Bandhkam Kamgar Yojana : बांधकाम कामगारांसाठी 2025 मधील मोठी घोषणा 1 रुपया मधे मिळतील इतके फायदे जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे

नमस्कार , आपल्याला माहिती आहे की सरकारकडून अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या फायदेशीर योजना राबविण्यात येत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे Bandhkam Kamgar Yojana बांधकाम कामगार योजना. 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने एक मोठी ऐतिहासिक घोषणा केली आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम कामगारांसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. ज्यामुळे त्यांच्या रोजच्या जीवनमानात मोठी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना योग्य नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे देऊन अर्ज करणे गरजेचे आहे.

आता 2025 मध्ये आलेल्या नवीन नियमानुसार बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाइन करण्याची प्रक्रिया बदलली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या” (MAHA BOCW) अंतर्गत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.चला तर मग आज या लेखात जाणून घेऊया नक्की काय आहे ही बांधकाम कामगार योजना या अंतर्गत बांधकाम कामगारांना कोणकोणत्या सुविधांचा लाभ मिळणार आहे , कोणकोणते फायदे त्यांना मिळणार आहेत , त्यासाठी अर्ज कसा करायचा , कुठे करायचा , या सर्वांची सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Bandhkam Kamgar Yojana काय आहे शासन निर्णय ?

बांधकाम कामगारांना फक्त 1 रुपया मध्ये 1.सामाजिक , 2.शैक्षणिकतीस 3. आरोग्य विषयक 4. आर्थिक इत्यादी मदत केली जाणार आहे.यात केवळ 1 रुपया मधे भांड्यांचा संच मोफत दिला जात आहे , सुरक्षा विमा ,तसेच घरकुलासाठी चार लाख रुपये , दवाखान्यासाठी पाच लाख रुपये, बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मुले पहिले ते पूर्ण ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत अडीच हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे अशी घोषणा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


Bandhkam Kamgar Yojana
Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगारांना कोणत्या योजनांचा लाभ घेता येईल ?


महाराष्ट्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे बांधकाम कामगारांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, व आर्थिक सहकार्य केले जाणार आहे यामध्ये घरकुल योजना विमा योजना शिष्यवृत्ती योजना मोफत भांड्यांचा संच पहिल्या त्याच्या विवाह साठी मदत इत्यादी योजनांचा समावेश आहे.

  1. घरकुल मदत : अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत ज्यांना स्वतःचे घर नाही त्यांना चार लाख रुपये मिळणार आहेत यामध्ये दोन लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळतील व अटल कामगार आवास योजने मधून दोन लाख असे एकूण चार लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
  2. आरोग्य विमा : बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला दवाखान्याचा खर्च फ्री मध्ये मिळवण्यासाठी पाच लाख रुपये दिले जाणार आहेत.*. नैसर्गिक प्रसुतीसाठी 15 हजार रुपये .शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी 20000 रुपये . *गंभीर आजाराच्या उपचाराकरिता एक लाख रुपये कामगार किंवा त्यांच्या कुटुंबीयांना 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास अशा कामगारांना दोन लाख रुपये दिले जातील.* तसेच मोफत आरोग्य तपासणी करणे व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अशा योजनांचा देखील यामध्ये समावेश आहे. या सर्व योजनांबद्दल अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी लागणारे कागदपत्र जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (महा बी ओ सी डब्ल्यू) (MAHA BOCW) या संकेतस्थळावर जाऊन भेट दिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.
  3. सामाजिक सुरक्षा योजनेमधून पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पूर्ततेसाठी 30 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच मध्यान्य भोजन योजना प्रधानमंत्री योगी मानधन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच पूर्ण शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना इत्यादींचा यामध्ये समावेश आहे.
  4. शैक्षणिक योजना : यामध्ये सर्व नोंदणी बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी या योजना लागू आहेत. (1)इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षासाठी अडीच हजार रुपये तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष पाच हजार रुपये दिले जातील. यासाठी अट किमान 75 टक्के अथवा अधिक उपस्थिती मुलांचे शाळेमध्ये असायला हवी.(2) इयत्ता 10 व बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास अशा मुलांना दहा हजार रुपये देण्यात येतील.(3)पदवी अभ्यास क्रमांक साठी प्रत्येक वर्षासाठी वीस हजार रुपये दिले जातील.(4) वैद्यकीय पदवी करता प्रतिवर्ष एक लाख रुपये तसेच अभियांत्रिकी पदवीकरता प्रतिवर्षी साठ हजार रुपये स्कॉलरशिप भरता शासनमान्य पदविकेसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षाला वीस हजार रुपये दिले जातील तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना (एम एस सी आय टी )(MS CIT)शिक्षणाच्या पुरती करिता देखील भत्ता मिळेल.
  5. आर्थिक मदत : (1) बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये कायदेशीर पद्धतीने वारसास मिळतील.(2) कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये अटल कामगार योजनेअंतर्गत शहरी भागासाठी दोन लाख रुपये तसेच ग्रामीण अर्थसाह्य म्हणून दोन लाख रुपये दिले जाणार आहेत.(3) कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करताना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत कामगाराचे वय 50 ते 60 च्या दरम्यान कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विदुर पतीस 24 हजार रुपये पाच वर्षाकरिता देण्यात येणार आहेत.

