Saptashrungi Devi | सप्तशृंगी देवीचे महत्त्व,गडाची वैशिष्ट्ये आणि संपूर्ण माहिती मराठी मधे

नमस्कार मित्रांनो आज आपण वणीच्या प्रसिद्ध सप्तशृंगी Saptashrungi Mata बद्दल मराठीत माहिती पाहणार आहोत. saptashrungi devi सप्मंतशृंगी गडाची वैशिष्ट्ये (saptashrungi mata gad ). मंदिराकडे जाताना मागे असलेला डोंगर आपल्याला आणखी जवळचा वाटतो.  आत प्रवेश करताच समोर सप्तशृंगी देवीचे मंदिर दिसते. vani saptashrungi devi temple जर तुम्हाला वर चढताना त्रास होत असेल तर येथे रोपवे आणि मिनी  ट्रेन सुविधा आहे, ज्यामुळे तुम्ही आरामात वर पोहोचू शकता. या ठिकाणी गेल्यानंतर आपण देवीचा फोटो घेऊन येतो original saptashrungi devi photo.नाशिक पासून जवळच असणारे (nashik to saptashrungi distance) हे मंदिर साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे. 

सप्तशृंगी देवीचे महत्त्व

सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी एक आहे. उर्वरित तीन पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी आणि माहूरची रेणुका माता. येथील देवीची मूर्ती स्वयंभू असून ती ९ फूट उंच आहे. मूर्ती सिंदूराने मढलेली आहे आणि देवीच्या 18 हातांमध्ये वेगवेगळी  शस्त्रे आहेत. मंदिराच्या मुख्य प्रांगणात शक्ती द्वार, सूर्य द्वार आणि चंद्र द्वार अशी तीन प्रवेशद्वार आहेत. येथे महा नैवेद्य आरती रात्री 12 वाजता होते आणि संध्याकाळी 7:30 वाजता . मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. वाटेत मंदिरे तुम्हाला आणखी बरीच मंदिरे दिसतात. राधा-कृष्णाचे सुंदर मंदिर असून थोडे पुढे दत्तगुरू महाराजांची भव्य मूर्ती आहे. वर गेल्यावर राम मंदिर आणि मार्कंडेय मंदिर आहे.


Saptashrungi Devi nashik
Saptashrungi Devi

नवरात्री आणि चैत्र पौर्णिमेचे महत्त्व

सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्री आणि चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवसात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. येथील वातावरण भक्ती आणि आनंदाने भरलेले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मंदिराच्या सभोवतालची हिरवळ यामुळे त्याचे सौंदर्य आणखी वाढले आहे. देवीच्या दर्शनानंतर मनाला विलक्षण शांती मिळते. उतरताना वाटेत भैरव मंदिर, सतीचा कडा ही ठिकाणे दिसतात. ही खूप प्रसिद्ध आणि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. 

आई सप्तशृंगीच्या माहेरची कथा: 

महाराष्ट्रातील सप्तशृंगी देवीचे मंदिर भक्तीचा महिमा सांगणाऱ्या पौराणिक कथा आणि श्रद्धेने नटलेले आहे. सप्तशृंगी देवीचे माहेर खानदेश आहे तर तिचे सासर वनी परिसरात आहे. देवीला आपल्या भक्तांवर असलेली अपार माया आणि भक्तांचा तिला असलेला विश्वास यामुळेच आजही तिच्या कथा जगभरात प्रसिद्ध आहेत.

सप्तशृंगीच्या माहेरची एक  कथा

एका गावी एक महिला राहत होती. तिच्या घरी धन-धान्याची कधीही कमतरता नव्हती, पण ती दु:खी होती कारण लग्नाला अनेक वर्षे झाली तरीही तिला संतती लाभली नव्हती. तिच्या घरच्या सालदार गड्याने एकदा तिला सल्ला दिला. ताई, सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जा.

महिलेने त्याच्या सल्ल्यानुसार सप्तशृंगीच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. तिने मातेच्या चरणी नतमस्तक होत असे वचन दिले. आई, तू सर्वांची मनोकामना पूर्ण करतेस. जर मला मूल झाले, तर मी बैलगाडीने तुला वचनानुसार नवस फेडायला येईन.

