Pm Internship Yojana 2024: 5000rs कसे मिळणार? Last Date , Eligibility, Application Process &  Date Timeline

पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही भारतीय सरकारद्वारे सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. भारतातील तरुणांना मौल्यवान इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेचा एक मुख्य हेतू म्हणजे शैक्षणिक शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्यातील अंतर कमी करणे, ज्यासाठी मोठ्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्यात येते. यामुळे केवळ इंटर्नला  त्यांच्या क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव मिळत नाही तर त्यांना सार्वजनिक क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्ये देखील मिळेल.


Pm Internship Yojana 2024

Table of Contents

योजने बद्दल संपूर्ण माहिती

देशभारत
योजनापंतप्रधान इंटर्नशिप योजना 2024
संघटनाकॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय, भारत सरकार
उद्देशटॉप कंपनीत नोकरीची संधी शोधणाऱ्यांना वास्तविक अनुभव 
पदांची संख्या1,25,000 पदांवर 500 शीर्ष कंपन्या
Pm Internship Yojana 2024
देशभारत
योजनापंतप्रधान इंटर्नशिप योजना 2024
संघटनाकॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय, भारत सरकार
उद्देशटॉप कंपनीत नोकरीची संधी शोधणाऱ्यांना वास्तविक अनुभव 
पदांची संख्या1,25,000 पदांवर 500 शीर्ष कंपन्या
पात्रता 1)आयटीआय2) पदवी: यूजीसी / एआयसीटीई-मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतलेली असावी 3)डिप्लोमा: हा इंटरमीडिएट + AICTE-मान्यताप्राप्त डिप्लोमा असला पाहिजे 4) वय: हे 18 ते 24 वर्षे मध्ये असावे . 
योजनेचे फायदे1) ₹5,000 महिन्याला वेतन2) ₹6,000 रूपये  एक वेळेस मिळणार 3) कामाचा अनुभव मिळणार  (experience )
योजनेची नोंदणी तारीख12 ऑक्टोबर 2024, पुढे
योजनेची  नोंदणीसाठी शेवटची तारीख25 ऑक्टोबर 2024 ( तारीख संपलेली आहे )
योजनेची  अधिकृत वेबसाइटhttps://pminternship.mca.gov.in/
योजने सोबत मिळणार विमा कव्हरेजप्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजाना व  ज्योती बिमा योजना
अर्ज फीसर्व उमेदवार: 0 /-(कोणतीही अर्ज फी नाही .)
आमच्याशी संपर्क साधाईमेल: pminternship [at] mca.gov.inकॉल करा: 1800 11 6090
भागीदार कंपन्यामोठ्या 500 कंपन्या
Pm Internship Yojana 2024

योजनेचा नोंदणी करण्याचा कालावधी : 

पीएम इंटर्नशिप योजनेचा कालावधी हा 12 ऑक्टोबर 2024 ते 25 ऑक्टोबर 2024 ( तारीख संपलेली आहे ) होता आता 25 तारखे नंतर फॉर्म भरता येणार नाही . तसेच याबाबत कोणती सूचना मिळालेली नाही .


Pm Internship Yojana 2024

या योजनेचा लाभ घेण्याऱ्या लाभार्थींसाठी नियम व अटी ?

1.भारतीय नागरिक : अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

२.  वय : अर्जदाराचे वय २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे.

३. ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा दूरस्थ शिक्षण : अर्जदार पूर्ण वेळ नोकरी (Full time job)  किंवा पूर्णवेळ शिक्षण घेत नसावा. ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा दूरस्थ (Distance learning ) शिक्षण घेणाऱ्या युवकांनी अर्ज करू शकतो.

४. शिक्षण : अर्जदाराने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि आयटीआय प्रमाणपत्र, पॉलिटेक्निकमधील डिप्लोमा किंवा बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए यापैकी कोणत्याही क्षेत्रात पदवी असावी.

येत्या पाच वर्षांत पीएम इंटर्नशिप योजनेतर्गत युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. 


