दिसेल.
- तुमची प्रोफाइल पूर्णपणे भरलेली आहे का हे एक वेळा तपासून घ्या.
- आता तुमचा कांद्याचे क्षमता किती आहे पाच टन 10 टन 15 टन किंवा त्यापेक्षा अधिक 25 टन जितकी क्षमता असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी निवडायची आहे.
- शेतकऱ्यांचा जर गट असेल तर अशा मोठ्या क्षमतेच्या कांदा चाळीसाठी वेगळे पर्याय 25 ते 1000 टन मध्ये उपलब्ध आहेत.
- आपला कांदा किती टन आहे हे पाहून व्यवस्थित अर्ज भरा व अर्ज सेव करा.
- तुम्हाला दुसरी कोणती योजना बघायची असेल निवडायचे असेल तर Yes वर क्लिक करा नसेल तर No वर क्लिक करा.
- Submit Application वर क्लिक करा. अर्ज आपण नीट भरला आहे का पाहून मगच अर्ज सबमिट करा.
- पहिल्यांदाच अर्ज करत असल्यास 2360 रुपये इतके फी भरावी लागेल अगोदर पेमेंट केलं असेल तर फॉर्म निशुल्क भरला जाईल.
- पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर Eligible किंवा Pending असं दाखवेल.
- ही योजना प्राथमिक तत्वावर आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
योजनेसाठी अटी
- अर्ज करताना आपण जे कागदपत्र देत आहोत ती खरी असावी याची काळजी घ्या.
- तिची माहिती देत असाल तर अर्ज रद्द होईल.
- मोठ्या चाळीसाठी शेतकरी गटांना अगोदर प्राधान्य दिले जाईल.
- जसा वरती सांगितलं आहे प्राथमिक तत्वावर जो पहिला येईल त्याचा अर्ज भरला जाईल यानुसार ही योजना काम करणार आहे त्यामुळे तालुका level प्रमाणे ठराविक कुठे असेल व त्याप्रमाणे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.

शासन निर्णय
मे 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक जीआर काढला होता ज्यामध्ये कांदा चाळीसाठी अनुदान जाहीर केले होते. यामध्ये वैयक्तिक व गट पद्धतीने सामूहिक शेतकऱ्यांना 1,60,367 रु. इतके अनुदान उपलब्ध करून दिले आता ऑगस्ट 2025 मध्ये राज्य शासनाने 28.32 कोटी निधी याकरिता मंजूर केला आहे यामध्ये 1461 शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल अशी आशा आहे.
या या अनुदान योजने करिता फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या सरकारी संकेतस्थळाची लिंक इथे दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता. (इथे क्लिक करा.)
मित्रांनो कांदा चाळ अनुदान योजनेबद्दल माझ्या परीने मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न वरील लेखात केला आहे याशिवाय अजून कोणते प्रश्न तुम्हाला पडत असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा. ही योजना शेतकऱ्यांसाठी नक्कीच अत्यंत उपयुक्त योजना ठरेल मात्र अर्ज ऑनलाईन पद्धतीने वेळेत, अचूक, आणि खऱ्या कागदपत्रांसह भरावा.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल – Gharkul Yojana Maharashtra|घरकुल योजना 2025 अर्ज प्रक्रिया,अनुदान,निवड,ऑनलाइन अर्ज कसा करावा?आणि संपूर्ण माहिती
अशाच नवनवीन योजनांकरिता www.digitalcronies.com संकेतस्थळाला भेट द्या.
धन्यवाद !
Thanks for information
लेख वाचल्याबद्दल धन्यावद !