यंदा दिवाळी नेमकी कधी ? 31 ऑक्टोबर /1 नोव्हेंबर|लक्ष्मीपूजन विधी|दिवाळी पौराणिक कथा:Diwali 2024

नमस्कार,Diwali 2024
हिंदू धर्मातील सर्वात मोठा, महत्त्वाचा, आनंदाने साजरा केला जाणारा,लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती जो सण खूप उत्साहाने साजरा करतो तो म्हणजे दिवाळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी या सणाचे सांस्कृतिक तसेच धार्मिक महत्त्व आहे. यंदा 2024 ची दिवाळी नेमकी कधी आहे शुभ मुहूर्त कोणते आहेत,दिवाळी 31 ऑक्टोबरला आहे की एक नोव्हेंबरला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी आम्ही अभ्यासपूर्ण माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न म्हणून हा लेख लिहिण्याचा अट्टाहास केला आहे. ही संपूर्ण माहिती वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र करून आपल्या सुविधेसाठी लिहिण्यात आली आहे. चला तर मग यंदाची दिवाळी 2024 कशी साजरी करावी लक्ष्मीपूजन विधी, दिवाळीचे महत्त्व,संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

28 ऑक्टोबर पासून यावर्षी दिवाळी सण सुरू होत आहे या दिवशी रमा एकादशी असून याच दिवशी गोवत्सद्वादशी म्हणजेच वसुबारस आहे. वसुबारस म्हणजे दिवाळी सणाची सुरुवात म्हणून यंदाची दिवाळी 2024 ही 28 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. त्यामुळे यंदाचा दीपोत्सव सहा दिवसांचा म्हणजेच 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाईल.

दिवाळी सणाचे महत्त्व

दिवाळी हा सण एकूण पाच दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवसाला त्याचे स्वतःचे एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक असे महत्त्व आहे . हे पाच दिवस आपण अगदी उत्साहात विविध पूजा विधी करून खास पारंपारिक धार्मिक पद्धतीने साजरे करतो. या प्रत्येक दिवसाच सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. दिवाळीचे हे पाच दिवस अगदी आनंदाने उत्साहाने भरलेले असतात दिवाळी सण म्हणजे कुटुंब एकत्र येण्याचे प्रतीकच जणू. प्रत्येक दिवसाचा वेगळा अर्थ व प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व यामुळे दिवाळी सण सगळ्यात मोठा आणि आनंदाचा उत्साहाचा आणि खास मानला जातो. अंधाराकडून प्रकाश कडे घेऊन जाणारा रोषणाईचा एक सण उत्सव म्हणजे दिवाळी.


Diwali 2024

पौराणिक कथा

Diwali 2024 दिवाळी या सणामागे धार्मिक तसेच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणे देखील आहेत. ज्यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त होते .जाणून घेऊया अशाच काही दिवाळी साजरी करण्यामागील पौराणिक कथा.

रक्तबीज राक्षसाची कथा-


दिवाळी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा अशी आहे की,रक्तबीज नावाचा एक महाभयंकर राक्षस होता. ज्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून एक असे वरदान प्राप्त केले होते की त्याच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवा राक्षस निर्माण होईल.त्यामुळे त्याच्या वरदानामुळे तो रक्तबीज राक्षस देव आणि ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. त्याला कोणीही मारू शकत नव्हते. त्याचा पराभव करण्यासाठी देवी पार्वतीने महाकालीचे रूप धारण करून रक्त बिजाचा वध केला. त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडू नये म्हणून देवीने ते रक्त खापरात गोळा केले आणि उरलेले राक्षस गिळून टाकले. जेव्हा रक्तबीजाचा वध केला तेव्हा देवीचा राग शांत करण्यासाठी स्वतः शंभू महादेवाने पृथ्वीवर झोप घेतली आणि देवीचा पाय महादेवांना लागल्यावर देवी शांत झाली. असे मानले जाते की ही घटना नरक चतुर्दशीच्या दिवशी घडली आणि म्हणून त्या दिवसापासून दिवाळी साजरी केली जाते.