एका प्रशिक्षणार्थीसाठी किती रुपये दिले जाणार आहेत ?

  • सरकारकडून = ४,५०० रुपये आणि 
  • कंपनीकडून = ५०० रुपये दिले जाणार आहेत.

PM Internship Scheme Ineligibility Criteria (अपात्रता निकष):

  1. Educational Institutions: IIT, IIM, IISER, NID, IIIT, and National Law Universities मध्ये शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी योजनेसाठी अपात्र आहेत.
  2. Professional Qualifications: CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA, किंवा कोणत्याही मास्टर्स पदवी अथवा त्यापेक्षा उच्च पदवी प्राप्त युवा अपात्र असतील.
  3. Participation in Other Programs: केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कौशल्य विकास, अप्रेंटिसशिप, इंटर्नशिप, किंवा विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमांत भाग घेतलेले व्यक्ती अपात्र असतील.
  4. National Schemes: NATS (National Apprenticeship Training Scheme) किंवा NAPS (National Apprenticeship Promotion Scheme) चा लाभ घेतलेले विद्यार्थी योजनेसाठी पात्र नाहीत.
  5. Income Limit: २०२३-२४ आर्थिक वर्षात ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे, ते अपात्र ठरतील.
  6. Government Employment: सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील सदस्य अपात्र असतील. (तथापि, करार पद्धतीने नोकरी असणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना यामध्ये अपवाद असेल.)

पंतप्रधान इंटर्नशिप योजना नोंदणीसाठी शुल्क (fees ) किती आहे ?

पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PM Internship Yojana) मिळवण्या साथी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाहीये

सर्व कास्ट साथी ही योजना निशुल्क आहे . 

याचा फॉर्म वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून कोणतेही शुल्क  न भरता भरू शकता .


योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ?

  • आधार कार्ड (Adhar card )
  • पॅन कार्ड (Pan card )
  • ईमेल आयडी (E-mail id )
  • मोबाईल नंबर (Mobile Number )
  • व सिलेक्ट झाल्या नंतर
  • बोनाफाइड / आईडी कार्ड 
  • शाळा / कॉलेज रिजल्ट.   

Pm Internship Yojana 2024

योजनेचा अर्ज कुठे करावा ?

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने साठी अर्ज हा खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन करावा

अधिकृत संकेतस्थळ होम पेज लिंक (क्लिक करा ) 
लाभार्थी रजिस्टर पेजलिंक (क्लिक करा )
लाभार्थी लॉगिन पेजलिंक (क्लिक करा )
PM Internship Scheme 2024

PM Internship Scheme 2024 अर्ज करण्याची पद्धती (Application Process):

  1. अधिकृत संकेतस्थळ: योजनेचे अधिकृत संकेतस्थळ येथे पहा.
  2. नोंदणीची प्रक्रिया:
    • संकेतस्थळावर १२ ऑक्टोबर, २०२४ पासून अर्ज करता येईल.
    • अधिकृत संकेतस्थळावर जा.
    • Youth Registration या पर्यायावर क्लिक करा.
    • मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला) प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
    • OTP प्रविष्ट करून Submit करा.
    • नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी पासवर्ड अपडेट स्क्रीन उघडेल. तात्पुरत्या पासवर्डचा वापर करून नवीन पासवर्ड तयार करा.
  3. अर्ज भरणे:
    • सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार अर्ज पूर्ण करा.
    • पात्रतेनुसार, युवकांना मोबाईल किंवा ईमेलद्वारे उपलब्ध संधींची माहिती मिळेल.
    • उपलब्ध संधींचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना निवडीचा पर्याय उपलब्ध होईल.

(Pm Internship )योजेनेसाठी 25 ऑक्टोबर नंतर अर्ज करू शकतो का?

