Pradhan Mantri Ujjwala Yojana | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2025

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) चे उद्दिष्ट ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील महिलांना मोफत LPG कनेक्शन प्रदान करणे आहे. Pradhan Mantri Ujjwala Yojana या योजनेद्वारे महिलांना लाकूड, कोळसा इत्यादीपासून मुक्ती मिळवून स्वयंपाकासाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक इंधन दिले जाते.देशभरातील गरीब महिलांसाठी केंद्र सरकार सतत नवनवीन योजना आणत असते. यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२४ Pradhan Mantri Ujjwala Yojana 2024 आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारद्वारे ग्रामीण क्षेत्रातील गरीब कुटुंब आणि एलपीजी कार्डधारक कुंटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नुकत्याच रक्षाबंधनच्या पूर्वी केंद्र सरकारने देशातील महिलांच्या घरातील एलपीजी गॅस कनेक्शनची किंमत दोनशे रुपयांनी कमी केली आहे. या योजनेच्या घोषणेनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली की, केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० Pradhan Mantri Ujjwala Yojana 2.0 अंतर्गत देशातील महिलांना ७५ लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन देणार आहे, हे सर्व कनेक्शन येणाऱ्या तीन वर्षात म्हणजेच २०२६ पर्यंत देण्यात येणार आहेत. यासाठी सरकारने सरकारी तेल कंपन्यांना तब्बल १६५० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे देशातील गरीब कुटुंबातील महिलांची आता धुरापासून सुटका होणार आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल त्याबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखण्यास मोठी मदत होणार आहे .


Pradhan Mantri Ujjwala Yojana
Pradhan Mantri Ujjwala Yojana

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे ‘स्वच्छ इंधन चांगले जीवन’ या घोषवाक्यासोबत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना १ मे २०१६ रोजी सुरू करण्यात आली होती. Pradhan Mantri Ujjwala Yojana या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन बरोबरच सिलेंडरचे पहिले रिफिलिंग मोफत दिले जाते. याव्यतिरिक्त या योजनेअंतर्गत सरकार गॅस शेगडी ही फ्री मध्ये देत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाअंतर्गत आत्तापर्यंत देशभरात नऊ कोटी साठ लाख कनेक्शन देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत १ जानेवारी २०२४ पासून महिलांना गॅस सिलेंडर ४५० रुपयात मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना एका वर्षात १२ गॅस सिलेंडरचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच बाराशे गॅस सिलेंडर तुम्हाला साडेचारशे रुपये प्रति सिलेंडर या किमतीत मिळणार आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना Pradhan Mantri Ujjwala Yojana गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन स्वस्तात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देत आहे. कारण यातून महिलांना स्वयंपाक करण्यासाठी एक स्वच्छ इंधन उपलब्ध होईल, यामुळे महिलांचे आरोग्य सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या गरीब कुटुंबाकडे यापूर्वी कुठलेही गॅस कनेक्शन नाही अशा कुटुंबातील गरीब महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनासाठी अर्ज करू शकतात. आणि त्यांना या योजनेचा लाभही घेता येतो.Pradhan Mantri Ujjwala Yojana in short योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी सुरू झाली 1 मे 2016 कोणी सुरू केली केंद्र सरकार संबंधित मंत्रालय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लाभ मोफत गॅस कनेक्शन या योजनेचे लाभार्थी कोण देशातील गरीब महिला अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन/ऑफलाइन अधिकृत वेबसाईट https://www.pmuy.gov.in

प्रधानमंत्री उज्वला योजनेचे फायदे Benefits of Pradhan Mantri Ujjwala Yojana प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या नवीन नियमानुसार गॅस कनेक्शन सोबतच भरलेला सिलेंडर देखील लाभार्थ्याला मोफत मिळणार आहे. या योजनेमुळे इंधनापासून महिलांची मुक्तता होईल. या योजनेअंतर्गत देशातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे. या योजनेमुळे महिलांना डोळ्याच्या आजारापासून आणि चुलीचा धुरापासून मुक्तता मिळणार आहे. या योजनेचा लाभ देशातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना होणार आहे. चुल पेटवण्यासाठी लाकडाची आवश्यकता असायची आणि त्यामुळे कित्येक झाडे कापली जायची या योजनेमुळे आता झाडेही कापले जाणार नाहीत. उज्ज्वला योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२५ पर्यंत स्वस्तात मिळणार एलपीजी सिलेंडर देशभरातील दहा कोटी पेक्षा अधिक गरीब कुटुंबातील महिलांसाठी केंद्र सरकारने सबसिडीवर गॅस सिलेंडर देणाऱ्या पीएम उज्ज्वला योजनेचा PM Ujjwala Yojana अवधी एक वर्षासाठी वाढवला आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनाच्या लाभार्थ्यांना आता ३१ मार्च २०२५ पर्यंत एलपीजी सिलेंडरवर मोठी सबसिडी मिळणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये ७ मार्चला हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजना आता ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. या PM Ujjwala Yojana योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व महिलांना पुढील एक वर्षापर्यंत १२ एलपीजी सिलेंडरच्या खरेदीवर तीनशे रुपयांची प्रति सिलेंडर सबसिडी मिळणार आहे, ही सबसिडी देत असताना सरकारवर या सबसिडीद्वारे १२००० कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडणार असल्याची ही माहिती यावेळी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने मे २०१६ मध्ये ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजीसारखे ‘स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन’ उपलब्ध करून देण्यासाठी Pradhan Mantri Ujjwala Yojana ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ (PMUY) ही योजना सुरू केली होती.