श्रीरामांच्या अयोध्येत परतण्याची कथा -Diwali 2024


एक दंत कथा अशी ही प्रचलित आहे ती म्हणजे रामायणातील. प्रभू श्री रामचंद्र जेव्हा 14 वर्षाचा वनवास करून आणि लंकापती रावणाचा वध करून सीतामातासह अयोध्येत परतले तो दिवस आनंदाचा उत्साहाचा दिव्यांनी रोषणाई करून साजरा केला गेला. म्हणून तो दिवस दिवाळीचा होता अशीही एक कथा आहे. अयोध्येतील सर्व लोकांनी प्रभू श्रीराम व माता सीता परत आल्याच्या आनंदात पूर्ण शहरभर दिवे लावले फुलांचा वर्षाव केला आणि उत्सव साजरा केला.तेव्हापासून देखील असे मानले जाते अंधकारावर प्रकाशाने केलेली मात,असत्यावर सत्याचा विजय दर्शवणारी एक घटना म्हणून देखील दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो.


Diwali 2024

नरकासुराचा वध -Diwali 2024


नरक चतुर्दशी ची एक कथा अशीही आहे की नरकासुर नावाचा एक राक्षस होता ज्याने आपल्या असुर शक्तीच्या जोरावर अनेक देवता तसेच ऋषीमुनींना खूप त्रास दिला होता. या राक्षसाने साधुसंतांच्या स्त्रियांना बंदी केले होते. नरकासुराचा असा हा वाढता अत्याचार पाहून देवी देवता साधुसंत सगळेच खूप चिंतित होते. यांनी भगवान श्रीकृष्णांकडे नरकासुरात चा त्रास बंद व्हावा म्हणून मदत मागितली. भगवान श्रीकृष्णांनी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध करून सर्वांना त्याच्या त्रासापासून पासून मुक्त केले व ज्या साधुसंतांच्या १६००० स्त्रिया बंदी बनवल्या होत्या त्यांना मुक्त केले. नरकासुराच्या त्रासातून मुक्ती मिळाल्याने लोकांनी आपल्या घरात दिवे लावले.तो दिवस म्हणजे कार्तिक महिन्याचे अमावस्या. तेव्हापासून नरक चतुर्दशी आणि दीपावलीचा सण साजरा केला जातो अशी देखील एक मान्यता आहे.


धनत्रयोदशीची कथा

धनत्रयोदशीची एक कथा अशीही आहे की या दिवशी धन्वंतरी देव प्रकट झाले म्हणून या योगात पहिली दिवाळी साजरी केली जाते अशी मान्यता आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशीला देवांचे वैद्य धन्वंतरी समुद्रमंथनातून अमृतपात्रासह प्रकट झाले म्हणून या दिवशी धन्वंतरी प्रकट झाल्यामुळे धनत्रयोदशी साजरी करण्यात येऊ लागले. त्यांच्यानंतर संपत्ती भरभराटीची देवी माता लक्ष्मी प्रकट झाली आणि त्यांचे स्वागत देवांच्या उत्साहाने केले गेले म्हणून देखील दिवाळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो.


बळी राजाची कथा

दिवाळीतील एक दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. शेतकऱ्याचा राजा बळीराजा त्याची ही कथा.हा बळीराजा उदार शांत दयाळू शासक असणारा राजा होता. भगवान विष्णूंनी जेव्हा वामन अवतार घेऊन बळीराजाकडे जमीन मागितली होती तेव्हा. तेव्हा बळीराजांनी आपले मस्तक पुढे केले भगवान विष्णू नी आपला एक पाय राजा बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पातळ लोकांमध्ये ढकलले. राजा बळीच्या सद्गुणावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला एक वरदान दिले की दरवर्षी एक दिवस बळीराजा पृथ्वीवर परत येईल. म्हणून देखील हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो.अशा अनेक विविध कथा प्रचलित आहेत.


