Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024

Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी केलेला अर्ज रिजेक्ट झाला का ? अजून अर्जच केला नाही ? चिंता नको ! अर्ज करण्याची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे. त्वरित अर्ज करा. संपूर्ण माहितीसाठी खाली वाचा


Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ – महाराष्ट्र राज्य सरकारने आत्ताच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशन 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणांची उधळण करून महाराष्ट्रातील जनतेला सुखद धक्का दिला आहे. या अगोदर महिलांना एसटी प्रवासासाठी निम्मे तिकीट करून एक सुखद धक्का दिलाच होता त्यात आता महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर केली आहे.

त्याद्वारे राज्यातील 18 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व महिलांसाठी ही योजना जाहीर केली होती परंतु नवीन नियमानुसार आता हे वय 21 ते 65 वर्षाच्या महिला यासाठी अर्ज करू या योजनेमुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या पोषणात उत्तम सुधारणा व्हावी यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णयाक भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी म्हणून राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याद्वारे प्रत्येक महिन्याला राज्यातील महिलांना आर्थिक मदत जाहीर केली आहे


Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

Table of Contents

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश (Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे त्यांचा आरोग्य आणि पोषणात सुधारणा व्हावी आणि कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमी का अधिक मजबूत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अनेक महिला अशा आहेत ज्या स्वतःच्या जीविकेसाठी पूर्णपणे कुटुंबावर निर्भर असतात अशा महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मदत मिळाल्याने त्या स्वतःच्या सोयीनुसार व स्वतःच्या गरजेनुसार या पैशाचा वापर करू शकतील व आत्मनिर्भर होऊन स्वतःसाठी निर्णय घेऊ शकतील. स्वतःसाठी लागणारे छोटे मोठे खर्च किंवा लहान मूल असेल तर त्यासाठी लागणारे छोटे मोठे खर्च या मदतीतून निघतील व स्वतः निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यासाठी स्वतःच्या हक्काचा पैसा त्यांच्याजवळ असेल.


शासन निर्णय – Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी व योजना प्रभावीपणे सुलभतेने व्यवस्थित स्पष्ट होण्यासाठी काही निकष दिले आहेत ते खालील प्रमाणे (Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४)

नवविवाहित महिलेचे नाव रेशन कार्ड वरती लगेच लावले नसते त्यामुळे अशा ठिकाणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या महिलेला पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजेच ज्यांचं नाव रेशन कार्ड वरती नाही अशा विवाहित महिला आपल्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून जमा करू शकतात.

दुसऱ्या राज्यात जन्म झालेल्या पण आत्ता महाराष्ट्रात राहत असणाऱ्या महिलांकरिता महाराष्ट्रात राहत असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा केस च्या बाबतीत पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल.


अर्ज करण्याची तारीख

Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ – या योजनेअंतर्गत अर्ज न करता महिलांची रांगच रांग दिसून येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज करण्याची तारीख 31 जुलै पर्यंत ची होती परंतु राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता सरकारने या योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे आता ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेले नाहीत किंवा काही जणांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत अशा महिलांना पुन्हा अर्ज करण्यासाठी सरकारने तारीख 31 ऑगस्ट पर्यंत केलेली आहे.


Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र

आधार कार्ड
रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
बँकेचे पासबुक
अर्जदार महिलेचा फोटो
आधीवास किंवा जन्माचे प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र
Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ – कागदपत्रांची यादी

या योजनेसाठी कोण लाभार्थी असेल

  • महाराष्ट्राच्या रहिवासी महिला
  • विवाहित किंवा घटस्फोटीत विधवा,परित्यक्ता आणि निराधार महिला
  • दुसऱ्या राज्यात जन्म झालेल्या महिला आता महाराष्ट्रात राहत आहेत ज्यांचे पती महाराष्ट्राचे रहिवासी असून ज्यांच्या जन्माचे प्रमाणपत्र महाराष्ट्राचे आहे व रेशन कार्ड वरती पंधरा वर्षांपूर्वी नाव किंवा मतदान कार्ड 15 वर्षांपूर्वीचे देखील नाव आहे असे पण चालेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल.

Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

या योजना साठी अपात्र कोण असेल ?

  • ज्यांचे उत्पन्न वार्षिक अडीच लाख पेक्षा जास्त आहे
  • ज्यांच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरणारे असतील तर
  • ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी करणारे किंवा पेन्शन पात्र असतील तर
  • जर कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
  • जर कुटुंबामध्ये चार चाकी गाडी असेल तर ट्रॅक्टर सोडून
  • जर महिलेच्या परिवारातील कोणी सदस्य आमदार खासदार किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणारे असेल तर
  • जर अर्जदार महिला 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ इतर योजनेतून घेत असेल तर या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत


Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज कसा करावा

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल. यासाठी दोन पद्धतीने अर्ज करू शकतो एक सरकारी वेबसाईट दिली आहे त्यावरून आणि दुसरी म्हणजे स्वतःच्याच मोबाईलवरून आता महिला अर्ज करू शकतील यासाठी गुगल प्ले स्टोअर मधून जाऊन नारीशक्ती दूध एप्लीकेशन डाउनलोड करावे व तेथून देखील महिलांना स्वतः अर्ज करता येईल.

Google play store एप्लीकेशन चा लिंक साठी( इथे क्लिक करा)

Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ हमीपत्र PDF साठी (इथे click करा )

ऑनलाइन वेबसाईट वर अर्ज करण्यासाठी (इथे क्लिक करा)

नारीशक्ती दूत अप्लिकेशन साठी (इथे click करा)


Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

नारीशक्ती एप्लीकेशन कसे उघडावे स्टेप बाय स्टेप जाणून घ्या – (Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४)

  • सगळ्यात अगोदर गुगल प्ले स्टोअर मध्ये जावे.
  • तिथे नारीशक्ती दूध ॲप असे सर्च करावे त्या ॲप्लिकेशन ला डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे
  • आता इथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा व टर्म अँड कंडिशन या चौकटीवर दाबावे टिकमार्क असे चिन्ह येईल ✓ त्यानंतर लॉगिन करावे
  • यानंतर आपल्याला दिलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी ॲप मध्ये टाकून व्हेरिफाय नावाच्या येणाऱ्या बटणावर क्लिक करावे.
  • यानंतर मुख्य पेजवर जाऊन लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म 2024 त्याची लिंक मिळेल त्यावरती क्लिक करावे.
  • यानंतर आपल्यासमोर या योजनेचा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये विचारलेली पूर्ण माहिती लिहावी जसे नाव पत्ता पतीचे किंवा वडिलांचे नाव इत्यादी.
  • सर्व माहिती लिहिल्यानंतर खाली एक पर्याय येईल ज्यामध्ये विचारले असेल की या अगोदर आपण कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे का हो किंवा नाही यावरती क्लिक करावे. जर आपण इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर हो/Yes वर क्लिक करावे. जर इतर योजनेचा लाभ घेत नसाल नाही/No वर क्लिक करावे.
  • यानंतर अर्जदार महिलेचा स्वतःचा आधार कार्ड नंबर बँकेच्या खात्याचा नंबर. बँकेच्या खात्याच्या पासबुक वर आय.एफ.एस.सी./IFSC कोड लिहिलेला असतो तो पाहून तो तिथे टाकावा. लक्षात ठेवा यासाठी जी महिला अर्ज करत आहे त्यांच्या नावे स्वतःचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. आणि आधार कार्ड सोबत जोडलेले असावे.
  • आता यानंतर इथे लागणारे कागदपत्र अपलोड करायचे आहेत.
  • कागदपत्र अपलोड करून झाल्यानंतर एक्सेप्ट नावाचे एक बटन येते त्यावर क्लिक करावे व माहिती जतन करावी.
  • आता यानंतर आपण भरलेली पूर्ण माहिती आपल्याला दिसेल ती पुन्हा एक वेळा नीट तपासावी व सबमिट बटन दाबून माहिती जमा करावी.
  • या पद्धतीने नारीशक्ती एप्लीकेशन वर जाऊन आपण स्वतः देखील अर्ज करू शकता या व्यतिरिक्त यामध्ये अर्ज करताना कोणती अडचण येत असेल तर खाली कमेंट जरूर करावी.
  • याशिवाय आपण ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटवरून देखील अर्ज करू शकता. त्यासाठी वेबसाईटवर लॉगिन करणे विचारलेल्या पद्धतीने माहिती भरून आपले कागदपत्र सबमिट करावे.

