Gajanan Maharaj Shegaon|गजानन महाराज प्रकटदिन,जीवनचरित्र,महिमा,चमत्कार विषयी संपूर्ण माहिती

नमस्कार, आज या लेखांमध्ये गजानन महाराजांविषयी मराठीत माहिती पाहणार आहोत.Gajanan Maharaj Shegaon, Gajanan maharaj Information in Marathi संपूर्ण महाराष्ट्राच्या ओळखीचे असणारे शेगावचे गजानन महाराज यांचा महिमा अफाट आहे. shegaon gajanan maharaj संपूर्ण महाराष्ट्रात गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. gajanan maharaj prakat din 2025 प्रकट दिना दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करतात जे कोणाला शक्य आहे ते मूळ ठिकाणी जातात. पण ज्यांना शक्य नाही ते घरीच  फोटोची पूजा करतात. gajanan maharaj photo जे लोक पुण्याला राहतात आळंदी चा मंदिर जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी जातात. gajanan maharaj mandir alandi चला तर मग आपण गजानन महाराजांविषयी संपूर्ण माहिती पाहूत.

Gajanan Maharaj Shegaon हे विदर्भातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे, ज्याला “विदर्भातील पंढरपूर” म्हणून ओळखले जाते. श्री गजानन महाराजांची समाधी येथे असून, तेथील वातावरण भक्तांसाठी अत्यंत सुंदर खूप स्वच्छ परिसर आहे. गजानन महाराजांच्या मंदिरातील स्वच्छता  संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

Table of Contents

गजानन महाराजांचे मंदिर

श्री Gajanan Maharaj Shegaon मंदिर हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच भाविकांच्या मनात आध्यात्मिक शांती आणि समाधाना होते. मंदिर परिसरात प्राचीन उंबराचे झाड आहे. झाडाच्या जवळचा परिसर देखील खूप स्वच्छ असतो. औदुंबराच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात. औदुंबराच्या झाडाखाली बसून आपण एखादी इच्छा दत्तगुरूंना मागितली तर ती आपली सर्व इच्छा पूर्ण करतात.अगदी केव्हाही मंदिरात जाऊ तर आल्हाददायक मन प्रसन्न करणार वातावरण,प्रचंड शांतता,शिस्त,स्वच्छतेबाबत तर तोड नाही अशी व्यवस्था आहे मंदिरात.जो भक्त एकदा मंदिरात गेला त्यांना पुन्हा पुन्हा मंदिरात दर्शनासाठी जाण्याची इच्छा नक्कीच होते.

Gajanan Maharaj Shegaon
Gajanan Maharaj Shegaon

Gajanan Maharaj Shegaon संस्थानमध्ये उपलब्ध सोयी-सुविधा

  • मोफत चप्पल स्टँड – दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी विनामूल्य सुविधा.
  • शांत आणि निसर्गरम्य परिसर – मंदिराच्या आजूबाजूला मोठी झाडे आणि रमणीय वातावरण आहे.
  • गजानन महाराजांचे विविध प्रसंग दर्शवणारी चित्रे – मंदिराच्या भिंतींवर गजानन महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत.

श्री गजानन महाराजांचा जीवनचरित्र

संतांचे जीवन ही मानवासाठी प्रेरणादायी असते. श्री गजानन महाराज हे अशाच महान संतांपैकी एक होते, ज्यांनी आपल्या भक्तांसाठी अनेक चमत्कार केले आणि अध्यात्मिक मार्गदर्शन दिले. त्यांच्या जीवनाची गोष्ट गजानन विजय ग्रंथात नमूद केली आहे, आणि त्यांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या भक्तांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी उलगडल्या आहेत.

जन्म आणि बालपण

श्री गजानन महाराजांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील थळ या गावी भवानीराम साबळे यांच्या कुटुंबात झाला. जन्मतःच त्यांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या. त्यांचे बालपण अत्यंत अलौकिक होते. लहानपणीच ते वस्त्र परिधान करत नसत आणि कोणीतरी त्यांना वस्त्र घालण्याचा प्रयत्न केला तरी ते ते फेकून देत. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना बंद खोलीत डांबले तरी ते पुन्हा बाहेर दिसत आणि त्यांच्या अशा लीलांमुळे गावातील लोक अचंबित होत.

अलौकिक लीलांचा आरंभ

लहानपणी गणोबा (गजानन महाराजांचे मूळ नाव) आपल्या मित्रांसोबत खेळत असताना अनेक वेळा आध्यात्मिक चमत्कार घडवत असत. एका प्रसंगी कोऱ्हाळा या गावी असलेल्या दैवी विहिरीत त्यांनी तूप निर्माण करून सर्वांना भोजनदान दिले. त्यांची लीला पाहून लोक चकित झाले. अशा अनेक प्रसंगांमधून त्यांचे दैवी सामर्थ्य प्रकट झाले.