जळाऊ लाकूड, कोळसा आणि गोवऱ्यामुळे स्वयंपाकाच्या पारंपारिक इंधनाच्या वापरामुळे महिलांचे आरोग्यावर आणि पर्यावरणावरही याचा विपरीत परिणाम होता. त्यामुळे या महिलांची धुरापासून सुटका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ ला उत्तरप्रदेशच्या बलिया येथे या योजनेची सुरूवात केली होती. पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रूपयाचे अनुदान १०.२७ कोटी उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना मिळणार अनुदान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची ७ मार्च २०२४ रोजी एक बैठक पार पडली. यात आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या PMUY लाभार्थ्यांना दरवर्षी १२ रिफिलसाठी प्रति १४.२ किलो सिलिंडर मागे (आणि ५ किलोच्या सिलिंडरसाठी प्रमाणनुसार प्रमाणबद्ध केलेले) ३०० अनुदान सुरू ठेवण्याला सरकारने मंजुरी दिली आहे.

त्यामुळे आता १ मार्च २०२४ पर्यंत Pradhan Mantri Ujjwala Yojana योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या १०.२७ कोटीहून अधिक झाली आहे. या योजनेवर अनुदान दिल्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सरकारवर १२००० कोटीचा अतिरिक्त भार पडणार आहे. हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना एलपीजी हे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार ही योजना सुरू केलेली आहे. भारत गरजेपैकी ६० टक्के एलपीजी आयात करतो.

एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतीत सतत चढ-उतार होत असतात. मात्र याचा प्रभाव प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या PM Ujjwala Yojana लाभार्थ्यांवर होऊ नये म्हणून या ग्राहकांना एलपीजी अधिक परवडण्यासाठी सरकारने प्रतिवर्षी १२ रिफिलसाठी प्रति १४.२ किलो सिलिंडर मागे (आणि ५ किलोच्या सिलिंडरसाठी प्रमाणनुसार प्रमाणबद्ध केलेले) २०० रूपयांचे अनुदान मे २०२२ ला दिले होते. या अनुदानामुळे लाभार्थ्यांना एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता.

ऑक्टोबर २०२३ मध्ये सरकारने प्रतिवर्षी १२ रिफिलसाठी प्रति १४.२ किलो सिलिंडर मागे (आणि ५ किलोच्या सिलिंडरसाठी प्रमाणनुसार प्रमाणबद्ध केलेले) २०० रूपयांचे अनुदार वाढवून ३०० रूपये केले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी १६५० कोटीचा निधी मंजुर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा PMUY पहिला टप्पा देशभरात यशस्वी ठरल्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकारने दुसरा टप्पा सुरू केला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० PM Pradhan Mantri Ujjwala Yojana 2.0 अंतर्गत सरकार देशातील ७५ लाख महिलांना नवीन मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी तब्बल १६५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाचे Pradhan Mantri Ujjwala Yojana लाभार्थ्यांची संख्या १० कोटी ३५ लाख होणार आहे. या योजनेवर होणारा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलत आहे.

यापूर्वी महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्वस्तात एलपीजी सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे. सामान्य ग्राहकांसाठी सरकारने एलपीजी सिलेंडरच्या रकमेत दोनशे रुपयेची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत Pradhan Mantri Ujjwala Yojana दोनशे रुपये व्यतिरिक्त २०० रुपये प्रति सिलेंडरचे हिशोबाने सूट मिळत आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गतील लाभार्थींना 450 रुपये स्वस्त एलपीजी सिलेंडर मिळणार आहे.