लाडकी बहीण योजना यादी कशी पहावी

  • लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी नारीशक्ती एप्लीकेशन डाउनलोड करावे आपला मोबाईल नंबर टाकून टम्स अँड कंडिशन यावर क्लिक करून लॉगिन करावे.
  • यानंतर इथे आपल्याला “यापूर्वी केलेले अर्ज” असा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करावे.
  • आता आपल्यापुढे पूर्ण यादी येईल तेथून आपण आपले नाव पाहू शकता.
  • महिलांनी ऑफलाइन अर्ज देखील केले आहेत त्यांनी आपले नाव पाहण्यासाठी नगरपालिकेच्या सरकारी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन लिस्ट चेक करू शकता.


लाडकी बहीण योजनेमध्ये अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत ? काय कारण आहे इथे वाचा..Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

यासाठी जॉइंट बँकेचे खाते चालणार नाही

अर्जामध्ये चुका केल्या असतील किंवा खडाखोड केली असेल तरी देखील हा अर्ज रद्द होईल

संकेत नवीन खाते काढले आहे परंतु ते आधार काढला लिंक केलेले नाही तरी देखील अर्ज रद्द होईल.

आधार आणि बँक लिंक नसेल तरी पण अर्ज रद्द होईल.

आपण सबमिट केलेले डॉक्युमेंट जर व्यवस्थित दिसत नसतील तर.

रेशन कार्ड नीट दिसत नसेल तर आणि आधार व रेशन चा पत्ता वेगवेगळ्या असेल तर.

आधार ची दोन्ही पुढील व मागील बाजू जोडली नसेल तर

आधार वर पूर्ण जन्मतारीख नसेल तर

आधार वरचे नाव व पासबुकचे नाव चुकले असेल तर


ज्या महिलांना स्वतः अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी

  • ज्या महिलांना अर्ज करता येत नाही अशा महिलांनी अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामसेवक किंवा समूह संसाधन व्यक्ती किंवा अशा सेविका किंवा वाढ अधिकारी किंवा सिटी मिशन मॅनेजर किंवा मनपा बालवाडी सेविका किंवा मदत कक्ष प्रमुख किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला लागणार नाही तर या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्जावर माहिती लिहिताना कोणताही प्रकारची खडाखोड करू नये यामध्ये अर्जदाराचे नाव जन्मदिनांक पत्ता याबाबतची माहिती आधार कार्डवर जी आहे तीच अचूक पद्धतीने भरावी.
  • बँक खाते नंबर व आधार कार्ड नंबर इत्यादी सारखी माहिती अचूक खाडाखोड न करता भरावी जेणेकरून आपला फॉर्म रद्द होणार नाही.
Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

याशिवाय इतर योजना व मनोरंजन विश्वातील बातम्यासाठी इथे पहा

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना (लिंक साठी इथे क्लिक करा )

Marathi Big Boss – 5 मराठी बिग बॉस सिझन 5 (इथे क्लिक करा )

श्रावण २०२४ Shravn २०२४ पूजा विधी का आहे श्रावण महिना अधिक खास (जाणून घ्या इथे )


येथून शेअर करा

Leave a Comment