श्री गजानन महाराज
Gajanan Maharaj Shegaon

अध्यात्मिक प्रवास आणि गुरूंची कृपा

गणोबा पुढे अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आले. स्वामींनी त्यांना आध्यात्मिक आदेश दिला आणि नाशिक येथील देव मामलेदारांकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कपिलधारा येथे बारा वर्षे तपश्चर्या केली. शेवटी, स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार ते शेगावी पोहोचले.

शेगाव येथे प्रकट होणे

२३ फेब्रुवारी १८७८ रोजी Gajanan Maharaj Shegaon येथे प्रथम लोकांच्या दृष्टीस पडले. त्यांनी उष्ट्या पत्रावळींवरील अन्न ग्रहण केले, त्यावेळी बंकटलाल अग्रवाल व दामोदरपंत कुलकर्णी यांनी त्यांना पाहिले. त्यावेळी महाराज तुर्य अवस्थेत होते आणि त्यांच्या तेजस्वी स्वरूपाने भक्तांना त्यांच्या दैवी स्वरूपाची प्रचिती आली.

महाराजांचे जीवन आणि उपदेश

गजानन महाराज हे सहा फूट उंच, तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे होते. ते सदैव दिगंबर अवस्थेत राहत असत. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या संपत्ती, पद, प्रतिष्ठेला महत्त्व दिले नाही. साध्या जीवनशैलीत राहून भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते.

चमत्कार आणि भक्तांचा उद्धार

गजानन महाराजांनी अनेक भक्तांच्या समस्या सोडवल्या. त्यांनी प्लेगने त्रस्त असलेल्या भक्तांचे प्राण वाचवले. एकदा मुलांनी त्यांना विस्तव देण्यास नकार दिल्यावर महाराजांनी आपल्या चिलमीवर काडी धरताच स्वतःहून विस्तव पेटला.

संस्थान स्थापन आणि समाधी

गजानन महाराजांनी १९०८ मध्ये आपल्या समाधी स्थानाचे संकेत दिले आणि त्या जागेवर संस्थान स्थापन करण्यात आले. त्यांनी कोणतीही गुरुशिष्य परंपरा ठेवली नाही, तर सेवेची परंपरा सुरू केली. त्यांच्या समाधीचा सोहळा लाखोंच्या उपस्थितीत पार पडला आणि आजही शेगाव संस्थान त्यांच्या सेवाकार्याचा वारसा पुढे नेत आहे.चोख नियोजन,शिस्त,शांतता,स्वच्छ्ता,प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोज महाप्रसाद अस लक्ख करणार वातावरण आजही मंदिर संस्थेने टिकवून ठेवले आहे.तुम्ही कधी गेलात तर लक्ष देऊन नोटीस बोर्ड बाचा त्यावर पूर्ण खर्चाचा लेख जोखा लिहिलेला असतो.प्रत्येक गोष्टीचे नीटनेटके नियोजन या मंदिरात दिसते.

Shegaon Gajanan Maharaj
Gajanan Maharaj Shegaon

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – भगवान विष्णूचा जन्म,उत्पत्ती,भगवान विष्णूंची रहस्ये,विष्णूच्या 10 अवताराची संपूर्ण माहिती मराठीत

गजानन महाराज विहीर संस्थान, अकोली जहागीर

गजानन महाराज हे संतपरंपरेतील एक महान संत होते. त्यांच्या अलौकिक लीलांनी आणि भक्तांसाठी केलेल्या कृपादृष्टीमुळे त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे. त्यांच्या अनेक चमत्कारिक कृतींपैकी एक महत्त्वाचा चमत्कार म्हणजे अकोली जहागीर येथील सजल विहीर, जी आजही भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे.

गजानन महाराज आणि विहिरीचे चमत्कारिक सजलकरण

गजानन महाराज एकदा उन्हाळ्यात अकोट परिसरातून प्रवास करत असताना तहानेने व्याकूळ झाले. त्यांनी एका शेतकऱ्याकडे पाणी मागितले. मात्र, त्या शेतकऱ्याने त्यांना वेड्यात काढले आणि पाणी द्यायला नकार दिला. महाराजांनी त्याला काही न बोलता जवळील विहिरीकडे मोर्चा वळवला.

