Maza Ladka Bhau Yojana 2024:महाराष्ट्र सरकार बेरोजगार युवकांना देणार १०००० रुपये प्रती महिना,असा करा अर्ज

महाराष्ट्र सरकारने नुकतीच लाडकी बहिण योजना जाहीर करून राज्यातील महिलांना आर्थिक सक्षमीकरण व्हावे तसेच त्या आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी व्हाव्या यासाठी लाडकी बहिण योजना अंतर्गत १५०० रुपये प्रती महिना देण्याचे घोषित केली आहे .नुकताच पार पडलेल्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने अनेक घोषणाचा पाऊस पाडला आहे. त्यातच भर म्हणून लाडकी बहिण योजने नंतर आता लाडका भाऊ योजना देखील जाहीर केली आहे. Maza Ladka Bhau Yojana 2024 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण तसेच महिना १०००० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.काय आहे नेमकी हि योजना,कोण कोण यासाठी पात्र आहे,शिक्षणानुसार मिळणारा भत्ता किती असेल ,onlineअर्ज कसा करायचा,लागणारे कागदपत्र याबद्दलची संपूर्ण माहिती आंपण या लेखात जाणून घेऊया .


Table of Contents

Maza Ladka Bhau Yojana काय आहे ही योजना ?

Maza Ladka Bhau Yojana महाराष्ट्र सरकारने सुशिक्षित बेरोजगार युवकांना सहाय्य म्हणून व त्यांना आर्थिक माज्बुजी व्हावी म्हणून एक महत्योवाची योजना घोषित केली आहे, जी आहे “मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना 2024”. ही योजना,तरुण युवकांना आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सुरू केली गेली आहे. या योजनेच्या माध्यमातून, 12वीं पास युवकांपासून ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट युवकांना प्रतिमहिन्याला आर्थिक मदत मिळणार आहे.कोणाला किती आर्थिक मदत मिळेल याबद्दल खाली आपण सविस्तर पाहू .


Maza Ladka Bhau Yojana

Maza Ladka Bhau Yojana ची उद्दीष्टे काय आहेत ?

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे बेरोजगार युवकांना रोजगार मिळवण्यासाठी गरजेचे आहे त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना उभा करणे . या योजनेअंतर्गत, युवकांना त्यांच्या करियरला सुरुवात करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यासाठी आर्थिक सहाय्य देखील केले जाईल.

Maza Ladka Bhau Yojana पात्रता काय आहे ?

योजनेचे नाव “मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना 2024”
वयाची मर्यादा 18 ते 35 वर्षांदरम्यान.
शिक्षणाची पात्रता किमान 12वीं पास,आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट.
अटीमहाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा बेरोजगार असावा .
Maza Ladka Bhau Yojana

किती आर्थिक सहाय्य मिळणार ?

  • 12वीं पास असाल तर : प्रत्येक महिन्याला ₹6,000.
  • आयटीआय किंवा डिप्लोमा झाला असेल तर : प्रत्येक महिन्याला ₹8,000.
  • ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएटअसाल तर : प्रत्येक महिन्याला ₹10,000.

Maza Ladka Bhau Yojana प्रशिक्षण आणि इंटर्नशिप

या Maza Ladka Bhau Yojana अंतर्गत, युवकांना त्यांच्या नजीकच्या उद्योगांमध्ये किंवा स्टार्टअप्समध्ये 6 महिन्यांची इंटर्नशिप करावी लागेल. या इंटर्नशिपद्वारे, युवकांना व्यावसायिक कौशल्ये शिकता येतील आणि त्यानंतर योजनेद्वारे आर्थिक मदत प्राप्त होईल.


Maza Ladka Bhau Yojana

Maza Ladka Bhau Yojana आवश्यक कागदपत्रे ?

  1. आधार कार्ड
  2. महाराष्ट्राचा निवासी प्रमाणपत्र
  3. उत्पन्न दाखला
  4. शैक्षणिक प्रमाणपत्र
  5. मोबाइल नंबर
  6. पासपोर्ट साइज फोटो
  7. बँक खात्याची पासबुक

ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा ?

  • अधिकृत लिंक mahaswayam.gov.in या वर जाऊन फॉर्म भरा.

महत्वाचे सूचना

  • Maza Ladka Bhau Yojana योजना अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे भरायचे नाहीत .
  • फॉर्म भरण्याच्या सर्व प्रक्रियेसाठी सरकारी लिंक चाच वापर करा.
  • आवश्यक कागदपत्रांची योग्य माहिती आणि स्कॅन केलेले फोटोकॉपी द्या.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप इथे वाचा

1.Maza Ladka Bhau Yojana या योजनेचा ऑनलाइन फॉर्म घरी बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल वरून भरू शकता त्याकरिता या ठिकाणी दिलेली लिंक ओपन करावी(https://mahaswayam.gov.in)किंवा रोजगार.महास्वयम (rojgar.mahaswayam.gov.in)या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकता.