नाही ,पायलट प्रोग्राममध्ये सहभाग घेण्यासाठी, 25 ऑक्टोबरपूर्वी अर्ज करण्याचे सुनिश्चित करा, कारण उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. शॉर्टलिस्ट झाल्यानंतर, उमेदवारांना तीन इंटर्नशिप ऑफर स्वीकारण्याची संधी मिळेल. इंटर्नशिप 2 डिसेंबरपासून अधिकृतपणे सुरू होईल आणि या एक वर्षाच्या कालावधीत मौल्यवान कामाचा अनुभव मिळेल. या प्रतिष्ठित कार्यक्रमात आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा.


अर्जाची निवड झाल्या नंतर काय करावे?

Process after selection of application for Internship 

27 ऑक्टोबर – 7 नोव्हेंबर 2024 मध्ये कंपन्या अर्ज तपासून इंटर्न ची निवड होईल व 8-15 नोव्हेंबर 2024 या कालावधी मध्ये निवडलेल्या उमेदवारांना ऑफर लेट्टर (offer letters ) मिळतील; उमेदवार ऑफर स्वीकारू किंवा नाकारू शकतात याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे .


पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2024:तारखा आणि अशी होईल निवड प्रक्रिया पहा टाइमलाइन

  1. 12-25 ऑक्टोबर 2024: पात्र उमेदवारांसाठी नोंदणी सुरू. अर्जदार अधिकृत पोर्टलवर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात.
  2. 26 ऑक्टोबर 2024: अर्जांची यादी ही सरकार तर्फे  कंपन्यांना पाठवली जाईल .
  3. 27 ऑक्टोबर – 7 नोव्हेंबर 2024: कंपन्या अर्ज तपासून इंटर्न ची निवड होईल .
  4. 8-15 नोव्हेंबर 2024: निवडलेल्या उमेदवारांना ऑफर लेट्टर (offer letters ) मिळतील; उमेदवार ऑफर स्वीकारू किंवा नाकारू शकतात याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे .
  5. 2 डिसेंबर 2024: इंटर्नशिप सुरू. प्रत्येक इंटर्नला 6,000 रुपये मिळतील.

सूचना: वेळेत अर्ज सादर करून योजनेत सहभागी होण्याची खात्री करा.


Pm Internship Yojana 2024

PM Internship Scheme 2024 वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेचा उद्देश तरुणांना कौशल्यांसह प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे आहे.

  • पात्रतेसाठी अर्जदाराचे वय किती असावे?

अर्जदाराचे वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

  • या योजनेसाठी कोणते शिक्षण आवश्यक आहे?

अर्जदाराकडे आयटीआय प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी (BA, BSc, BCom, BCA, BBA) असणे आवश्यक आहे.

  • या योजनेत अर्जदारांना किती वेतन दिले जाते?

 अर्जदारांना दरमहिना ₹5,000 वेतन आणि एक वेळ ₹6,000 दिले जाते.

  • अर्जासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?

आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, आणि मोबाइल नंबर.

  • योजनेसाठी नोंदणी शुल्क किती आहे?

 योजनेसाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही; अर्ज मोफत आहे.

  • योजनेसाठी 25 ऑक्टोबरनंतर अर्ज करू शकतो का?

नाही, 25 ऑक्टोबरनंतर उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

  • अर्जाची निवड झाल्या नंतर काय करावे?

निवडलेल्या उमेदवारांना ऑफर लेट्टर (offer letters ) मिळतील; उमेदवार ऑफर स्वीकारू किंवा नाकारू शकतात याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे .


सरकारी योजनाच्या माहिती करा खाली वाचा

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना बद्दल ( इथे वाचा )

माझा लाडका भाऊ योजना बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा )

माझी लाडकी बहिण योजना बद्दल माहिती साठी (इथे क्लिक करून वाचा )

विश्वकर्मा योजना छोट्या व्यावसायिकांसाठी कर्ज योजना (इथे वाचा )


अशाच विविध माहिती करिता आपण या ठिकाणी नक्की भेट या आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा .धन्यवाद .



येथून शेअर करा

Leave a Comment