आश्चर्यकारकरीत्या एका वर्षाने तिच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला. नवस पूर्ण करण्यासाठी ती बैलगाडीतून गडावर जाण्यास निघाली. तो काळ असा होता की, गडावर जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नव्हते. खडतर दगडधोंड्यांमधून गाडी खाली जाणे अशक्य होते. पण तिने देवीवर असलेला विश्वास कायम ठेवला.


Saptashrungi mata temple
Saptashrungi Devi

मातेचा चमत्कार

बैलगाडी खडतर वाटांमधून सुखरूप खाली उतरली. देवीचा हा चमत्कार पाहून  सगळे थक्क झाले. असे म्हणतात की देवीने त्या बैलगाडीला हात देऊन मदत केली. त्या दिवशीपासून सप्तशृंगी देवीच्या दैवी कृपेचा अनुभव घेणाऱ्या भक्तांची श्रद्धा अधिक दृढ झाली.

सप्तशृंगी देवीचे माहेर आणि सासर

माता सप्तशृंगीचे माहेर खानदेश तर सासर वनी आहे. ती आपल्या माहेरच्या भक्तांवर  कृपा करते. जेव्हा तिच्या माहेरची माणसे देवीला भेटायला येतात, तेव्हा देवीचे स्वरूप अधिक खुलते. पण ते परत जात असताना देवीचा चेहरा रडवेला होतो.

सप्तशृंगीच्या महत्त्वाच्या परंपरा

गडावरील मूर्ती: देवीची स्वयंभू मूर्ती आठ फूट उंच आहे आणि 18 हातांमध्ये विविध शस्त्र धारण केलेली आहेत. तिचा सेंदूर लेपलेल्या मूर्तीचा गाभारा अत्यंत पवित्र मानला जातो.

काकड आरती: 

पहाटे देवीची काकड आरती होते. तिच्या पूजेसाठी देशमुख आणि दीक्षित कुटुंबांना विशेष मान दिला जातो.

नैवेद्याचा मान:

देवीला पुरणपोळी,  चटणी, भाजी आणि वरण-भाताचा नैवेद्य दाखवला जातो.


Saptashrungi Devi original photo
Saptashrungi Devi

सप्तशृंगी गडाची वैशिष्ट्ये

सप्तशृंगी गड नाशिकच्या पासून ६० कि.मी. अंतरावर असून कळवण तालुका,नांदुरी येथे वसलेला आहे. गड समुद्रसपाटीपासून 4,659फूट उंच आहे आणि देवीच्या गडाच्या सात शिखरांवर सप्त माता विराजमान आहेत.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक हे मंदिर असून हे मंदिर दुमजली आहे .याच्या वरच्या मजल्यावर देवीचे स्तंभ आहेत व एका गुहेत एका निखळ दगडाच्या पायथ्याशी देवीची प्रतिमा कोरलेली आहे.देवी याठिकाणी स्वयंभू स्वतः प्रकट झाल्याचे मानले जाते.गडावर चढण्यासाठी ५१० पायऱ्या आहेत .

गडावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, जसे की

गिरिजा तीर्थ:  येथे स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते.

सूर्य तीर्थ:  या कुंडाचे पाणी उष्ण असते.

काजल तीर्थ:  देवीच्या डोळ्यातील काजळ याच कुंडात धुतले जाते.

सप्तशृंगी देवीची भक्तांवरील कृपा

सप्तशृंगी देवीने भक्तांचे नवस फेडल्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. ती महिषासुर वधासाठी प्रसिद्ध आहे आणि तिचे स्वरूप त्रिगुणात्मक आहे, ज्यामध्ये महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी यांचा समावेश आहे.

सप्तशृंगी देवी भक्तांची श्रद्धा आणि नवस पूर्ण करणारी आई आहे. ती आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभी असते. या पवित्र स्थळाला भेट दिल्यावर भक्तांना समाधान, शांती आणि देवीच्या दैवी कृपेचा अनुभव येतो. “आई आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते,” ही श्रद्धा कायम जपली जाते.