आता दिलेली लिंक ओपन झाल्यानंतर, ओपन झालेला पेज वरती तुम्हाला “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजना असे दिसेल कंसात असेल (CMYKPY) हे या योजनेचे अधिकृत नाव आहे.यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला एक पीडीएफ दिसेल यामध्ये योजनेची पूर्ण माहिती लिहिलेली आहे. पूर्ण माहिती नीट वाचून घ्या. कोणत्या कोर्स साठी किती प्रतिमा वेतन मिळणार आहे त्याबद्दलची देखील पूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल जसे की बारावी पास असणाऱ्यांसाठी सहा हजार रुपये प्रतिमा आयटीआय किंवा पदविका यांच्यासाठी आठ हजार रुपये प्रति महिना पदवीधर किंवा पदव्युत्तर यांच्याकरिता दहा हजार रुपये प्रति महिना. ही पूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर.

  1. पुन्हा मुख्य पेज वरती येऊन नोंदणी असा ऑप्शन तुम्हाला समोर दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे. या ठिकाणी तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
  2. यामध्ये तुमचे पहिले नाव म्हणजे स्वतःचे नाव आडनाव मिडल नाव म्हणजे वडिलांचे नाव जन्मतारीख डे मंथ इयर म्हणजे जन्मदिवस महिना आणि जन्म वर्ष असे करून भरावे.
  3. त्या ठिकाणी चौकोन जे दिसत आहेत ज्यामध्ये लिहिले आहे आय हॅव लास्ट नेम इन आधार कार्ड त्यावर देखील तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  4. यानंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचे आहे आणि नंतर आधार कार्ड नंबर, आधार कार्ड ला लिंक असणारा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्या ठिकाणी कॅपचा captcha असे लिहिलेले दिसेल व काही अक्षरे त्या ठिकाणी लिहिलेली दिसतील ती त्याखालील कॅपच्या कोड मध्ये जशीच्या तशी पाहून टाईप करायची आहेत.
  5. पूर्ण माहिती एक वेळा वाचा व माहिती चेक केल्यानंतर Next या बटनावर क्लिक करावे.
  6. आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईल नंबर वरती तुम्हाला एक ओटीपी OTP येईल तो आपल्याला प्लीज एंटर ओटीपी या ठिकाणी तो टाकून कन्फर्म या बटणावर क्लिक करायचे आहे.
  7. आता या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती विचारलेली आहे यामध्ये पुन्हा आपले पहिले नाव मिडल नाव आडनाव आईचे नाव जन्मतारीख या पद्धतीने विचारलेली माहिती पूर्णपणे भरावी.
  8. खाली आल्यानंतर देश राज्य इंडिया महाराष्ट्र असा सिलेक्ट करावे व जिल्हा आपला सिलेक्ट करावा त्यानंतर तालुका शहर आपली मातृभाषा व पत्ता पत्ता टाकून पिन कोड टाका.
  9. राष्ट्रीयत्व इंडियन धर्म वैवाहिक स्थिती जात प्रवर्ग उपजात पोटजात हे सर्व भरून अर्ज पूर्ण करा
  10. आता या ठिकाणी खाली स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का? होय नाही यापैकी होय वरती क्लिक करावे.
  11. त्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला आपले कॉलिफिकेशन डिटेल्स विचारले आहेत यामध्ये शैक्षणिक आपली पात्रता प्रवाह stream म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट जेही असेल ते भरायचे यानंतर खाली एच.एस.सी,एस.एस.सी.,डिप्लोमा ग्रॅज्युएशन जेही झाले असेल ते त्या ठिकाणी भरावे. स्कोरिंग प्रकार उत्तीर्ण वर्ष टक्केवारी इत्यादी सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.
  12. यामध्ये जाणून घ्या की ज्या ठिकाणी लाल रंगाचे स्टार आहेत त्या ठिकाणची माहिती भरणे गरजेचे आहे ज्या ठिकाणी लाल रंगाचे स्टार नाहीत त्या ठिकाणची माहिती नाही भरली तरी चालेल.
  13. सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली आपला पासवर्ड तयार करायचा आहे तुमचे नाव टाकून वन टू थ्री करू शकता किंवा वेगळा पासवर्ड तुम्ही सेट करू शकता.
  14. तोच पासवर्ड पुन्हा एकदा खाली टाकून घ्यायचा. आणि पूर्ण माहिती पुन्हा एकदा वाचून तपासणी करून “खाते तयार करा” या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  15. आता रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाले असं आपल्याला दिसेल. आता ओके या बटणावर क्लिक करून पुन्हा नवीन पेजवर या.
  16. आता या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या खाते तयार झाले आहेत तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही सेट केला पासवर्ड टाकावा आणि आता तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करू शकता.
  17. लॉगिन झाल्यावर पुढे संपादित करा असा ऑप्शन दिसेल या ठिकाणी आपण आपली माहिती एडिट करू शकतो.
  18. यामध्ये शैक्षणिक माहिती कामाचा अनुभव इतर तपशील इत्यादी ऑप्शन दिसतील त्यामध्ये जाऊन आपली माहिती भरायची आहे.
  19. तुमचा आयटीआय चा कोर्स झाला असेल तर Add मध्ये जाऊन आपली माहिती भरू शकता.
  20. जसे जसे ऑप्शन वाचाल तुम्हाला माहिती भरायचे समजेल. तरीही माहिती भरताना कोणती अडचण येत असेल तर कमेंट मध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता.
  21. कोणती माहिती भरायची असेल तर Add मध्ये जाऊन भरू शकता किंवा चुकीची माहिती भरली गेली असेल तर Edit मध्ये जाऊन ती डिलीट करू शकता.
  22. तुमचा कामाचा अनुभव जर काही असेल तर तो देखील तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता.
  23. इतर तपशील मध्ये जाऊन तुम्हाला येणाऱ्या भाषा व इतर माहिती पूर्ण सर्व भरू शकता.
  24. खाली बँकेचे डिटेल विचारले आहेत ती माहिती पूर्ण भरणे आवश्यक आहे. ही माहिती न चुकता व्यवस्थित भरावी. यासाठी आपला नंबर आधार कार्ड सोबत जोडलेला असावा.
  25. खाली काही डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले आहे जसे डोमिसाईल सर्टिफिकेट एज्युकेशन सर्टिफिकेट तर हे आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून देखील पीडीएफ बनवून आपण या ठिकाणी choose file वरती जाऊन अपलोड करू शकतो.
  26. सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एक वेळा पूर्ण माहिती चेक करा आणि पुढे “सुधारणा”ऑप्शन आहे यावरती क्लिक करा.
  27. आता आपली माहिती सक्सेसफुली भरली गेलेली आपल्याला दिसेल.
  28. आता मुख्य पेज वरती आपले प्रोफाइल तयार झालेले आपल्याला दिसेल यामध्ये upload profile image असा ऑप्शन येईल त्यामध्ये आपण आपला फोटो देखील ऍड करू शकतो.
  29. Brows या ऑप्शनवर जाऊन तुमचा Resume असेल तर तो अपलोड करू शकता. रिझ्युम सक्सेसफुली ऍड झाल्यानंतर ओके या बटणावर क्लिक करावे.
  30. आता मुख्य पेज वरती माझे प्रोफाइल यावरती क्लिक कराल तर तुम्हाला तुमचे Employment Card असे दिसेल. त्याला तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आणि प्रिंट काढू शकता.
  31. आणि या प्रिंटला घेऊन तुम्ही ज्या ठिकाणी रोजगार मेळावा असेल त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करण्यासाठी जाऊ शकता.
  32. याव्यतिरिक्त अजून कोणती अडचणीत असेल तर खाली तुम्ही प्रश्न विचारू शकता.