ही विहीर बारा वर्षांपासून कोरडी होती, त्यामध्ये पाण्याचा थेंबही नव्हता. पण गजानन महाराजांनी आपल्या योगसाधनेच्या सामर्थ्याने त्या विहिरीला स्पर्श करताच तिथे पाण्याचे झरे फुटले आणि विहीर पूर्ण भरून वाहू लागली. हा चमत्कार पाहून तो शेतकरी हतबंब झाला आणि महाराजांच्या चरणी लीन झाला.

विहीर संस्थान आणि मंदिराचा विस्तार

ही विहीर आजही अकोली जहागीर (अकोला जिल्हा, अकोट तालुका) येथे शेत सर्वे नंबर ५२ मध्ये स्थित आहे. गजानन महाराजांच्या कृपेने सजल झालेल्या या विहिरीच्या ठिकाणी आज एक सुंदर गजानन महाराज मंदिर उभे आहे.

गजानन महाराजांचे मंदिर

Gajanan Maharaj Shegaon येथे विहीर संस्थानातील मंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ आरती केली जाते. येथे येणारे भाविक हे गजानन महाराज अष्टक आणि मंत्रजप करतात. गण गण गणात बोते असा जयघोष करत भक्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात.

मंदिराच्या गाभाऱ्यात गजानन महाराजांची भव्य मूर्ती असून त्याच्या समोर सतत अखंड नंदादीप तेवत असतो.

अध्यात्मिक अनुभूती आणि भक्तांसाठी महत्त्व

या पवित्र ठिकाणी गेल्यावर भाविकांना अतीव शांतता, आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीभाव यांचा अनुभव येतो. गजानन महाराजांच्या कृपेने या विहिरीतले पाणी आजही शुद्ध आणि पवित्र मानले जाते.

अनेक भक्त येथे नित्यनेमाने दर्शनाला येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात.

Gajanan Maharaj
Gajanan Maharaj Shegaon

भक्त निवास आणि पार्किंग

Gajanan Maharaj Shegaon येथे भाविकांसाठी उत्कृष्ट सुविधायुक्त भक्त निवास  आहे. विविध प्रकारचे निवास, जसे की लक्झरी रूम्स आणि सामान्य निवास आहेत. याशिवाय, पार्किंगची प्रशस्त व्यवस्था असून, गाड्यां उपलब्ध आहेत. पार्किंग परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी फ्लोरिंग ब्लॉक्स लावलेले आहेत.

नाश्ता आणि प्रसाद

मंदिर परिसरात वेगवेगळ्या पदार्थांची उपलब्ध आहे. पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, इडली-सांबार, चहा, कॉफी अशा पदार्थांचे दर मापक आहेत. नाश्ता घेताना भाविकांना स्वच्छतेचे भान आणि शिस्तबद्धतेचा अनुभव येतो.

महाप्रसादात पिठल-भाकरी, पुलाव, वरण-भात असे सात्विक अन्न दिले जाते. महाप्रसाद हा गजानन महाराजांचा  आशीर्वाद मानला जातो, त्यामुळे भाविक यचा आवर्जून लाभ घेतात.

स्वच्छता आणि सेवा

मंदिर परिसरात स्वच्छतेचे विशेष पालन होते. स्वयंसेवक विनामूल्य सेवा देत, परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम मनोभावे करतात. भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जाते.

मोफत बस सेवा

मंदिर ट्रस्टतर्फे भक्तांसाठी भक्त निवासातून मंदिरापर्यंत मोफत बस सेवा चालवली जाते. या सेवेमुळे वयोवृद्ध आणि अपंग भक्तांनाही दर्शनाला जाणे सोपे होते.

प्रमुख स्थळे

कृष्णाजीचा मळा: जिथे ब्रह्मगिरी गोसाव्याचा गर्वहरण करण्यात आला, तो परिसर  शांत आणि निसर्गरम्य आहे.

बंकट सदन: स्वामी गजानन महाराज प्रकट झालेल्या जागेचे दर्शन घेणे हे भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. शेगावची यात्रा केवळ धार्मिक नव्हे, तर भावनिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव देणारी असते. श्री गजानन महाराजांचे मंदिर, स्वच्छता, सेवा, यामुळे भक्तांना  समाधान मिळते.

 शेगाव आणि आनंद सागर

Gajanan Maharaj Shegaon नाव ऐकले की दोन गोष्टी लक्षात येतात. प्रथम श्री गजानन महाराजांचे भव्य मंदिर व दुसरे आनंदसागर प्रकल्प.

एकेकाळी लाखो लोकांचे आकर्षण असलेले आनंद सागर गेल्या काही वर्षांपासून  2018 मध्ये ते बंद करण्यात आले.

लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.

आनंद सागर बंद का करण्यात आला?

ते पुन्हा उघडेल का?

आता तिथे काय चालले आहे?