Pradhan Mantri Ujjwala Yojana
Pradhan Mantri Ujjwala Yojana

Pradhan Mantri Ujjwala Yojana चा नवीन टप्पा, उज्ज्वला योजना 2.0, आता ऑनलाइन अर्जांसाठी खुला आहे.

Pradhan Mantri Ujjwala Yojana हि उज्ज्वला गॅस योजना 2025  गरीब महिलांसाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

केंद्र सरकारने देशातील गरीब महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत, ज्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2025 (Ujjwala Gas Yojna 2025) एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वच्छ इंधनाचा लाभ मिळावा, तसेच त्यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारावा, हा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस कनेक्शन, पहिल्या सिलेंडरचे रिफिलिंग आणि गॅस शेगडी देखील मोफत दिली जाते.

Pradhan Mantri Ujjwala Yojana ऑनलाइन अर्जासाठी पात्रता

महिला फक्त महिला अर्ज करू शकतात.

कुटुंब: बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) कुटुंबे किंवा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेशी संबंधित कुटुंबे.

श्रेणी: SC, ST, OBC, EWS, किंवा ज्यांच्याकडे आधीच गॅस कनेक्शन नाही.


ऑनलाइन अर्जासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

आधार कार्ड.

शिधापत्रिका.

बँक पासबुक.

पत्ता पुरावा.

मोबाईल नंबर आणि मोबाईल आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

वेबसाइटला भेट द्या

सर्व प्रथम PMUY च्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्याची लिंक खाली दिली आहे.

(इथे क्लीक करा)

वेबसाइटवर पोहोचल्यानंतर, शेवटी जा आणि “ऑनलाइन अर्ज करा” वर क्लिक करा.


Pradhan Mantri Ujjwala Yojana पात्रता

पात्रता  वर क्लिक करा आणि कोण अर्ज करू शकते ते वाचा. तुम्ही सर्व अटी पूर्ण करत असल्याची खात्री करा.

गॅस वितरक निवडा

वितरकाचे नाव किंवा स्थानानुसार शोधा.

तुमचे राज्य महाराष्ट्र,  आणि जिल्हा निवडा.

स्क्रीनवर वितरक माहिती दिसेल.

ई-केवायसी करा

तुमचा आधार क्रमांक टाका.

मोबाईलवर मिळालेला OTP त्या ठिकाणी टाईप करा.

लक्षात ठेवा, आधार आणि मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे.

माहिती भरा

तुमचे पूर्ण नाव (आधारनुसार) एंटर करा.

जात (SC/ST/OBC) आणि रेशन कार्ड माहिती भरा.

12 अंकी SRC क्रमांक टाका.

बँक तपशील

तुमचा IFSC कोड आणि बँक खाते क्रमांक टाका.

तुमच्या पासबुकमधून शाखेची माहिती टाका.

गॅस कनेक्शन निवडा

तुम्हाला कोणते कनेक्शन हवे आहे ते निवडा –

14.2 किलो सिलेंडर

5 किलोचा सिंगल किंवा डबल बॉटल सिलेंडर.

तुमचा पर्याय निवडा.

पूर्ण माहिती अपलोड करा

फक्त रेशन कार्ड अपलोड करावे लागेल.

जर रेशन कार्ड नसेल तर फॅमिली कंपोझिशन सर्टिफिकेट निवडा.

प्रमाणपत्र प्रिंट करा, सर्व माहिती भरा आणि अपलोड करा.

कुटुंब  माहिती भरा

तुमच्या घरातील सर्व सदस्यांची नावे आणि रेशनकार्डमध्ये टाकलेली माहिती भरा.

फॉर्म सबमिट करा

फॉर्म भरल्यानंतर, घोषणा बॉक्स स्वीकारा.

सबमिट वर क्लिक करा.

ॲप्लिकेशन आयडी स्क्रीनवर दिसेल. ते टाका करा.

वितरकाशी संपर्क साधा

फॉर्म भरल्यानंतर, मूळ कागदपत्र तुमच्या वितरकाच्या कार्यालयात घेऊन जा.

कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला गॅस कनेक्शन दिले जाईल.

मोफत गॅस कनेक्शन: गरीब महिलांना एलपीजी कनेक्शन मोफत दिले जाते.

300 रुपये सबसिडी: उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना 12 सिलेंडर खरेदीवर 300 रुपयांची सबसिडी मिळते.

आरोग्याचे संरक्षण: चुलीच्या धुरामुळे होणारे डोळे, फुफ्फुसे व इतर आजार कमी होण्यास मदत होते.