Maza Ladka Bhau Yojana

निष्कर्ष

मुख्यमंत्री Maza Ladka Bhau Yojana 2024 ही एक नवीनतम आणि सुशिक्षित तरुणांना रोज्गारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आहे. यामुळे युवांना रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण देण्यात येईल . योग्य पात्रतेसह आणि आवश्यक कागदपत्रांसह योग्य प्रकारे फॉर्म भरून, युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे त्यांना भविष्याकडे एक सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त होईल आणि रोजगाराच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलता येईल.व हि तरुण पिढी आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम होईल याच उद्देशाने या सरकारने हा निर्णय घेतला आहे .


Maza Ladka Bhau Yojana

माझा लाडका भाऊ योजना 2024: सतत विचारले जाणारे प्रश्न

1. माझा लाडका भाऊ योजना 2024 म्हणजे काय?

Maza Ladka Bhau Yojana माझा लाडका भाऊ योजना 2024 ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे जी युवकांना इंटर्नशिप आणि प्रशिक्षणादरम्यान आर्थिक सहाय्य प्रदान करते. याचा मुख्य उद्दिष्ट बेरोजगार युवांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीस मदत करणे हा आहे.

2. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे?

Maza Ladka Bhau Yojana या योजनेचा मुख्य उद्दिष्ट बेरोजगार युवांना प्रशिक्षण आणि कामाचा अनुभव देऊन त्यांना रोजगाराच्या संधीउपलब्ध करून देणे आहे. तसेच, योजनेच्या अंतर्गत युवांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे .

3. या योजनेत कोणाला किती आर्थिक सहाय्य मिळेल ?

  • 12वीं पास युवांना: ₹6,000 प्रति महिना.
  • आयटीआय किंवा डिप्लोमा धारकांना: ₹8,000 प्रति महिना.
  • ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट युवांना: ₹10,000 प्रति महिना.

4. या योजनेसाठी पात्रता निकष काय आहे?

  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • किमान शैक्षणिक 12वींपास असावे. आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्रीसुद्धा चालेल .
  • अर्जदार बेरोजगार असावा.
  • अर्मजदार महाराष्ट्राचा स्थायी निवासी किंवा रहिवासी असावा.

5. अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?

अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र निवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर आधार लिंक असणारा
  • पासपोर्ट साइज फोटो
  • बँक खात्याची पासबुक

6. या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

अर्कज करण्यासाठी खालील स्टेप्स पहा

  1. महाराष्ट्र सरकारच्या रोजगार पोर्टल mahaswayam.gov.in वर जा.
  2. पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा आणि आवश्यक माहिती भरा.
  3. फॉर्म भरा आणि सर्व कागदपत्र अपलोड करा.
  4. सबमिशन नंतर, तुम्हाला एक पावती मिळेल.त्यालाच इम्पोयी कार्ड म्हणतात .

7. अर्ज करण्यासाठी कोणते शुल्क आहे का?

नाही, या योजनेसाठी अर्ज करणे पूर्ण पणे मोफत आहे . कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

8. या योजनेच्या अंतर्गत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील इंटर्नशिपची संधी मिळते का?

होय, Maza Ladka Bhau Yojana या योजनेच्या अंतर्गत सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपच्या संधी दिल्या जातात.

9. योजना अंतर्गत प्रशिक्षणानंतर काय लाभ मिळतात?

प्रशिक्षणाच्या दरम्यान मिळालेला अनुभव आणि आर्थिक सहाय्य युवकांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीस मदत करते. प्रशिक्षणानंतर, युवांना स्व रोजगाराच्या संधी देखील मिळवता येऊ शकतात.

10. रजिस्ट्रेशन नंतर आणखी कोणती प्रक्रिया आहे का?

रजिस्ट्रेशन आणि अर्ज केल्या नंतर, तुम्हाला इंटर्नशिपसाठी निवडल्या गेल्यावर संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. योजनेच्या अंतर्गत सर्व आवश्यक निर्देश तुम्हाला ऑनलाइन पोर्टलवर मिळतील.

11. आवेदन करण्यात काही अडचण आली तर मदतीसाठी कुणाशी संपर्क साधू शकतो का?

होय, अर्ज करण्यामध्ये अडचण आल्यास, तुम्ही पोर्टलवर उपलब्ध हेल्पलाइन किंवा सहाय्य केंद्राशी संपर्क साधू शकता. तसेच, तुमच्या समस्यांचा उल्लेख करून तुम्ही टिप्पणी करू शकता आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत प्राप्त करू शकता.

12. योजनेची कालावधी निश्चित आहे का?

Maza Ladka Bhau Yojana या योजनेच्या अंतर्गत इंटर्नशिप 6 महिन्यांची असते. या दरम्यान, युवांना प्रशिक्षण दिले जाते आणि आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.


याशिवाय इतर योजना तसेच मनोरंजन विश्व धार्मिक माहिती साठी खाली वाचू

लाडकी बहिण योजना २०२४ संपूर्ण माहिती अर्ज करावा हे इथे वाचा (https://digitalcronies.com/ladki-bahin-yojana/)

बळीराजा मोफत वीज बिल योजना २०२४ (https://digitalcronies.com/mukhyamantri-baliraja-mofat-vij-yojana/)

मनोरंज विश्वासाठी इथे वाचा (https://digitalcronies.com/big-boss-marathi-season-5/)

तुम्हाला अध्यात्मिक वाचायला आवडेल ? इथे वाचा (https://digitalcronies.com/category/spiritual/)

येथून शेअर करा

11 thoughts on “Maza Ladka Bhau Yojana 2024:महाराष्ट्र सरकार बेरोजगार युवकांना देणार १०००० रुपये प्रती महिना,असा करा अर्ज”

  1. Pingback: PM Vishwakarma Yojana

  2. Pingback: Annapurna Yojana 2024

  3. Pingback: Kaal Bhairav Jayanti 2024

  4. Pingback: Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti

  5. Pingback: Gurucharitra granth Information Marathi

  6. Pingback: Datta jayanti information Marathi

  7. Pingback: Ladki bahin yojana maharashtra

  8. Pingback: Ladki bahin Yojana update

  9. Pingback: Mukhyamantri vayoshri yojana

  10. Pingback: Post Office RD Scheme

  11. Pingback: Pm Internship Yojana 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top