शेगाव यात्रेला सुरुवात

 श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले असता सर्व भक्तांना  त्या ठिकाणची स्वच्छता व टापटीपणा खूप आवडते. शेगावमध्ये राहण्यासाठी भक्त निवास हा उत्तम पर्याय आहे.मंदिराच्या आवारात प्रवेश करताच शांतता आणि स्वच्छता जाणवते. हे सर्व तेथील सेवकांच्या मेहनतीचे फळ आहे. दर्शनानंतर मंदिराच्या महाप्रसादाचा घेतला जातो.

आनंद सागर अनुभव

आनंदसागरमध्ये आता प्रवेश विनामूल्य आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडे.पण  दुपारी ४ नंतर प्रवेश बंद होतो.

अध्यात्मिक केंद्राला भेट द्या

आनंदसागरचा सर्वात खास भाग म्हणजे त्याचे आध्यात्मिक केंद्र.

भारतातील विविध संतांचे पुतळे येथे स्थापित करण्यात आले आहेत, जसे की:

श्री आद्य शंकराचार्य (केरळ)

श्री माणिक प्रभू महाराज (कर्नाटक)

श्री विष्णू तीर्थ (हरियाणा)

त्याच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांची भव्य मूर्ती आहे. आनंदसागरमध्ये सध्या अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत.

गणेश मंदिर व शिव मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. दररोज सुमारे 500-1000 कामगार काम करतात.

Gajanan Maharaj Shegaon
Gajanan Maharaj Shegaon

गणेश मंदिर आणि शिव मंदिर

आध्यात्मिक केंद्रातून बाहेर पडताना वाट गणेश मंदिराकडे जाते. हे मंदिर अतिशय सुंदर असून त्याच्या आजूबाजूला बांधकाम सुरू आहे. गणेश मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावर शिवमंदिर आहे. शिवमंदिराच्या शेजारी महादेवाची भव्य मूर्ती असून ती अतिशय आकर्षक आहे. 2016-17 मध्ये जेव्हा आनंद सागर पूर्णपणे उघडले होते, तेव्हा ही जागा माणसांनी  भरलेली होती.

इथली मिनी ट्रेन (आनंदसागर एक्सप्रेस) संपूर्ण कॉम्प्लेक्सची फेरफटका मारते.

हलते पुल आणि लाईट शो लहान मुले आणि मोठ्यांना खूप आवडतात.  लहान मुलांसाठी कारंजे आणि राइड्स हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे.

आता हे सर्व थांबले आहे. पण येत्या काही दिवसांत हे सर्व पुन्हा सुरू होईल, अशी आशा आहे. बांधकाम पूर्ण होत असल्याने प्रशासन काही नवीन आकर्षणे जोडू शकते.

मुलांसाठी नवीन राइड्स.

खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि कॅफे.

पर्यटकांसाठी उत्तम सुविधा.

Gajanan Maharaj Shegaon विशेष काय?

श्री गजानन महाराज मंदिर : हे ठिकाण भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.

आनंद सागर : नैसर्गिक सौंदर्य आणि अध्यात्म यांचा संगम.

भक्त निवास: राहण्यासाठी परवडणारे आणि आरामदायी ठिकाण.

मोफत बस सेवा: भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग.

आनंद सागर यांचे भविष्य

कोविड आणि इतर कारणांमुळे आनंद सागर बराच काळ बंद होता.

पण आता परिस्थिती बदलत आहे.

प्रशासनाने लवकरात लवकर प्रयत्न केला म्हणून आनंदसागर आता चालू झाले आहे.

हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर लाखो लोकांच्या आठवणी आणि भावनांचा एक भाग आहे.सकाळी दर्शनासाठी जा गर्दी कमी असते. आनंद सागरला भेट द्यायलाच पाहिजे जरी ते पूर्णपणे कार्यरत नसले तरी, आध्यात्मिक केंद्र आणि मंदिर पाहण्यासारखे आहे.

गजानन महाराज मंदिर विकिपीडिया माहिती – Open

समारोप

शेगाव हे फक्त एक ठिकाण नाही, तर तो एक अनुभव आहे.

इथली प्रत्येक गोष्ट, मग ते गजानन महाराज मंदिर असो किंवा आनंदसागर, तुम्हाला शांती देते.

शेगाव अजून पाहिले नसेल तर एकदा नक्की जा.

आनंद सागरचे पूर्ण उद्घाटन झाल्यावर हे ठिकाण आणखीनच खास झाले आहे

श्री गजानन महाराज आरती

श्री गजानन महाराजांचे जीवन हे भक्तांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!

|| गण गण गणात बोते ||

येथून शेअर करा

Leave a Comment