Diwali 2024

कालावधी – Diwali 2024

गोवत्स् द्वादशी, वसुबारस 28 ऑक्टोबर 2024
धनत्रयोदशी29 ऑक्टोबर 2024
नरक चतुर्दशी31 ऑक्टोबर 2024
लक्ष्मी पूजन 1 नोव्हेंबर 2024
दिवाळी पाडवा बळीप्रतिपदा2 नोव्हेंबर 2024
भाऊबीज3 नोव्हेंबर 2024
Diwali 2024

पाच दिवसांची संपूर्ण माहिती

Diwali 2024
दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो , जो आनंद, प्रकाश, आणि समृद्धीचे,विजयाचे प्रतीक मानला जातो. हा सण पाच दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवसाचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आहे . 2024 मध्ये दिवाळी 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत साजरी केली जाणार आहे. या पाच दिवसांत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक विधी साजरे केले जातात जाणून घेऊया त्याबद्दलची संपूर्ण माहिती.

वसुबारस (28 ऑक्टोबर 2024)


Diwali 2024 वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायी ला माता मानले जाते.गायीची पूजा होते.गायीला खूप मानतात म्हणून या दिवशी गाईची पूजा केली जाते आणि दिवाळीचा पहिला दिवा घरात या दिवशी लावला जातो. वसुबारस मुख्यतः स्त्रियांद्वारे साजरी केली जाते, ज्या या दिवशी गाईच्या पायावर पाणी घालतात, हलदी-कुंकू वाहतात, आणि नैवेद्य देतात. या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:39 पासून रात्री 8:13 पर्यंत आहे.गोमाता च्या पूजनाने घरात सुख,शांती,समृद्धी येते.


धनत्रयोदशी/धनतेरस (29 ऑक्टोबर 2024)


Diwali 2024 धनतेरस म्हणजे दिवाळी च दुसरा दिवस.धनत्रयोदशीला माता लक्ष्मी आणि भगवान धनवंतरी यांची पूजा केली जाते. या दिवशी सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानतात. याच दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा देखील केली जाते.तसेच या दिवशी यमदीपदान देखील केले जाते, ज्यामध्ये यमराजाचे स्मरण करून त्यांच्या कृपेची प्रार्थना केली जाते. यमदीपदानाच्या वेळी दिव्याची वात दक्षिण दिशेला ठेवली जाते. या दिवशीचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:31 ते रात्री 8:31 पर्यंत आहे.


नरक चतुर्दशी (31 ऑक्टोबर 2024)


Diwali 2024 नरक चतुर्दशी हा दिवस भगवान श्रीकृष्णाने सत्यभामा आणि काली मातेच्या साहाय्याने नरकासुराचा वध करून 16 ऋषी संतांच्या स्त्रियांना मुक्त केलेल्या विजयाचा उत्सव म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करणे शुभ मानतात.अंगाला छान सुगंधित उटणे लावून अंघोळ केली जाते . या दिवशी पाहते अंघोळ केल्याने रोग नष्ट होऊन समृद्धी येते असे मानले जाते.


लक्ष्मी पूजन (1 नोव्हेंबर 2024)


Diwali 2024 दिवाळीच्या मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, जी संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते. लक्ष्मी पूजन हा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग आहे. या दिवशी धन, संपत्ती आणि समृद्धीच्या देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरात दिवे लावून, फुलांनी,रांगोळ्यांनी सजावट करून लक्ष्मी देवीला आमंत्रित केले जाते. यासोबतच गणपतीची देखील या दिवशी पूजा केली जाते. हा दिवस दुकानदार व्यापारी वर्गासाठी अधिक खास मनाला जातो आपली नवीन वह्या, खाती व्यापारी या दिवशी सुरू करतात.व्लयवसायात भरभराट यावी सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून पूजा करतात. पूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:36 पासून रात्री 8:01 पर्यंत आहे, पण अत्यंत शुभ काळ संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंत आहे.


बलिप्रतिपदा किंवा गोवर्धन पूजा/दिवाळी पाडवा (2 नोव्हेंबर 2024)


Diwali 2024 या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गावकऱ्यांचे रक्षण केले होते, असे मानले जाते. म्हणून, या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. याच दिवशी बलिप्रतिपदा साजरी केली जाते, ज्या दिवशी राजा बळीची पूजा केली जाते आणि त्याचं स्वागत केलं जातं. दिवाळी पडावा म्हाहणून पण हा दिवस साजरा केला जातो या दिवशीपत्नी पतीचे औक्षण करते पती-पत्नीच्या नात्याच्या सन्मानासाठी म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो.व्यापारीवर्ग या दिवसापासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतो .पाडव्याचा शुभ मुहूर्त सकाळी ६.14 ते 8.35 पर्यंत आहे .


