Shravan 2024 |श्रावण महिन्याचे महत्व हिंदू धर्मातील पूजा विधी

Shravan 2024 date : Shravan 2024 : श्रावण 2024जाणून घ्या यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होणार ? व पहिला श्रावण सोमवार कधी ? पूजा कशी करावी ? श्रावण महिन्यात काय करावे व काय करू नये?

Shravan 2024 : श्रावण 2024

आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण वार येत असतात आणि आपण ते अगदी उत्साहाने साजरे करतो.आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे अधिक पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना. पूर्ण वर्षभरामध्ये विशेष करून मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण मास. या महिन्यात प्रत्येकाच्या घरी विशेष काळजी घेतली जाते खाण्यापिण्याचे नियम पाळले जातात. या महिन्यात भगवान शंकरांची पूजा केली जाते. भगवान शिव पार्वतीच्या पूजेचे अधिक महत्त्व या महिन्यात सांगितले आहे.


Shravan 2024 
Shravan 2024 

“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे” “क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”..बालकवी..

अगदी लहानपणापासून ही कविता आपण म्हणत आलो आहोत आणि निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये आवर्जून या ओळींचा उल्लेख करतो. कारण श्रावण महिना म्हणजे पावसाची चाहूल,सगळीकडे हिरवळ,आनंदी आणि प्रसन्न वातावरण आणि त्यात पवित्र असा मानला जाणारा श्रावण महिना की ज्या महिन्यात आपण भगवान शिव शंकराची पूजा मनोभावे करतो. या महिन्याला विशेष महत्त्व हिंदू धर्मामध्ये दिले गेले आहे. हिंदू पंचांगानुसार व हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी श्रावण महिना 5 ऑगस्ट पासून सुरू होत आहे व तो 3 सप्टेंबर 2024 पर्यंत असेल.

श्रावण महिना आला म्हणजे जणू सणांची उधळण झाल्याप्रमाणे आनंदोत्सव सुरू होतात. एकापाठोपाठ येणारे सण व त्यांना साजरे करत आनंदाने समोर जाणारे दिवस. श्रावणाला म्हणजे नागपंचमीचा सण आला म्हणजे फेर धरणे ,खेळ खेळणे, तुमचाच उंच जाणारे झाडाला बांधलेले झोके . यातच भर म्हणून की काय लगेच भाऊ बहिणींचा पवित्र मानला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन येतो. बघता बघता कृष्ण जन्माष्टमी येते. दहीहंडीच्या थरथर लागतात आणि हा श्रावण महिना आनंद द्विगुणीत करून जातो


Shravan 2024
Shravan 2024

उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात सारख्या इतर राज्यात श्रावण मासारंभ 22 जुलै रोजी सुरू झाला आहे व तो 19 ऑगस्टपर्यंत असेल. आपले महाराष्ट्र राज्य, दक्षिण भारत व पश्चिमेकडील राज्य यांच्यासाठी श्रावण महिना 5 ऑगस्ट पासून सुरू होत असून तो 3 सप्टेंबर 2024 रोजी संपेल.यंदा श्रावणाचे किती सोमवार ?

Shravan 2024 : श्रावण 2024

एकूण किती सोमवार आहेत या श्रावणात |Shravan 2024 : श्रावण 2024


एकूण सोमवार व तारीख Shravan 2024 : श्रावण 2024

पहिला श्रावणी सोमवार 5 ऑगस्ट 2024
दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट 2024
तिसरा श्रावणी सोमवार19 ऑगस्ट 2024
चौथा श्रावणी सोमवार 26 ऑगस्ट 2024
पाचवा श्रावणी सोमवार2 सप्टेंबर 2024
Shravan 2024 date : पहिला श्रावण सोमवार कधी ? इथे वाचा सर्व श्रावण सोमवार व त्याची तारीख

श्रावण महिन्यात कोणते नियम पाळावे Shravan 2024 : श्रावण 2024

Shravan 2024 : श्रावण 2024 श्रावण महिन्यात विशेषता लक्षात ठेवावे रोजचा आहार हा आपला शुद्ध सात्विक असावा यामध्ये तामसिक पदार्थांचा समावेश नसावा. सकाळी लवकर उठावे व सूर्य देवाला जल अर्पण श्रावण महिन्यात मांसाहार टाळावा तसा तो नेहमीच टाळावा पण तो एक वेगळा विषय आहे किमान या महिन्यात तरी मांसाहार किंवा अल्कोहोलिक पदार्थ सेवन करू नये. मन स्थिर चित्त वृत्ती शांत व शुद्ध ठेवावी.या महिन्यात भगवान शिव शंकराच्या मंदिरामध्ये अवश्य जावे. श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराला अभिषेक करणे अधिक फलदायी मानले जाते. अधिक काही करू शकत नसू तर किमान सतत मनात सांब सदाशिव असा जप करत राहावा . दर सोमवारी आपल्या जवळील शिव शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जावे. शक्य असल्यास 108 बेलपत्रे वाहून 108 वेळा ओम नमः शिवाय हा जप करावा.