अर्ज कसा करावा व लागणारी कागदपत्रे ?

Bandhkam Kamgar Yojana बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी प्रक्रिया सोपी असून त्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे.

  1. आधार कार्ड
  2. मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असावा
  3. 90 दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र
  4. बँक खात्याची माहिती
  5. राशन कार्ड
  6. पासपोर्ट साईज फोटो 3

Bandhkam Kamgar Yojana online form pdf
Bandhkam Kamgar Yojana

90 दिवस काम केल्याच्या सर्टिफिकेट कुठून घ्यायचे ?

Bandhkam Kamgar Yojana बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला 90 दिवसाच्या कामाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म डाऊनलोड करावा लागेल त्यानंतर 90 दिवसाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल यामध्ये कामाच्या ठिकाणाचे तपशील ठेकेदाराचे नाव इत्यादी माहिती भरावी लागते यासाठी लागणारा अर्ज pdf खाली दिला आहे.

तालुका सुविधा केंद्रात नोंदणी प्रक्रिया

तालुका सुविधा केंद्रात नोंदणी करतांना, खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • सर्व कागदपत्रे ओरिजिनल स्वरूपात हवी आहेत. झेरॉक्स स्वीकारले जाणार नाही.
  • तुमचे मोबाईल नंबर चालू असावा लागेल. कारण, नोंदणी करत असताना तुमच्या आधार कार्डवरील मोबाईल नंबरसाठी एक OTP पाठवला जाईल.
  • फॉर्म भरण्यानंतर, तुमचे फोटो व अंगठा ठसा घेतला जाईल.

तालुका सुविधा केंद्र: कुठे शोधाल?

तुम्हाला नोंदणीसाठी तालुका सुविधा केंद्र शोधण्याची आवश्यकता आहे. यासाठी, मंडळाच्या वेबसाइटवर जाऊन “संपर्क” या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर एक नवा पेज ओपन होईल, जिथे 350 तालुका सुविधा केंद्रांची यादी दिली आहे. यादी डाउनलोड करून तुमच्या तालुक्यातील केंद्राचा तपशील घेऊ शकता.

योजनेसाठी नोंदणी कशी करावी ?

Bandhkam Kamgar Yojana नोंदणी करण्यासाठी कामगारांना(OPEN) या संकेस्थळावर भेट द्यावी लागेल.यामध्ये त्यांना त्यांच्या सर्व वैयक्तिक माहिती कागदपत्र भरून सबमिट करणे गरजेचे आहे त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र आणि इतर फायदे मिळण्यास सुरुवात होईल.

Bandhkam Kamgar Yojana अर्ज प्रक्रिया

अर्ज सुरू करण्यासाठी कामगारांना आपली जन्मतारीख आधार नंबर मोबाईल नंबर व इतर आवश्यक माहिती भरून नंतर अर्जाच्या पुढील टप्प्यावर कामगारांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती भरावी लागेल तसेच कामाचे स्वरूप व त्यांच्या व्यवसायाचा तपशील पूर्णपणे भरावा लागेल.

Bandhkam Kamgar Yojana अर्जाची पडताळणी आणि अपॉइंटमेंट:

अर्ज भरल्यानंतर कामगारांना पडताळणी केंद्र निवडून कशी तपासणी करणे गरजेचे आहे यासाठी कामगारांनी आपण निवडलेल्या पडताळणी केंद्रात जाऊन दिलेल्या तारखेला हजर राहून कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे पडताळणी कोणत्या दिवशी उपलब्ध आहे हे देखील आपल्याला ऑनलाइन पाहता येते.

अर्ज जमा करणे आणि अपॉइंटमेंट लेटर कसे मिळवावे :

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर अर्जदाराला ओटीपी येतो जो त्यांच्या मोबाईलवर येतो म्हणून आपल्या मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे आलेला ओटीपी एंटर केल्यानंतर अर्ज सर्व केला जातो आणि एक acknowledgement number दिला जातो या नंबरचा वापर करून कामगार अपॉइंटमेंट लेटर डाऊनलोड करू शकतात.

कागदपत्रांची तपासणी आणि फायनल प्रक्रिया :

अर्ज स्वीकारल्यानंतर संबंधित अधिकारी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करतात व सर्व माहिती योग्य अचूक आहे की नाही हे पाहून कामगाराची नोंदणी पूर्ण केली जाते कामगारांना त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र व इतर लाभ योजनांमध्ये सहभागी होण्याचा लाभ मिळतो.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल : पोस्ट ऑफिस आरडी स्कीम गुंतवणुकीचा उत्तम पर्याय (OPEN)

महत्त्वाची सूचना :

  • नोंदणी फॉर्ममध्ये योग्य माहिती भरा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
  • नोंदणी करताना कोणत्याही समस्या येत असतील तर खाली कमेंट मध्ये आपले प्रश्न नक्की विचारा.
  • अर्ज सादर करताना सर्व माहिती व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.

