नमस्कार , Annapurna Yojana 2024
लाडकी बहिण योजनेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आणि याच योजनांमध्ये अजून भर म्हणून आता ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार अशा घोषणेचा राज्य सरकारचा नवीन GR जाहीर करण्यात आला आहे हि योजना राज्यभर अन्नपूर्णा योजना म्हणून राबविण्यात येणार आहे .कोण अर्ज करू शकेल ?, कोण पत्र असेल ? ,कोणाच्या नावे गॅस कनेक्शन असायला हवे ?,अर्ज कुठे नि कसा करायचा ? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत
प्रस्तावना
राज्यातील आणि देशातील स्त्रियांना चुलीपासून सुटका मिळावी,धुरमुक्त वातावरणात त्यांना जगता यावे, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवठा असावा,तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यामध्ये देखील सुधारणा व्हावी,कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी अशा सर्व बाबींचा विचार करून शासनाने स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजना 2016 मध्ये सुरू केली होती.याच योजनेमध्ये भर म्हणून आता देशातील राज्यातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवले जावे म्हणून वर्षातून तीन गॅस सिलेंडर रिफील करून देण्याची घोषणा आत्ताच्या आघाडी सरकारने केली आहे. गॅस कनेक्शन असून देखील अनेक जणांना गॅस सिलेंडर भरणे शक्य होत नाही परिणामी स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर केला जातो म्हणजेच वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचते हे टाळण्याकरिता Annapurna Yojana 2024 अन्नपूर्णा योजना घोषित करण्यात आली आहे.
नवीन जीआर नुसार आतापर्यंत पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत जोडणी असलेल्या सर्व सदस्यांना या योजनेचा लाभ मिळालाच होता परंतु यामध्ये अडचण अशी आहे की आपल्याकडे जास्तीत जास्त गॅस जोडणी किंवा गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावे असते त्यामुळे या बाबीचा विचार करूनआता लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या सर्व महिला देखील या योजनेसाठी पात्र असतील त्यांना देखील वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफील मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे
शासन निर्णय
केंद्र शासनाने या अगोदर प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत राज्यातील 52.16 लक्ष लाभार्थ्यांना याचा लाभ करून दिला होता आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाला देखील तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच गॅस सिलेंडर मोफत रिफील करून भरून मिळणार आहे याच योजनेला Annapurna Yojana 2024 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने ही योजना राबवण्यात येत आहे.
पात्रता
- प्रधानमंत्री उज्वला योजना -प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थी महिला या योजनेसाठी पात्र असतील. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ५२ लाख कुटुंबांचा समावेश होतो.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पात्र लाभार्थीही या योजनेसाठी पात्र आहेत.
- राशन कार्डधारक – एका कुटुंबातील फक्त एका लाभार्थीला (महिला) या योजनेचा लाभ मिळेल. गॅस कनेक्शन हे त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे.
- गॅस सिलेंडर: या योजनेअंतर्गत फक्त 14.2 किलो वजनाचे सिलेंडर वापरले जाऊ शकतात.
- व्यावसायिक गॅस सिलेंडर (हॉटेल, उद्योग) यासाठी उपलब्ध नाही.
Annapurna Yojana 2024 या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? यासाठी कोण पात्र असेल? तर ज्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली असेल अशा महिला या योजनेसाठी पात्र असतील. या योजनेसाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे.आपणास माहिती आहे की सहसा गॅस जोडणी हे घरातील पुरुषांच्या नावे असते त्यामुळे या बाबींचा विचार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.एका कुटुंबातील केवळ एक व्यक्ती यासाठी पात्र असेल म्हणजेच प्रत्येक रेशन कार्ड धारक यासाठी पात्र असेल.हा लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर असलेल्या गॅस धारकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
उद्दिष्ट Annapurna Yojana 2024
- पात्र लाभार्थ्यांना वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार.
- महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आणि धूरमुक्त वातावरण निर्माण करणे तसेच यामुळे पर्यावरणास वृक्षतोड करून होणारी हानी टाळली जाईल.
- गरीब कुटुंब आर्थिक दृष्ट सक्षम होतील व चांगले जीवन जगता येईल.
योजनेचा लाभ कसा घ्यावा
- लाभार्थ्यांनी प्रथम गॅस सिलेंडरचे पैसे (अंदाजे ₹830 प्रति सिलेंडर) भरावे लागतील.
- गॅस खरेदी केल्यानंतर, शासनाच्या डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) अंतर्गत ₹530 प्रति सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- एका महिन्यात फक्त एका सिलेंडरवर सबसिडी मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया Annapurna Yojana 2024
- Annapurna Yojana 2024 या योजनेसाठी कोणत्याही नव्या अर्जाची गरज नाही.
- उज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेतील महिलांची यादी तेल कंपन्यांना सरकारकडून पाठवली जाईल व त्यापद्धतीने या योजनेचा लाभ घेता येईल .
सब्सिडी पद्धती
- Annapurna Yojana 2024 याजानेतील लाभार्थी महिलांना सिलेंडरची मूळ किंमत भरावी लागेल. त्यानंतर, राज्य सरकार 530 रुपये आणि केंद्र सरकार 300 रुपये सबसिडी थेट बँक खात्यात जमा करतील.
- सिलेंडर खरेदी केल्यानंतर काही दिवसांत बँक खात्यात पैसे जमा होतील.
ई-केवायसीची गरज
- गॅस कनेक्शनधारकाला ई-केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड आणि अंगठा वापरून करून जवळच्या गॅस एजन्सीवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल.