Saptashrungi Devi temple nashik
Saptashrungi Devi

महिषासुराच्या वधाची कथा

महिषासुर नावाचा राक्षस आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत होता. त्याच्या दहशतीमुळे पृथ्वी, स्वर्ग आणि नरक सर्व थरथर कापले. तेव्हा देवी शक्तीने महिषासुराचा वध केला. ही कथा आपल्याला शिकवते की अन्याय आणि अधर्माचा अंत निश्चित आहे.

नवरात्र आणि चैत्र सण

महाराष्ट्रात नवरात्री आणि चैत्र पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या सणांनिमित्त देवीच्या मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवसात तुळजापूरच्या सप्तशृंगी देवी मंदिर आणि भवानी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या दिवसात मंदिराची सजावट केली जाते विद्युत रोषणाई केली जाते. सर्वत्र तेलाचे दिवे लावले जातात. वेगवेगळ्या कलरच्या फुलाने मंदिराची सजावट केली जाते. नवरात्रीत खूप लोक दर्शनासाठी येतात. मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. 

तुम्हाला हेही वाचायला आवडेल – जगन्नाथ पुरी मंदिरातील 10 रहस्य व संपूर्ण माहिती हिती मराठीत


Saptashrungi Devi photo
Saptashrungi Devi

रोपवे आणि ट्रेनचा अनुभव

रोपवे तिकीट काउंटरवर थोडी गर्दी असू शकते, परंतु ते खूप सोयीचे आहे. जर तुम्हाला ट्रेनने जायचे असेल तर इथे छोटी ट्रेनही उपलब्ध आहे. ही ट्रेन तुम्हाला पाच मिनिटांत माथ्यावर घेऊन जाते. पण  तुम्हाला पायऱ्यांनी जायचे असेल तर  20-25 मिनिटे लागतात. 

मंदिराचा रस्ता

वाटेत तुम्हाला ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी अप्रतिम नजारे दिसतील. येथे पौराणिक महत्त्वाची अनेक ठिकाणे आहेत. असे म्हणतात की हनुमानजी जेव्हा द्रोणागिरी पर्वत घेऊन जात होते तेव्हा त्याचा काही भाग येथे पडला आणि तो सप्तशृंगी पर्वत झाला. वाटेत गणपती बाप्पाचे छोटेसे मंदिरही आहे. तेथे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर ४२२ पायऱ्या चढून जावे लागते. हा मार्ग अतिशय सुंदर आणि शांततेने भरलेला आहे.

रोपवे आणि पायऱ्या  वर चढण्यात अडचण येत असेल तर रोपवे वापरा.

 ऑनलाइन तिकीट बुकिंग आजकाल अनेक मंदिरांमध्ये ऑनलाइन तिकीट सुविधा आहे.

महाराष्ट्राचा प्रत्येक कानाकोपरा श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीने भरलेला आहे. येथील पौराणिक कथा, देवी-देवतांची मंदिरे आणि संतांची शिकवण आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते.

सप्तशृंगी देवीचे दर्शन हा  आध्यात्मिक अनुभव आहे. येथील निसर्गसौंदर्य, मंदिराची  पौराणिक कथा कायम आहे. या ठिकाणाला आणखी खास बनवतात. तुम्ही नाशिक जवळ असाल तर या ठिकाणाचा नक्की आनंद घ्या.

या देवीचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

सप्तशृंगी माता बद्दल अधिक विकिपीडिया वरील माहिती – इथे वाचा

तुम्हाला हा लेख कसा वाटला यासाठी आम्हाला नक्की तुमच्या प्रतिक्रिया द्या.

धन्यवाद !


येथून शेअर करा

1 thought on “Saptashrungi Devi | सप्तशृंगी देवीचे महत्त्व,गडाची वैशिष्ट्ये आणि संपूर्ण माहिती मराठी मधे”

Leave a Comment