Bandhkam Kamgar Yojana नोंदणी 2025 ची नवीन प्रक्रिया अत्यंत सोपी व सोयीस्कर करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेचा फायदा घेण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या कागदपत्रांची तयारी केली पाहिजे आणि ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. त्यामुळे त्यांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळू शकेल.


Bandhkam Kamgar Yojana
Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगार योजने बद्दल विकिपीडिया वरील संपूर्ण माहिती इथे वाचा

Bandhkam Kamgar Yojana साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

1. Bandhkam Kamgar Yojana काय आहे?
बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या मदतीचे प्रावधान आहे जसे की, घरकुल योजना, शिष्यवृत्ती, मेडिकल मदत, कौशल्य प्रशिक्षण आणि इतर फायदे.

2.Bandhkam Kamgar Yojana या योजनेचा लाभ कसा मिळवू शकतो?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतर, कामगारांना विविध योजना आणि मदतीचा लाभ मिळू शकतो.

3. कोणत्या योजनांचा लाभ मिळवू शकतो?
या योजनेतील प्रमुख योजनांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • घरकुल योजना: घर नसलेल्या कामगारांना 4 लाख रुपयांची मदत.
  • शिष्यवृत्ती योजना: कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या.
  • मेडिकल मदत: कुटुंबासाठी 5 लाख रुपयांपर्यंत उपचार खर्च.
  • विमा योजना: अपघात किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत.

4. Bandhkam Kamgar Yojana नोंदणी करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?
नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रांची आवश्यकता असेल:

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • 90 दिवसांचा काम प्रमाणपत्र
  • बँक खात्याची माहिती

5.Bandhkam Kamgar Yojana नोंदणी कशी करावी?
नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला open वेबसाईटवर जाऊन नोंदणी फॉर्म भरावा लागेल. यामध्ये तुमचं वैयक्तिक माहिती, कागदपत्रे आणि इतर आवश्यक माहिती भरून सबमिट करणे आवश्यक आहे.

6. Bandhkam Kamgar Yojana नोंदणी करण्यासाठी किती वेळ लागतो?
नोंदणी प्रक्रिया साधारणतः 15 ते 20 मिनिटांची असू शकते. यामध्ये तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती भरली जाते.

7. Bandhkam Kamgar Yojana चा लाभ मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?
नोंदणी केल्यानंतर, संबंधित लाभ मिळवण्यासाठी किमान 15 ते 30 दिवस लागू शकतात. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यावर, कामगारांना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मदतीची रक्कम किंवा इतर लाभ प्राप्त होऊ शकतात.

8. शिष्यवृत्तीसाठी पात्रता काय आहे?
शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला शाळेतील 75% उपस्थिती आणि शालेय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. तसेच, दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत 50% पेक्षा अधिक गुण मिळवले असल्यास, तुम्हाला अतिरिक्त मदत मिळू शकते.

9. घरकुल योजनेसाठी पात्रता काय आहे?
घरकुल योजनेसाठी, ज्या बांधकाम कामगारांकडे स्वतःचे घर नाही, त्यांना प्रधानमंत्री आवास योजना आणि अटल आवास योजनेतून 4 लाख रुपयांची मदत मिळेल.

10. अपघात किंवा मृत्यू झाल्यास कशी मदत मिळवू शकते?
योजना अंतर्गत, अपघात झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाईल. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांची मदत मिळेल.

11. कौशल्य प्रशिक्षण कशासाठी दिलं जातं?
कौशल्य प्रशिक्षण कामगारांना विविध कामांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी दिलं जातं. यामुळे कामगार अधिक सक्षम होतील आणि त्यांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील.

12. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
तुम्हाला महाOCWIN वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रांची माहिती सादर करावी लागेल.

13. योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कधीपर्यंत करावी?
नोंदणी करण्याची अंतिम तारीख नाही, परंतु लवकर नोंदणी केल्याने आपल्याला योजनेचा जलद लाभ मिळू शकतो.

14. कायदा व नियम काय आहेत?
बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवण्यासाठी एक कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, कामगारांची नोंदणी अनिवार्य आहे आणि त्यांना योजनेतील लाभ मिळवण्यासाठी योगदान द्यावे लागते.

15. Bandhkam Kamgar Yojanaतून कोणते फायदे मिळतात?
योजनेतून कामगारांना आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, विमा, कौशल्य प्रशिक्षण, घरकुल मदत आणि अन्य विविध फायदे मिळतात

तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास, कृपया कंमेंट करा किंवा आमच्याशी संपर्क साधा.जर तुम्हाला हा लेख उपयोगी वाटला असेल तर कृपया दुसऱ्या बांधकाम कामगारांना देखील ही माहिती शेअर करा.

धन्यवाद! 🙏


येथून शेअर करा

1 thought on “Bandhkam Kamgar Yojana : बांधकाम कामगारांसाठी 2025 मधील मोठी घोषणा 1 रुपया मधे मिळतील इतके फायदे जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे”

Leave a Comment