पुढील 5 वर्ष शेतकर्यांना मिळणार मोफत वीज |Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana: 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज मोफत या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ? जाणून घ्या अधिक माहिती इथे.राज्यातील शेतकऱ्यासाठी एक दिलासा देणारी आनंदाची बातमी आहे. निवडणुकीच्या अगोदर जणू योजनांचा पाऊस व्हावा तशी महाराष्ट्र राज्य सरकारने आताच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये काही योजनांची घोषणा केली आहे.यामधे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणाले की “शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगिकरण आणि सौर उर्जाकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे.शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्या शेतकर्यांना सौरपंप या योजने साठी 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे ”असे त्यांनी सांगितले .

या जीआर मधे पुढे जाहीर केले आहे की “सध्या महाराष्ट्रात मार्च 2024 अखेर 44.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक शेतकरी आहेत.या सर्व शेतकरी ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीजपुरवठा करण्यात येईल.एकूण वीज वापरापैकी 30% वीज ही कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. त्यामुळे राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10/8 किंवा दिवसा 8 तास थ्री फेज वजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.शेतकर्यांना विजेचा पुरवठा सुरळीत व्हावा तसेच यात सवलत मिळावी म्हणून अशा अजून अनेक योजनांचा विचार या अधिवेशनात करण्यात आला आहे .अशा पद्धतीचा GR समोर आला आहे .

आता येणाऱ्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागतील त्याचीच तयारी म्हणून की काय मध्यप्रदेश सरकारने जशी लाडली बेहना योजना राबवून जी रणनीती वापरली तीच रणनीती महाराष्ट्र युती सरकार वापरत असल्याचे दिसत आहे.निवडणुकांच्या अगोदर वेग वेगळ्या योजनांच्या घोषणा करून एकप्रकारे जनतेला भुरळ च पाडली आहे. शेतकऱ्याला नेहमीच लाईट च्या वेळा पाळणे, रात्र पाळीने ने पिकांना पाणी देणे ,लाईट बिल, पिकांचे होणारे नुकसान,सतत बदलणारे वातावरण,मालाला मिळणार भाव अशा अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते त्यातच एक थोडा दिलासा म्हणून या योजनेकडे पाहिले जाईल.


Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024

योजनेच नाव मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना २०२४
योजनेचा कालावधी एप्रिल 2024 ते मार्च 2029
पात्रता 7.5 एच.पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा
कोण अपात्र असेल 7.5 एच.पी पेक्षा अधिक क्षमता असणा पंप धारक
अर्ज करण्याची पद्धत Online ( Apply Here )
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024

सरकारचा नविन जीआर जाहीर. 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज मोफत या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ? जाणून घ्या अधिक माहिती इथे…


या जीआर मधे पुढे जाहीर केले आहे की “महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 44.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत.या सर्व ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीजपुरवठा करण्यात येईल.एकूण वीज वापरापैकी 30% वीज ही कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते.राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10/8 किंवा दिवसा 8 तास थ्री फेज वजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.”


Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana

शासन निर्णय | Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana

भारतातील शेती ही पावसावर अवलंबून आहे.मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे.सादर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 एच.पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे”

योजनेचा कालावधी

ही योजना 5 वर्षांकरिता असून एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबवण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे

यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील

राज्यातील 7.5 एच.पी पर्यंत शेतीपंपचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील ही योजना घोषित करताना अजित पवार पुढे म्हणाले की, “भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत.अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ मी आता घोषित करीत आहे.”

याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील 44 लाख 3 हजार 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.” त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना -2024 राबवण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी २०२४ च्या अधिवेशनात जाहीर केलेल्या योजना कोणत्या ते जाणून घ्या खाली

  • शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना कायम
  • शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ई – पंचनामा लागू करणार
  • शेतीमाल साठवणुकीसाठी गाव तिथे गोदाम योजना
  • गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 जुलैपासून 5 रुपये अनुदान जाहीर
  • मोफत वीज बिलासाठी सौर पंप योजना
  • कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देणार

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 Baliraja Mofat Vij Yojana

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजने करीता लागणारे कागाद्पत्र
१.आधार कार्ड
२.रहिवाशी दाखला
३.किसान क्रेडीट कार्ड
4.लाइट बिलाची प्रत
5.पासपोर्ट साईज फोटो
६.मोबाइल नंबर
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana

राज्यातील शेतकऱ्यासाठी एक दिलासा देणारी आनंदाची बातमी आहे. निवडणुकीच्या अगोदर जणू योजनांचा पाऊस व्हावा तशी महाराष्ट्र राज्य सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये काही योजनांची घोषणा केली आहे.यामधे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणाले की “शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगिकरण आणि सौर उर्जाकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्यांना सौरपंप या योजनेकरीता 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे. या जीआर मधे पुढे जाहीर केले आहे की “महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 44.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत.या सर्व ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीजपुरवठा करण्यात येईल.एकूण वीज वापरापैकी 30% वीज ही कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते.राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10/8 किंवा दिवसा 8 तास थ्री फेज वजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.”


अश्याच नवीन योजनांबद्दल जाणून घ्या


येथून शेअर करा

14 thoughts on “पुढील 5 वर्ष शेतकर्यांना मिळणार मोफत वीज |Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024”

  1. Pingback: Diwali 2024
  2. Pingback: Ladki Bahin Yojna

Leave a Comment