Shravan 2024
Shravan 2024

श्रावण महिन्यात सोमवारचे व्रत कसे करावे ? Shravan 2024 : श्रावण 2024


श्रावण महिन्यात अनेक शिवभक्त वेगवेगळ्या प्रकारचे व्रत करतात यामध्ये श्रावण सोमवार, प्रदोष व्रत, 16 सोमवार व्रत तसेच मंगलागौरी व्रत देखील करतात. विशेषतः श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार हा उपवास मोठ्या प्रमाणात केला जातो. व्रत आणि उपवास आपल्या शरीर प्रकृती नुसार करावा. काही लोक दिवसभर निरंकार म्हणजे पाणी न पिता देखील उपवास करतात यामध्ये आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी न हो देता काळजी घेऊन हा उपवास करावा किंवा दिवसभर उपवास करून रात्री एक वेळचे भोजन करून देखील हा उपवास केला जातो किंवा दिवसभर उपवास ठेवून उपवास व्रत मध्ये खाल्ले जाणारे फळे किंवा इतर फराळ केला जातो. महत्त्वाचे हे की या दिवसात आपण आपल मन स्थिर ठेवावे व भगवंतांचे नामजप करण्यात वेळ द्यावा.


श्रावण महिन्यात कोणते नियम पाळावे Shravan 2024 : श्रावण 2024

श्रावण महिन्यात विशेषता लक्षात ठेवावे रोजचा आहार हा आपला शुद्ध सात्विक असावा यामध्ये तामसिक पदार्थांचा समावेश नसावा. सकाळी लवकर उठावे व सूर्य देवाला जल अर्पण श्रावण महिन्यात मांसाहार टाळावा तसा तो नेहमीच टाळावा पण तो एक वेगळा विषय आहे किमान या महिन्यात तरी मांसाहार किंवा अल्कोहोलिक पदार्थ सेवन करू नये. मन स्थिर चित्त वृत्ती शांत व शुद्ध ठेवावी.या महिन्यात भगवान शिव शंकराच्या मंदिरामध्ये अवश्य जावे. श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराला अभिषेक करणे अधिक फलदायी मानले जाते. अधिक काही करू शकत नसू तर किमान सतत मनात ओम नमः शिवाय हा जप आठवणीने करत राहावा. दर सोमवारी आपल्या जवळील शिव शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जावे. शक्य असल्यास 108 बेलपत्रे वाहून 108 वेळा ओम नमः शिवाय हा जप करावा. शुद्ध तुपाचा दिवा लावावा.


श्रावण महिन्याचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व Shravan 2024 : श्रावण 2024

याशिवाय पुराणा नुसार देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे माता पार्वती यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्ये केली आणि उपवास साधनेने शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले होते. त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता. त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे.


तसेच असेही मानले जाते की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर श्रावण महिन्यामध्ये त्यांच्या सासरी जात आणि म्हणून सर्वजण त्यांची मनोभावे पूजा करून त्यांची कृपा प्राप्ती मिळते. तसेच असेही मानले जाते की श्रावण महिन्यात भगवान शिव शंकर व पार्वती माता पृथ्वीवर येतात म्हणून देखील या महिन्यांमध्ये भगवान शिव शंकराची पूजा अर्चना करण्याचे अधिक महत्त्व आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने केलेल्या तपस्या व वृत्तवैकल्यामुळे त्यांनी भगवान शिव शंकरांना प्राप्त केले म्हणून देखील या महिन्यांमध्ये उपवासाचे व्रतवैकल्याचे महत्त्व अधिक आहे.


श्रावण महिन्यात येणारे सण Shravan 2024 : श्रावण 2024

मान्सून आला म्हणजे जोराचा पाऊस आणि पाऊस सुरू झाला म्हणजे श्रावणाची चाहूल या श्रावण महिना सुरुवात होताच अनेक हिंदू सणांना उधळण येते यामध्ये श्रावण सोमवार व्रत असेल नागपंचमी मंगळागौरी रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी अमावस्या इत्यादी एकापाठोपाठ एक येणाऱ्या सणांमुळे हा महिना अगदी उत्साहात पार पडतो


शेतकरी बांधवासाठी मोफत लाईट बिल योजना संपूर्ण माहिती बद्दल इथे वाचा (click here )

मनोरंजन जगतातील बातम्या साठी इथे वाचा -Big Boss Marathi 2024 बिग बॉस मराठी २०२४ (click here )


येथून शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top