ई-केवायसी कशी करावी
ई-केवायसीसाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे
- आधार कार्ड
- अंगठा किंवा सही
- जवळच्या गॅस एजन्सीवर जाऊन दोन मिनिटांत ई-केवायसी पूर्ण करून घेता येईल .
जर गॅस पुरुषाच्या नावावर असेल तर काय कराव ?
- बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असणार कि गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असते तर मग काय कराव ?, तर जर तुम्ही उज्वला योजने अंतर्गत गॅस घेतला असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल
- तसेच, रेशन कार्डवर नाव असल्यास कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या गॅस कनेक्शनवर योजनेचा लाभ मिळू शकतो.
- लाडकी बहीण योजने मधे पात्र असणार्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल .
Note – टीप
Annapurna Yojana 2024 ही योजना महाराष्ट्रातील सुमारे दीड कोटी महिलांना लाभ मिळवून देणार आहे. अर्ज करण्याची गरज नाही, फक्त ई-केवायसी पूर्ण करून गॅस सिलेंडरचा लाभ घ्यावा. महिलांना घरगुती खर्च कमी करण्यासाठी आणि स्वयंपाक गॅस उपलब्धतेसाठी ही योजना महत्त्वाची ठरेल.तुमची ई-केवायसी अजून झाली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या .
सरकारी GR वाचण्यासाठी (इथे वाचा )
Annapurna Yojana 2024:वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नेमकी काय आहे?
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Annapurna Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत भरून देण्यात येणार आहेत.
2. Annapurna Yojana 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचा उद्देश महिलांना स्वच्छ इंधन पुरवणे, त्यांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करण्याची सुविधा देणे हा आहे. तसेच पर्यावरणाचे संरक्षण करणेही यामागील महत्त्वाचे उद्दिष्ट असून आर्थिक सक्षमीकरण व्हावे हा उद्देश आहे .
3. Annapurna Yojana 2024 या योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्यांना मिळू शकतो?
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी महिला तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने मधील पात्र लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ५२ लाख कुटुंबांचा समावेश होतो.तसेच रेशन कार्ड धारक देखील्याचा लाभ घेऊ शकतील .
4. Annapurna Yojana 2024 योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता गरजेची आहे?
- गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असावे .
- एका कुटुंबातील फक्त एका लाभार्थीला (महिला) या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- लाभार्थी हे १ जुलै 2024 पूर्वी पात्र असले पाहिजेत.
- लाडक्या बहिण योजनेस पात्र महिलांना देखील लाभ मिळेल .
5. माझ्या कुटुंबात एकाहून अधिक व्यक्ती आहेत. प्रत्येकासाठी वेगळा गॅस सिलेंडर मिळेल का?
- नाही, एका कुटुंबातील फक्त एका राशन कार्डवरच एक लाभार्थी गॅस सिलेंडर घेऊ शकतो. प्रत्येक राशन कार्डावर वर्षाला फक्त ३ मोफत गॅस सिलेंडर दिले जातील.
6. गॅस सिलेंडर मोफत मिळेल की त्यासाठी पैसे भरावे लागतील?
- सुरुवातीला गॅस सिलेंडर खरेदीसाठी पैसे भरावे लागतील (अंदाजे ₹830 प्रति सिलेंडर). त्यानंतर ₹530 प्रति सिलेंडरची सबसिडी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
7. Annapurna Yojana 2024 या योजनेअंतर्गत किती गॅस सिलेंडर मोफत मिळतील?
- योजनेअंतर्गत वर्षात ३ मोफत गॅस सिलेंडर मिळतील.
8. Annapurna Yojana 2024 साठी अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर अर्जाचे परीक्षण करून योजनेचा लाभ दिला जाईल.
9.Annapurna Yojana 2024 योजनेत सहभागी होण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- राशन कार्ड, आधार कार्ड, गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असले पाहिजे आणि बँक खात्याचे तपशील.
10. गॅस सिलेंडरच्या किंमतीत फरक असेल का?
- हो, जिल्हानुसार गॅस सिलेंडरच्या किंमतीत थोडाफार फरक असू शकतो. परंतु राज्य शासनाच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
11. Annapurna Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम तारीख कोणती आहे?
- १ जुलै 2024 रोजी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. त्यानंतर नवीन अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
12.Annapurna Yojana 2024 या योजनेअंतर्गत सबसिडी मिळण्यासाठी किती वेळ लागेल?
- गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच सबसिडी डीबीटी अंतर्गत बँक खात्यात जमा केली जाईल.
13. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यात काय फरक आहे?
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत नवीन गॅस कनेक्शन दिले जातात, तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडरची सुविधा दिली जाते.
14. माझे राशन कार्ड विभक्त केले असल्यास मला लाभ मिळेल का?
- जर राशन कार्ड विभक्त करण्याची प्रक्रिया १ जुलै 2024 नंतर केली असेल, तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
15. लाभार्थ्यांची यादी कुठे पाहू शकतो?
- तेल कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर लाभार्थ्यांची यादी प्रकाशित केली जाणार आहे .
अशा पद्धतीची अजून नवीन नवीन माहिती वाचण्याकरिता नक्की या वेबसाईट भेट द्या .
याशिवाय अधिक योजना मनोरंजन विश्वाबद्दल तसेच धार्मिक गोष्टीबद्दल अधिक माहिती खाली वाचा
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना बद्दल ( इथे वाचा )
माझा लाडका भाऊ योजना बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा )
माझी लाडकी बहिण योजना बद्दल माहिती साठी (इथे क्लिक करून वाचा )
विश्वकर्मा योजना छोट्या व्यावसायिकांसाठी कर्ज योजना (इथे वाचा )
धन्यवाद !