पर्यावरणाचा समतोल: लाकडाच्या इंधनाची आवश्यकता कमी झाल्याने जंगलांचे संरक्षण होईल.

महिला सक्षमीकरण: महिलांना स्वच्छ आणि आधुनिक स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध होईल.

उज्ज्वला गॅस योजनेचा दुसरा टप्पा (2.0)

केंद्र सरकारने योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे, ज्याअंतर्गत 75 लाख नवीन कनेक्शनसाठी 1650 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


Pradhan Mantri Ujjwala Yojana
Pradhan Mantri Ujjwala Yojana

योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे 2026 पर्यंत गरीब कुटुंबांपर्यंत गॅस कनेक्शन पोहोचवणे.

2025 पर्यंत स्वस्त एलपीजी सिलेंडर

सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना 2025 पर्यंत 450 रुपये प्रति सिलेंडर दराने गॅस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ देशभरातील 10 कोटींपेक्षा जास्त महिलांना होणार आहे.


उज्ज्वला गॅस योजनेच्या अटी आणि पात्रता

लाभार्थ्याने दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबातील महिला असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांकडे पूर्वी कोणतेही गॅस कनेक्शन नसावे.

उज्ज्वला गॅस योजनेची सुरूवात आणि इतिहास

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातून ‘स्वच्छ इंधन, चांगले जीवन’ या घोषवाक्यासह उज्ज्वला योजनेची सुरुवात केली. पारंपरिक इंधनाच्या धुरामुळे महिलांचे आरोग्य आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली.


Pradhan Mantri Ujjwala Yojana चे फायदे

मोफत एलपीजी कनेक्शन: नोंदणी शुल्क विनामूल्य आहे.

 सिलिंडर पहिल्यांदाच मोफत मिळणार आहे.

 धूर टाळणे आणि पर्यावरणास मदत करणे. हा या योजनेचा उद्देश आहे.

 ऑनलाइन अर्ज आणि किमान कागदपत्रे.

मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.

फॉर्म नाकारणे टाळण्यासाठी योग्य माहिती भरा.


Pradhan Mantri Ujjwala Yojana साठी अर्ज कसा करावा?

महिलांना या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येतो. ऑनलाईन अर्जासाठी www.pmuy.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

उज्ज्वला गॅस योजनेचे भविष्यातील परिणाम

महिलांचे आरोग्य सुधारेल.

जंगलतोड कमी होईल, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.

गरीब कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल.

ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावेल.


Pradhan Mantri Ujjwala Yojana
Pradhan Mantri Ujjwala Yojana

Pradhan Mantri Ujjwala Yojana सारांश

जर तुम्ही उज्ज्वला योजनेसाठी पात्र असाल तर वेळ न घालवता आजच अर्ज करा. ही योजना विशेषतः महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2025 (Ujjwala Gas Yojna 2025) ही एक प्रभावी योजना असून, देशातील गरीब महिलांना जीवन सुसह्य करण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या योजनेमुळे महिलांना धुरापासून मुक्तता मिळेल आणि त्यांचे आरोग्य तसेच आर्थिक स्थिती सुधारेल.


सरकारी योजनाच्या माहिती करीता खाली वाचा

लाडकी बहिण योजना मधील आनंदाची बातमी (संपूर्ण माहिती इथे वाच )

PM Internship Yojana – PM इंटर्नशिप योजना – (इथे वाचा )

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना बद्दल ( इथे वाचा )

माझा लाडका भाऊ योजना बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा )

माझी लाडकी बहिण योजना बद्दल माहिती साठी (इथे क्लिक करून वाचा )

विश्वकर्मा योजना छोट्या व्यावसायिकांसाठी कर्ज योजना (इथे वाचा )


इतर धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे वाचा

गणपतीपुळे विकिपीडिया माहिती – (इथे वाचा )

अष्टविनायक गणपती बद्दल माहिती साठी (येथे क्लिक करा )

मकर संक्रांति भोगी माहिती – भोगी भाजी रेसिपी वाचण्यासाठी (इथे क्लिक करा )

मकर संक्रांति वेळ , मुहूर्त ,विधी जाणून घेण्यासाठी इथे वाचा (इथे क्लिक करा )

सफला एकादशी व्रत कथा | Safala Ekadashi Vrat Katha (इथे वाचा )

जया एकादशी २०२५ |Jaya Ekadashi ईन्फ़ोर्मतिओन – (इथे वाचा )

संत ज्ञानेश्वर महाराज माहिती – Sant Dnyaneshwar Maharaj Mahiti – ( इथे क्लिक करा )

धन्यवाद !


येथून शेअर करा

Leave a Comment