भाऊबीज (3 नोव्हेंबर 2024)


Diwali 2024 दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.आणि भाऊ आपल्या बहिंचे संरक्षण करण्याचे वाचन देतो. भाऊबीजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1:01 पासून ते 3:22 पर्यंत आहे.


Diwali 2024

लक्ष्मीपूजन विधि – Diwali 2024

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेच्या ठिकाणाची स्वच्छता करून घ्या.पुजेची जागा धुवून पुसून स्वच्छ करा ,घरातली स्वच्छता लक्ष्मीच्या स्वागतासाठी महत्वाची आहे.
पुजे करिता लागणारे साहित्य: आसन, कुंकू, हळद, अक्षता, फुले, हार, धूप, उदबत्ती, नवीन वही (हिशोब वही), मिठाई, मिठ, सुपारी, नारळ, तांदूळ, दीवा, फळे, लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो.


पूजा मांडणी:
आसन: लाल कपड्याचे आसन ठेवून , पूजेचे सामान समया, दिवे, कलश, फुले व्यवस्थित मांडून घ्या.
कलश स्थापना: स्वच्छ पाणी भरून, सुपारी, हलदी-कुंकवाचा स्वस्तिक तयार करून, तांदूळ ठेवून कलश ठेवा.कलशामध्ये पाणी भरून त्यात रत्न म्हणून 1रुपयाचे नाणे सुपारी हळदीकुंकू टाकावे .कलशावर हळदी कुंकाने नाम करावा.


लक्ष्मी आणि गणेश स्थापन: गणपतीची मूर्ती किंवा सुपारीवर हळदी कुंकू लावून गणपती म्हणून सुपारी ची स्थापन करू शकता . त्याच्या उजव्या बाजूस कलश ठेवावा. लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर तो त्याच शेजारी ठेवावा .


पूजेची सुरुवात:
दीपप्रज्वलन: सर्व दिवे लावून लक्ष्मी पूजनाची सुरुवात करावी .. दिव्यांच्या तेजात पूजेला प्रारंभ करावा .
आचमन व संकल्प विधी: हातावर पाणी घेऊन संकल्प करावा , गणेश, लक्ष्मी, भगवान विष्णू व कुलदेवीचे ध्यान करावे .
गणेश पूजन: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ मंत्राचा जप करत करत गणपतीची पूजा करावी .


लक्ष्मी पूजन: ‘ओम श्री महालक्ष्म्यै नमः’ मंत्र म्हणत मातालक्ष्मीची पूजा करावी , हळदी-कुंकू लावून आणि नैवेद्य दाखवा.


विशेष लक्ष द्यावयाच्या गोष्टी:
झाडू पूजन: झाडू स्वच्छ करून हलका पाणी शिंपडा किवा धुवून घ्या , त्याला हळदी-कुंकू लावून झाडूची पूजा करा .
हिशोब वहीची पूजा: नव्या वहिवर स्वस्तिक काढून ती लक्ष्मीपूजनाच्या वेळी त्या वाहिचेही पूजन करावे .


पूजेचा समारोप:
पूजा संपल्यानंतर लक्ष्मीची आरती करावी . विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झाडूचा वापर सुरू करू शकता .अशा पद्धतीने प्रसन्न मानाने पूजा करावी देवीला फळे नैवेद्य अर्पण करून आपणही प्रसाद घ्यावा .घरातील मोठ्या व्यक्तींच्या पाया पडावे .व प्रसन्न चित्तानेपूजा संपन्न करावी .


टीप – हि संपूर्ण माहिती विविध ठिकाणाहून माहितीपूर्ण पद्धतीने आपल्या सोयीकरिता येथे मांडली आहे .

अशाच विविध माहिती करिता आपण या ठिकाणी नक्की भेट या आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा .धन्यवाद .व आपणा सर्वाना हि दिवाळी सुख शांती समृद्धी ची भरभराटीची जावो हीच प्रार्थना .


सरकारी योजनाच्या माहिती करा खाली वाचा

विश्वकर्मा योजना छोट्या व्यावसायिकांसाठी कर्ज योजना (इथे वाचा )

Thank you !

येथून शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top